UPI म्हणजे काय? यूपीआय चे फायदे; UPI कसे वापरायचे संपूर्ण माहिती

 

आजच्या या पोस्टमध्ये आपण UPI म्हणजे काय? यूपीआय चे फायदे संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्याच बरोबर upi ने पैसे कसे पाठवायचे याविषयी सुद्धा माहिती पाहणार आहोत. आजच्या डिजिटल युगात यूपीआय(UPI) हे खूप मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येत आहे. यूपीआय(UPI) च्या साह्याने आपण संपूर्ण भारत देशात कोणत्याही ठिकाणी ऑनलाइन परिस्थिती पेमेंट करू शकतो. शॉपिंग, बिल पेमेंट, पैशांची देवाण तसेच इतर ऑनलाईन सुविधा आपल्याला युपीआय मध्ये मिळतात.

 

UPI म्हणजे काय? यूपीआय चे फायदे; UPI कसे वापरायचे संपूर्ण माहिती
UPI म्हणजे काय? यूपीआय चे फायदे; UPI कसे वापरायचे संपूर्ण माहिती

 

 युपीआय म्हणजे काय? (What is UPI in Marathi) :-

 

UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI – Unified Payment Interface) होय. Upi आपल्याला अशी सुविधा प्रदान करते, ज्यामध्ये आपण आपल्या अनेक वेगवेगळ्या बँक अकाऊंट ला एकाच मोबाईल अँप मध्ये लिंक करून एकत्र आणू शकतो. आणि या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये आपण अनेक ऑनलाईन व्यवहार करू शकतो जसे की, पैसे पाठविणे, बिल पेमेंट करणे, शॉपिंग करणे, पैसे रिसिव्ह करणे अश्या प्रकारची अनेक डिजिटल कामे आपण upi च्या मदतीने करू शकतो. UPI Meaning in Marathi , how to use UPI in Marathi

 

हे नक्की वाचा:- Google Pay काय आहे? ते कसे वापरायचे संपूर्ण माहिती

 

आजच्या काळात ऑनलाईन व्यवहार करणे अतिशय सोपे झाले. जेव्हापासून भारतात UPI आले तेव्हा पासून upi चा वापर हा भारत देशात खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. Upi च्या साह्याने पैसे पाठवण्यासाठी अनेक डिजिटल ऍप हे उपलब्ध आहे. Upi ने संपूर्ण भारत देशात ऑनलाइन पद्धतीने निवड करणे सुलभ केलेले आहे. अगदी भाजीपाला विक्री त्यांपासून हे मोठ मोठ्या मॉलमध्ये UPI च्या साह्याने ऑनलाइन पद्धतीने पेमेंट रिसीव करण्यात येत आहे. Upi हे एक सुरक्षित डिजिटल पेमेंट पद्धत आहे, जी आपण आपल्या सोयी नुसार केव्हाही वापरू शकतो.

 

 

 

आपल्या भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी संपूर्ण भारत देशात डिजिटल इंडिया मोहीम राबवली होती. ह्याच मोहिमेतून पाठिंबा देण्यासाठी आपल्या भारत देशात UPI Payment System ही सुरू करण्यात आली होती. Upi आल्यापासून ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करणे अतिशय सोपे झालेले आहेत. आपल्या देशातील सर्व नागरिकांनी डिजिटल पद्धतीने व्यवहार करावेत. कॅशलेस व्यवहार करावेत यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया मोहीम राबवली होती. तेव्हापासून भारतात ऑनलाईन पद्धतीने व्यवहार खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. UPI information in Marathi

 

हे नक्की वाचा:- demat account म्हणजे काय आहे? ते कसे ओपन करावे

 

UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI – Unified Payment Interface) हे एक पेमेंट सिस्टम आहे. Upi चा वापर आपण कॅशलेस व्यवहार करण्यासाठी वापरतो. भारतातील सर्व बँकिंग व्यवहारांवर NPCI चे नियंत्रण आहे. NPCI भारताची बँकिंग व्यवस्था मॅनेज करते. भारतीय रिझर्व बँक आणि इंडियन बँक असोसिएशन यांनी NPCI ची स्थापना केली आहे. UPI अंतर्गत करण्यात येणारे डिजिटल व्यवहार हे NPCI च्या नियंत्रणात आहेत.

 

 

अनेक बँकांचे व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने आपण UPI ( Unified Payment Interface) च्या माध्यमातून करू शकतो. आपले बँक अकाऊंट त्या विशिष्ट upi आधारित अँप सोबत जोडलेले असावे लागते. UPI च्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करताना आपल्याला UPI ID मिळत असते, जिच्या माध्यमातून आपण पेमेंट स्वीकार करू शकतो.

 

 

UPI द्वारे ऑनलाईन व्यवहार करण्याचे फायदे (Benifits of UPI in Marathi) :-

 

१) upi द्वारे ऑनलाईन व्यवहार करताना आपण UPI id च्या साहाय्याने पैसे पाठवू शकतो.

२) पैसे पाठवण्याची तसेच रिसिव्ह करण्याची upi ही अतिशय जलद आणि सोप्पी पद्धत आहे.

३) upi वरून करण्यात येत असलेले सर्व ऑनलाईन व्यवहार हे मुफ्त आहेत. यासाठी कोणतेही शुल्क बँक आपल्याला आकारत नाहीत.

४) upi च्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्यासाठी आपण कोणत्याही UPI Payment App चा वापर करू शकतो. जसे की, फोन पे, गूगल पे, paytm अशा कोणत्याही अँप मधून व्यवहार करता येतात.

५) Upi ही सेवा आपल्याला दिवसाचे 24 तास उपलब्ध आहे तसेच वर्षाचे 365 दिवस ही सुविधा उपलब्ध आहे.

 

हे सुद्धा वाचा:- शेअर मार्केट म्हणजे काय? गुंतवणूक कशी करायची 

 

UPI सुविधा पुरविणारे अँप (UPI Payments Apps) :-

१) BHIM App

२) Google Pay

३) Amazon Pay

४) PhonePe

५) Paytm

 

 

UPI कसे वापरायचे ( How to use UPI) :-

Upi च्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करण्यासाठी वरील पैकी कोणतेही एक मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकतात. त्यामध्ये तुमची बँक ॲड करा upi पिन तयार करून घ्या. बँक ऍड झाल्यानंतर तुम्ही त्या मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये upi च्या साह्याने ऑनलाईन व्यवहार करू शकतात.

 

 

अशाच महत्वपूर्ण माहिती वेळेवर मिळविण्यासाठी आमच्या teligram चॅनल ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा.