शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेच्या अंतर्गत राज्यामध्ये कुसुम योजना राबविण्यात येत आहे. राज्य शासनाच्या महाऊर्जेच्या मार्फत राज्यांमध्ये कुसुम सोलर योजना राबविण्यात येत आहे. अंतर्गत जर तुम्ही अद्याप देखील अर्ज केला नसेल तर महाऊर्जाच्या वेबसाईटवर अर्ज करू शकता.
शेतकरी बांधवांना कुसुम सोलर पंप योजनेच्या अंतर्गत 90% ते 95 टक्के पर्यंतच अनुदान शेतकऱ्यांना सौर कृषी पंप स्थापित करण्यासाठी देण्यात येत आहे. यासाठी महाऊर्जा अर्ज स्वीकारते तसेच योजनेअंतर्गत काही घटक हे महावितरण कडे सुद्धा देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी महावितरण कडे वीज जोडणी साठी अर्ज केलेला आहे तसेच अर्ज करून रक्कम ही भरलेली आहे परंतु अद्याप देखील वीज कनेक्शन मिळालेली नाही अशा देखील शेतकऱ्यांना सोलर पंप मिळणार आहे.
जर तुम्ही या घटकांमध्ये मोडत असाल तर तुम्ही महावितरणच्या वेबसाईटवर जाऊन या संदर्भात अधिक माहिती घेऊन अर्ज करू शकतात लवकरच याकरिता नवीन पोर्टल देखील लॉन्च करण्यात येणार आहे.
अंतर्गत लाभ मिळण्यासाठी महाऊर्जाच्या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची आहे त्याकरिता पंधरा रुपये एवढे शुल्क आकारण्यात येत आहे. शेतकरी बांधवांना कुसुम योजनेचा लाभ हा केवळ महाऊर्जाच्या वेबसाईटवरून मिळतो त्यामुळे इतर कोणत्याही बनावट वेबसाईटवरून अर्ज करून फसवणूक करून घेऊ नये.
कुसुम योजना अर्ज कसा करायचा?
1. सर्वात प्रथम योजनेच्या महऊर्जा या अधिकृत संकेतस्थळावर जा.
2. तिथे तुम्हाला सोलर योजना जे घटक चालू आहे याची माहिती दिसेल.
3. त्यानंतर अर्ज करा किंवा नोंदणी करा या पर्याय वर क्लिक करुन अर्ज ऑनलाईन करा.
4. नोंदणी केल्या नंतर जो तुम्हाला aplication no भेटल तो जपून ठेवा.
महाऊर्जा चे अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
वरील करून तुम्ही महाऊर्जेचा अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता आणि त्या ठिकाणाहून अर्ज देखील करू शकतात.