यूट्यूब वरून पैसे कसे कमवायचे | How To Earn Money From YouTube In Marathi

 

आजच्या या पोस्ट मध्ये आपण YouTube वरून पैसे कसे कमवायचे या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जर तुमचे स्वतःचे यूट्यूब चॅनल असेल आणि तुम्हाला youtube वरून ऑनलाईन पैसे कमवायचे असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. या पोस्ट मध्ये आम्ही यूट्यूब वरून पैसे कमविण्याची विविध पर्याय सांगितलेले आहेत. youtube चॅनल जर नवीन ओपन केलं असेल तर यूट्यूब च्या माध्यमातून earning सुरू करण्यासाठी सुरुवातीला काय करावे लागते, याची सुद्धा माहिती या लेखात दिलेली आहे.त्यामुळे ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा.How To Earn Money From YouTube In Marathi, यूट्यूब वरून पैसे कमविण्याचे मार्ग

 

यूट्यूब वरून पैसे कसे कमवायचे | How To Earn Money From YouTube In Marathi
यूट्यूब वरून पैसे कसे कमवायचे | How To Earn Money From YouTube In Marathi

 

 

यूट्यूब चॅनल वरून पैसे कसे कमवायचे ( How to earn Money from YouTube in Marathi ) :-

 

 

आता आपण पुढे यूट्यूब च्या माध्यमातून पैसे कमवण्याची मार्ग स्टेप बाय स्टेप.पाहणार आहोत. आपण स्वतःची यूट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर आपल्यासमोर यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून पैसे कमवण्याची अनेक पर्याय असतात. आपण आपले स्वतःचे यूट्यूब चॅनल ओपन करून यूट्यूब चॅनल ला monetisation करून घ्यायचे आहे. How to earn Money from youtube in marathi

 

YouTube channel च्या माध्यमातून तुम्ही खालील पद्धतीने पैसे कमवू शकतात.

 

1. Google Adsense Advertisement :-

 

जेव्हा तुम्ही तुमचे स्वतःचे यूट्यूब चॅनल ओपन करता त्यानंतर तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनल वर व्हिडीओज अपलोड करावे लागेल. तुम्ही तुमच्या यूट्यूब चैनल वर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमचा व्हिडिओ हे इतर लोक पाहतील. तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनल दररोज व्हिडिओ अपलोड करावे लागते. दररोज नाही केले तरी चालते परंतु कोणत्याही गोष्टीत consistency खूप जास्त मॅटर करते. त्यानंतर तुम्हाला तुमचे यूट्यूब चैनल monetize करावे लागते. यूट्यूब चैनल monetize झाल्यानंतर तुम्ही तुमच्या यूट्यूब चैनल वर Google adsense च्या ads दाखवू शकतात.

 

हे नक्की वाचा:- ई- बँकिंग म्हणजे काय? फायदे संपूर्ण माहिती

तुमचे यूट्यूब चॅनल monetize झाल्यानंतर तुमच्या व्हिडिओ मध्ये ऍड दाखवण्यात येईल. जेवढा जास्त तुमचा व्हिडिओ लोकांद्वारे पाहिला जाईल तेवढा जास्त क्लिक येऊन तुमची YouTube Earning वाढेल. जर तुमच्या व्हिडिओचा कंटेंट चांगला असेल तर तुमच्या चॅनल चे subscriber सुद्धा वाढतील.

 

 

YouTube वर जेवढे जास्त व्ह्यूज येतील तेवढी जास्त इन्कम तुम्हाला होते. त्यामुळे जर तुमचे व्हिडिओ चांगले असल्यास लोकांना आवडल्यास तुमच्या चॅनल चे व्हिडिओज लोक आवर्जून पाहतील. आपल्या महाराष्ट्र राज्यातील काही प्रसिद्ध youtubrs महिन्याला लाखो रुपये कमवीत आहेत.

 

 

 

 

2. Brand Deals :-

YouTube channel वरून पैसे कमविन्याचा दुसरा महत्त्वाचा पर्याय म्हणजे brand deals होय. YouTube channel वरून Barnd Deals मधून पैसे कमविण्यासाठी तुमच्या यूट्यूब चॅनल वर सबस्क्रायबर हेच जास्त असणे आवश्यक आहे. कारण की Brand Deals हे मोठ मोठ्या कंपन्यांकडून देण्यात येत असते. ब्रँड deals च्या माध्यमातून तुम्ही खूप जास्त प्रमाणात इन्कम करू शकता. यामध्ये तुम्हाला brand deals sponsorship देणाऱ्या कंपन्या त्यांचं प्रॉडक्ट देतात आणि त्या प्रॉडक्ट विषयी माहिती देणारा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला तुमच्या YouTube channel वर अपलोड करायचा असतो.

 

 

 

3. sponsored video :-

 

यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून पैसे कमवण्याचा तिसरा महत्त्वाचा मार्ग म्हणजे sponsored video हा होय. तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जेव्हा तुमचे YouTube subscribers जास्त होतात त्यावेळेस तुम्हाला स्पॉन्सरशिप मिळणे सुरू होते. तुम्हाला तुमच्या यूट्यूब चैनल च्या कोणत्या एखाद्या व्हिडीओ मध्ये थोडक्यात त्यांच्या प्रॉडक्ट विषयी किंवा त्यांच्या service बद्दल सांगायचं असते. जर स्पॉन्सरशिप देणारे जास्त पेमेंट करत असतील तर ते तुम्हाला त्यांच्या प्रॉडक्ट विषयी डिटेल माहिती देणारा व्हिडिओ अपलोड करायला सांगतील.

 

 

हे नक्की वाचा:- Google Pay काय आहे? संपूर्ण माहिती

यामध्ये तुम्हाला मिळणाऱ्या स्पॉन्सरशिप ह्या तुमची यूट्यूब चॅनल ज्या प्रकारचे आहे. त्या संबंधित स्पॉन्सरशिप तुम्हाला मिळत असतात. जर तुमचे यूट्यूब चॅनल हे technology संबंधित माहिती देणारे असल्यास तुमच्याकडे एखादी ॲप डेव्हलपमेंट कंपनी कॉन्टॅक्ट करून त्यांच्या ॲप विषयी तुमच्या ग्राहकांना माहिती देण्यासाठी व्हिडिओ बनवायला सांगतील. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यांच्या ऍप्लिकेशन विषयी माहिती द्यावी लागेल त्यांच्या application मध्ये असणारे फीचर्स त्यांच्या अप्लिकेशन चा फायदा अश्या माहितीचा व्हिडिओ तुम्ही बनविल्यास त्या अँप डेवलपमेंट कंपनीचे ॲप जास्तीत जास्त लोक वापरतील. तुमचे ऑडियन्स ते ॲप डाउनलोड करतील, त्यामुळे त्या कंपनीला फायदा होईल आणि तुम्हाला ती कंपनी यासाठी पैसे पे करतील. YouTube channel information in Marathi

 

 

 

 

4. Affiliate Marketing on YouTube:-

 

YouTube channel च्या माध्यमातून पैसे earn करण्याचा चौथा महत्त्वाचा पर्याय म्हणजे Affiliate Marketing होय. Affiliate Marketing हे earning करून देणारे महत्वाचे साधन आहे.

 

अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या ह्या त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील वस्तू सेल करण्यासाठी affiliate program चालवीत असतात. affiliate program मध्ये कंपन्या त्यांच्या वस्तू सेल करणाऱ्यांना काही कमिशन देत असतात. ज्यांना Affiliate Marketing  करायचे असते त्यांना त्या कंपन्यांच्या Affiliate Marketing program ला जॉईन करून घ्यावे लागते.

 

Affiliate Marketing विषयी संपूर्ण माहिती साठी इथे क्लिक करा.

 

तुम्ही Affiliate Marketing program जॉईन केल्या नंतर तुमच्या यूट्यूब चॅनल वर जो प्रॉडक्ट विकायचा आहे त्या प्रॉडक्ट ची लिंक बनवून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्या लिंक वरून प्रोडक विकत घेतल्यास तुम्हाला त्याचे कमिशन मिळत असते.

 

 

जर तुमचा एखादा फिटनेस यूट्यूब चॅनल असेल तर तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनल वर affiliate program च्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रोटीन चा लिंक टाकून त्या वस्तू जर ग्राहकांनी खरेदी केल्या तर तुम्हाला त्याबद्दल कमिशन मिळते. अशा प्रकारे तुम्ही Affiliate Marketing च्या मदतीने दुसऱ्या कंपनीच्या वस्तू आपल्या प्लॅटफॉर्मवर विकून त्याबद्दल कमिशन मिळवू शकता.

 

अशा प्रकारे तुम्ही YouTube channel च्या माध्यमातून घरबसल्या वेगवेगळ्या पद्धतीने पैसे कमवू शकतात. जर तुम्हाला ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.