बघा बाजारात तुरीला काय दर मिळत आहे? कापसा सह सोयाबीनच्या दराची स्थिती काय? | Market Price

सध्याच्या स्थितीमध्ये तुरीचा बाजार भाव काय आहे याकडे सर्व शेतकऱ्यांची लक्ष लागून आहे कारण अनेक शेतकऱ्यांची नवीन दूर बाजारामध्ये विक्रीसाठी आणली जात आहे, तसेच तुरीच्या घरातील नरमाई कमी झालेली आहे. तसेच तुरीची आवक बाजारामध्ये सरासरीपेक्षा कमी झालेली आहे त्यामुळे याचा फायदा तूर उत्पादक शेतकऱ्यांना चांगला होऊ शकतो.

सरकार अंतर्गत तुरीची बाजारभावानुसार खरेदी करण्यात येणार आहे व त्यामुळे शेतकरी सुद्धा आपल्या तुरीची विक्री करण्यापासून थोडे थांबून आहे, सध्याच्या स्थितीमध्ये बाजारामध्ये तुरीला मिळत असलेला दर 7700 ते 8500 रूपया दरम्यान आहे. तसेच यावर्षी तुरीला चांगला दर मिळू शकतो अशा प्रकारचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे.

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे आवक बाजारामध्ये सुरूच आहे, तसेच सध्याच्या स्थितीमध्ये बाजारात सोयाबीनला मिळत असलेला दर 4400 ते 4700 रुपये दरम्यान भाव मिळत आहे.

यावर्षी कापसाच्या दरामध्ये दबाव कायम आहे कापसाचे दर वाढणार की नाही याबाबत सुद्धा संभ्रम निर्माण झालेला आहे, तसेच बाजारातील कापसाची आवक सुद्धा जास्त आहे व बाजारामध्ये कापसाला मिळत असलेल्या दर हा 6700 ते 7200 रूपया दरम्यान आहे.अशाप्रकारे बाजारामध्ये तूर, सोयाबीन व कापसाला वरील दिलेल्या प्रमाणे दर मिळत आहे.

बघा बाजारात तुरीला काय दर मिळत आहे? कापसा सह सोयाबीनच्या दराची स्थिती काय? | Market Price

शेतकऱ्यांना आता ऑनलाईन पद्धतीने शेतसारा भरता येणार, शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध