शेतकऱ्यांना आता ऑनलाईन पद्धतीने शेतसारा भरता येणार, शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध | Shetsara Online

शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना शेतसारा भरण्यासाठी आता तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही, ऑनाइन पद्धतीने सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे व त्यावरून ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना शेतसारा भरता येणे शक्य झालेले आहे त्यामुळे घरबसल्या शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने शेतसारा भरता येईल.

शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने शेत सारा भरण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालया अंतर्गत ई चावडी या संगणक प्रणालीमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने छेद सारा भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना https://echawadicitizen.mahabhumi.gov.in या संकेत स्थळावर जाऊन शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने शेतसारा भरता येईल.

फक्त शेत सारा भरण्यापुरतेच हे संकेतस्थळ मर्यादित नसून शेतकऱ्यांना थकीत कराची रक्कम सुद्धा त्यामध्ये बघता येणे शक्य होईल. ऑनलाइन पद्धतीने शेत सारा भरताना शेतकऱ्यांकडे काही आवश्यक कागदपत्रे असावी लागतात त्या कागदपत्रांशिवाय शेत सारा भरता येणार नाही. त्यामध्ये आधार कार्ड, ई-मेल आयडी, तसेच मोबाईल क्रमांक यांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांना आता ऑनलाईन पद्धतीने शेतसारा भरता येणार, शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध | Shetsara Online

शेतकऱ्यांवर शेतातील डीपी बिघडली, अशा पद्धतीने तक्रार करून तीन दिवसात डीपी मिळवा