Google pay काय आहे? गुगल पे अकाउंट कसे ओपन करावे? | Google Pay information in Marathi

आजच्या या पोस्ट मध्ये आपण Google pay विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये हे गुगल पे कसे वापरावे, गुगल पे म्हणजे काय आहे? तसेच गुगल पे अकाउंट कसे ओपन करावे या विषयी संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

Google pay काय आहे? गुगल पे अकाउंट कसे ओपन करावे? | Google Pay information in Marathi
Google pay काय आहे? गुगल पे अकाउंट कसे ओपन करावे? | Google Pay information in Marathi

 

 

आजचे युग हे डिजिटल युग आहे. त्यामुळे या डिजिटल युगात प्रत्येक व्यवहार हे आता ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. अगदी भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यापासून ते मोठ मोठ्या मॉल्स मध्ये ऑनलाईन पद्धतीने पेमेंट स्वीकारत आहेत. त्यामुळे आपल्याला Google Pay information in marathi आणि How to create google pay account in marathi या विषयी संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.

 

Google pay इतिहास ( Google Pay History) :-

Google Pay हे एक अमेरिकन कंपनी गूगल यांनी लॉन्च केलेले UPI आधारित डिजिटल पेमेंट ॲप आहे. गुगल पे चे आधीचे नाव हे Google Tez असे होते. गुगल पे है ॲप यूपीआय वर आधारित कार्य करत असून हे upi हे National Payments Corporation of India (NPCI) द्वारे संचालित केले जाते. NPCI ही एक भारतीय सरकारी संस्था आहे, जी government of India अंतर्गत कार्य करते. आणि सर्व upi आधारित व्यवहारांवर नियंत्रण ठेवते. गुगल पे अँप सुद्धा UPI आधारित अँप असून हे सुद्धा NPCI अंतर्गत कार्य करते.

 

गुगल पे प्रमाणेच ऑनलाइन पेमेंट स्वीकार करणारे अनेक ऑनलाइन UPI आधारित ॲप आहे. जसे की Paytm, phone pay, Amazon pay इत्यादी. परंतु या सर्व ॲप पैकी सर्वात जास्त वापरण्यात येणार आहे आणि लोकप्रिय असलेले ॲप म्हणजे गुगल पे ॲप होय. या ॲपच्या मदतीने आपण ऑनलाइन पेमेंट स्वीकारू शकतो. तसेच इतरांना आपण पैसे पाठवू शकतो. तसेच मोबाईल रिचार्ज, बिल्स अशा अनेक सुविधा या ॲपच्या मदतीने आपल्याला पुरविण्यात येत असतात.

 

जर आपण अशा गुगल पे सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केल्यास आपला वेळ वाचतो तसेच व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या होतात. आता आपण पुढे गुगल पे काय आहे? तसेच गुगल पे चा वापर कसा करावा हे माहिती पाहणार आहे.

 

Google pay काय आहे? (Google Pay information in marathi)

 

गुगल पे हे एक ऑनलाईन पेमेंट सिस्टीम आहे. जी डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करते. याच्या माध्यमातून आपण ऑनलाईन पद्धतीने पैशाची देवाणघेवाण करू शकतो. गुगल पे हे एक Upi आधारित अँप आहे. गुगल पे चे सुरुवातीचे नाव हे Google Tez असे होते. त्यानंतर गुगल कंपनीने Google Tez हे नाव बदलवून Google Pay हे नाव ठेवले. मित्रानो Google pay हे स्वतः गुगल ने तयार केलेले मोबाईल ॲप्लिकेशन आहेत, त्यामुळे हे सुरक्षित आहे.

 

Google pay वर आपण अनेक प्रकारचे ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करू शकतो. जसे की एकाध्या व्यक्तीच्या बँकेत पैसे जमा करणे, ऑनलाईन फॉर्म भरल्या नंतर त्याचे पेमेंट करणे, रिचार्ज एवढेच नाहीतर आपण अनेक शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या ॲप मध्ये सुद्धा Google Pay च्या माध्यमातून पैसे जमा करू शकतो. आपल्या देशात upi आपल्यापासून डिजिटल क्रांती झालेली आहे. आता आपल्याला छोट्या भाजी विक्रेत्यांपासून ते मोठ्या मॉल मध्ये गुगल पे सारख्या ॲप च्या माध्यमातून पेमेंट स्वीकारण्यात येत आहे.

 

गुगल पे आपण अँड्रॉइड तसेच iOS डिव्हाइस वर सुद्धा वापरू शकतो. गुगल पे हे ऍप ऑनलाइन पैशांच्या देवाण-घेवाण आणि करते त्याच बरोबर गुगल पे आपल्याला इन्शुरन्स हप्ते भरणे, सार्वजनिक वाहतूक तिकिटे बुक करणे, कूपन, गिफ्ट कार्ड, रिचार्ज, बिल पेमेंट तसेच QR Code द्वारे पेमेंट रिसीव्ह करू शकतो अश्या अनेक सेवा डिजिटल पद्धतीने पुरविते.

 

 

गुगल पे कसे वापरावे? ( How to Use Google Pay information in Marathi ) :-

 

गुगल पे ॲप च्या मदतीने आपण आपले व्यवहार हे बँकेत न जाता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. रोजच्या दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक ठिकाणी पैशांचे व्यवहार करण्याची आवश्यकता भासते अशावेळी गुगलच्या माध्यमातून आपण समोरच्या व्यक्तीला पेमेंट करू शकतो. जर तुम्ही शॉपिंग केली तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करू शकता. जर तुम्ही किराणा दुकानांमधून किराणा घेतला तर त्यावेळेस रोखीने पैसे न देता गुगल पे च्या माध्यमातून आपण ऑनलाईन पद्धतीने पैसे देऊ शकतो. एखाद्या मित्राला पैसे पाठवायचे असल्यास बँकेत न जाता तुम्ही थेट गूगल पे च्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवू शकतात.

 

 

गुगल पे वापरणे आधी तुमच्याकडे गुगल पे हे ॲप असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला गुगल पे वर नवीन खाते तयार करावे लागते. व त्यानंतर तुम्ही गुगल पे चा वापर करून ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करू शकतात.

 

 

Google Pay अकाऊंट ओपन करण्यासाठी तुमच्याकडे खालील गोष्टी असाव्या लागतात.

१) बँक खाते

२) डेबिट कार्ड किंवा atm card

३) जी मेल अकाऊंट (Google account)

४) ज्या मोबाईल क्रमांकावरून गूगल पे अकाउंट ओपन करायचे आहे, त्या सिम मध्ये मेसेज पाठविण्या इतके balance असावे लागते. तसेच ते सिम तुमच्या मोबाईल मध्ये active असावे लागते.

 

 

Google Pay वर अकाऊंट कसे ओपन करायचे? (How to Open Google Pay Account in Marathi)

 

गुगल पे अकाउंट ओपन करण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी.

 

१) सर्वप्रथम Google Pay हे ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून इंस्टॉल करा.

गुगल पे ॲप डाऊनलोड

Google pay Download करण्यासाठी येथे क्लिक करा

 

२) आता तुमच्या मोबाईल मध्ये Google Pay हे अँप इंस्टॉल झाल्यानंतर ओपन करा.

३) आता बँक खात्याशी लिंक मोबाईल नंबर add करा. आणि तुमचे जी मेल अकाऊंट add करा.

४) आता तुमचा मोबाईल नंबर otp टाकून घ्या नंतर verify होईल. Google pay app मध्ये सुरक्षेसाठी pin lock टाकून घ्या. जेणेकरून दुसरी कोणतीही व्यक्ती तुमचे गूगल पे अकाउंट मध्ये प्रवेश करू शकणार नाहीत.

५)आता बँक अकाउंट ऑप्शनवर क्लिक करून दिलेल्या पर्यायातून तुम्ही ज्या बँकेचे ग्राहक असाल किंवा तुम्हाला ज्या बँकेला गुगल पे सोबत लिंक करायचे असेल ती बँक या ठिकाणी निवडून घ्या.

६) तुम्ही जर यापूर्वी कोणतेही UPI बेस अँप वापरलेले नसेल तर आता या ठिकाणी तुमच्या एटीएम कार्ड चे शेवटचे सहा आकडे एटीएम कार्ड एक्सपायरी डेट टाकून Google pay upi password तयार करा.

७) आता बँक add झाल्यानंतर तुम्ही तुमच्या बँकेचे बँक बॅलन्स चेक करू शकता. तसेच गुगल पे चे सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करू शकतात.

 

 

Google pay द्वारे पैसे कसे पाठवायचे? :- How to send money via Google pay

 

गुगल पे वरून पैसे पाठवण्याच्या अनेक पद्धती आहे त्या खालीलप्रमाणे आहेत.

 

1) Phone Number द्वारे:-

गुगल पे वरून मोबाईल नंबर सेव्ह असणाऱ्या व्यक्तीला पैसे पाठविण्याची ही एक सोपी पद्धत आहे. या पद्धतीमध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीला गूगल पे द्वारे पैसे पाठवायचे असेल त्या व्यक्तीचा Google Pay Number हा तुमच्याकडे असल्यास तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने पैसे पाठवू शकता. गुगल पे या ॲपमध्ये contact या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुम्हाला ज्या व्यक्तीच्या मोबाईलवर पैसे पाठवायचे असेल त्याला तिचा मोबाईल नंबर टाईप करा. टाईप केल्यानंतर तुमच्या समोरच्या व्यक्तीचे नाव दिसेल. त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर बँक अकाउंट सोबत लिंक असणे आवश्यक आहे. आता तुम्हाला जेवढी रक्कम पाठवायची आहे तेवढी रक्कम एंटर करा आणि यूपीआय पासवर्ड टाकून पैसे पे करा.

 

 

2) QR Code द्वारे:- 

गुगल पे च्या माध्यमातून पैसे पाठविण्याची QR Code ही सर्वात सोपी पद्धत आहे. या QR Code पद्धतीमध्ये एक डिजिटल सुरक्षा कोड हा असतो. तो किंवा आर कोड स्कॅन करून आपण कोणत्याही व्यक्तीला अगदी काही सेकंदात पैसे पाठवू शकतो. तुम्ही अनेक ठिकाणी जसे किराणा दुकान, शोरूम, भाजीपाला विक्रेते, अशा अनेक ठिकाणी त्यांचे क्यू आर कोड बघितले असेल.

 

 

गुगल पे च्या माध्यमातून क्यू आर कोड द्वारे पेमेंट करण्यासाठी सर्वप्रथम गूगल पे ओपन करा आता तुमच्यासमोर Scan any QR असा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या मोबाईलचा कॅमेरा ओपन झालेला असेल. ज्या व्यक्तीला तुम्हाला क्यू आर कोड द्वारे पेमेंट करायचे आहे त्या व्यक्तीच्या क्यू आर कोड समोर तुमचा मोबाईल न्या त्यानंतर तुमचा मोबाईल क्यू आर कोड स्कॅन करेल. आता जेवढे पैसे पाठवायचे आहे तेवढी रक्कम ऍड करून तसेच upi पिन टाकून पेमेंट पूर्ण करा. QR code च्या माध्यमातून पेमेंट करण्याची ही एक अत्यंत सुरक्षित पद्धत आहे. आणि ही सहज आणि सुलभ पद्धत आहे. Upi चा विकास झाल्यापासून आपल्याला प्रत्येक दुकानात पेमेंट स्वीकारण्यासाठी qr code दिसत आहेत.

 

3) Bank Transfer द्वारे:-

गुगल पे द्वारे पैसे पाठविण्याचा एक पर्याय म्हणजे बँक ट्रान्सफर होय. गुगल पे द्वारे तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी बँक ट्रान्सफर हा ऑप्शन दिलेला आहे. तुम्हाला जर बँक ट्रान्सफर द्वारे पैसे पाठवायचे असतील तर तुमच्याकडे समोरच्या व्यक्तीचे बँक डीटेल्स असणे आवश्यक आहे. जसे की समोरच्या व्यक्तीचा बँक अकाउंट नंबर, IFSC Code आणि पूर्ण नाव. इत्यादी बाबी जर असेल तर या माहिती ॲड करून जेवढी रक्कम पाठवायची असेल ती रक्कम ॲड करा आणि UPI PIN टाकून पैसे सेंड करा.

 

4) UPI ID द्वारे:-

गुगल पे च्या माध्यमातून यूपी आयडी द्वारे पैसे पाठवण्यासाठी सर्वप्रथम ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे असेल त्या व्यक्तीच्या गुगल पे अकाउंट मध्ये जाऊन प्रोफाईल मध्ये जा तिथे तुम्हाला तुमची upi id दिसेल . ती UPI id टाकून तुम्ही पैसे पाठवा. यूपी आयडी टाकलं तर समोरच्या व्यक्तीचे नाव तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. नावाची पुष्टी झाल्यानंतर यु पी आय पिन टाकून पेमेंट पूर्ण करा.

 

 

गुगल पे वापरतांना घ्यावयाची काळजी:-

१) गुगल पे द्वारे पैसे पाठविताना नेहमी समोरच्या व्यक्तीचे नाव बरोबर असल्याची खात्री करूनच पेमेंट करावे.

२) गुगल पे द्वारे पैसे रिसीव करण्यासाठी कधीच UPI पिन टाकण्याची गरज नसते. त्यामुळे जर तुम्हाला कोणीही पैसे रिसीव करण्यासाठी UPI pin टाकण्याची मागणी करत असेल तर पिन टाकू नका कारण अशा वेळेस तुमच्या अकाउंट मधून पैसे डेबिट होऊन तुमच्या सोबत धोका होऊ शकतो.

३) गुगल पे च्या माध्यमातून बँक अकाउंट वर पैसे पाठवत असताना समोरच्या व्यक्तीचा बँक अकाउंट नंबर आणि आय एफ सी कोड व्यवस्थित टाकावा.

४) आपला गुगल पे चा UPI pin कधीही कोणाला सांगू नये.

५) upi pin वेळोवेळी बदलत राहावा.

६) गुगल पे वापरताना गुगल प्ले स्टोअर वरील Google pay हेच अँप वापरावे. इतर कोणत्याही ॲप वर गुगल पे ची माहिती ॲड करू नये.

७) Google Pay कधीच ग्राहकाला फोन करून तुमची माहिती विचारत नाही, त्यामुळे तुम्ही कुणालाही तुमची बँक डिटेल कुणालाही सांगू नका.

 

Google Pay संबंधित ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.