एटीएमची संपूर्ण माहिती ATM Information In Marathi

 

आजच्या या पोस्ट मध्ये आपण एटीएम बद्दल माहिती माहिती पाहणार आहोत. एटीएम मुळे ग्राहकांना बँकेत न जाता कोणताही काढण्याचा फॉर्म न भरता एटीएम वर जाऊन त्वरित आणि कोणत्याही ठिकाणी पैसे काढता येते. एटीएम हे एक संगणकीकृत उपकरण आहेत, ज्याच्या साहाय्याने ग्राहकांना बँकिंग च्या आर्थिक हस्तांतरण च्या विविध सेवा पुरविल्या जातात. जसे की, पैसे काढणे, बँक बॅलन्स चेक करणे, एटीएम पिन चेंज करणे, एटीएम पिन क्रिएट करणे इत्यादी.

 

एटीएमची संपूर्ण माहिती ATM Information In Marathi

 

 

 

 

एटीएम मुळे ग्राहकांना कोणत्याही ठिकाणी पैसे काढण्याची  सुविधा मिळत असल्यामुळे ग्राहक बाहेरगावी गेल्यास त्या गावातील कोणत्याही एटीएम मधून रोख काढू शकतात. एटीएम मधून पैसे काढण्यासाठी त्याच बँकेच्या एटीएम मध्ये जावे असे काही नियम नाहीत, आपण कोणत्याही एटीएम मधून कोणत्याही बँकेचे पैसे काढू शकतो. ATM information in Marathi,एटीएमची संपूर्ण माहिती

 

हे नक्की वाचा:- Google Pay अकाऊंट काय आहे? ते कसे ओपन करावे.

 

एटीएम ही एक एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. जी तुम्हाला अनेक ठिकाणी पाहावयास मिळत असते. एटीएम मशीन मध्ये पैसे ठेवून असतात. एटीएम मध्ये कार्ड टाकण्यासाठी जागा असते त्याच प्रमाणे आपण पैसे विड्रॉल केल्यानंतर ग्राहकांना  पैसे देण्यासाठी सुद्धा जागा असते.

 

 

 

एटीएम मराठी अर्थ (ATM meaning in marathi) :-

ATM ला मराठीत स्वयंचलित टेलर मशीन असे म्हणतात. एटीएम ही एक स्वयंचलित संगणकीकृत मशीन आहे, ज्याद्वारे ग्राहक बँकेत न जाता atm मधुन त्वरित पैसे काढू शकतात.

 

हे नक्की वाचा:- UPI म्हणजे काय ते कसे वापरायचे

 

 

ATM म्हणजे काय ? (What is an ATM-Automated teller machine?):-

 

एटीएम मशीन मधून आपण atm card च्या साहाय्याने पैसे काढू शकतो. एटीएम कार्ड हे ग्राहकांना बँकेमधून मिळत असते. बँकेकडे एटीएम कार्ड साठी अर्ज केल्यानंतर आपल्याला एटीएम कार्ड देत असते. एटीएम कार्डचा एटीएम पिन असतो तो आपल्याला एटीएम कार्ड व्यवहार करताना प्रविष्ट करावा लागत असतो.

 

एटीएम कार्ड च्या साह्याने आपण पैसे काढू शकतो आणि पैसे टाकण्याची सुद्धा सुविधा एटीएम कार्ड वर उपलब्ध करण्यात आलेली आहे. एटीएम मुळे पैसे जमा करणे आणि पैसे काढणे अतिशय सोपे झाले आहे. कारण बँकेत न जाता आपण एटीएम च्या मदतीने पैसे जमा आणि काढू शकतो.

 

हे नक्की वाचा:- डिमॅट अकाउंट काय आहे? ते कसे ओपन करावे

 

 

एटीएम ला ऑटोमेटेड टेलर मशीन असे म्हणतात. एटीएम च्या मदतीने आपण आपल्या बँकेतील रक्कम काढू शकतो तसेच जमा करू शकतो. तसेच एटीएम च्या मदतीने आपण रक्कम दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करू शकतो. एटीएम चा वापर केल्यामुळे आपला वेळ वाचतो कारण एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आपल्याला बँकेच्या रांगेत उभे राहण्याची गरज पडत नाही. ATM मधून पैसे काढले नंतर आपल्याला पैसे काढले ची पावती सुद्धा मिळत असते.

 

 

ATM चा फुल फॉर्म ( Full form of ATM) :-

ATM चा फुल फॉर्म हा Automated teller machine असा आहे. ही एक स्वयंचलित तसेच संगणकीकृत मशीन आहे. जी ग्राहकांना बँकेच्या रोखीच्या सुविधा पुरविते.

 

 

ATM चा शोध कोणी लावला? Who invented the ATM?

जॉन शेफर्ड बॅरन यांनी या atm यंत्राचा शोध लावला होता.

 

 

एटीएम मधून पैसे कसे काढण्याची प्रक्रिया? (How to withdraw money from ATM?)

 

एटीएम मधून पैसे काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळील कोणत्याही एटीएम मध्ये जावे लागेल. एटीएम मध्ये गेल्यानंतर त्या एटीएम मशीन मध्ये तुमचे एटीएम कार्ड टाकावे लागेल. एटीएम कार्ड टाकल्यानंतर तुमच्या समोर भाषा चा ऑप्शन दिसेल. त्याठिकाणी तुम्ही तुमची भाषा निवडू शकतात जसे की इंग्रजी मराठी हिंदी. तुमची भाषा निवडल्यानंतर तुम्हाला विविध ऑप्शन दिसतील त्यामध्ये बँक विड्रॉल नावाच्या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला विड्रॉल करावयाची रक्कम प्रविष्ट करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा एटीएम पिन टाकावा लागेल. एटीएम पिन टाकल्यानंतर तुमचा ट्रांजेक्शन सक्सेसफुली होऊन तुम्हाला तुमचे पैसे मिळतील त्यानंतर  तुम्हाला तुमचे atm कार्ड काढून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्ही क्लोज बटन दाबून तुमचे कनेक्शन क्लोज करून घ्या.

 

 

 

ATM चे प्रकार कोणते आहेत (Types of ATM in marathi):-

 

1) ब्राऊन लेबल एटीएम:-

ब्राऊन लेबल एटीएम म्हणजे असे एटीएम होय की जे स्वतः बँकेद्वारे चालवली जात नाही. परंतु हे ब्राऊन लेबल एटीएम तृतीय पक्ष द्वारे चालवली जाते हे लिजवर घेतलेली एटीएम असतात. म्हणून या एटीएमला ब्राऊन लेबल एटीएम म्हणतात. एटीएम माहिती मराठी

 

 

2) व्हाईट लेबल एटीएम:-

व्हाईट लेबल एटीएम हे बँकिंग कंपनीच्या मालकीचे नसतात. हे इतर कंपन्या द्वारे चालविले जातात. म्हणजे एटीएम बिगर बँकिंग कंपनीच्या मालकीचे असल्यामुळे याला व्हाईट लेबल एटीएम म्हणतात.

 

 

3) ऑफसाईट एटीएम:-

ऑफसाईट एटीएम हे असे एटीएम असतात जे बँकेच्या परिसरापासून बाहेर दूरवर चालविण्यात येत असतात. हे एटीएम बँकेचा जवळपास नसतात परंतु निवासी सोसायटी, मॉल अशा ठिकाणी ऑफसाईट एटीएम असतात.

 

 

4) ऑनसाइट एटीएम:-

ऑन साईट एटीएम हे बँकेच्या परिसरात चालवले जात असतात त्यामुळे यांना ऑन साईट एटीएम म्हणतात. ऑन साईट एटीएम हे बँकेला लागून जवळपास असतात

अशा प्रकारे एटीएम चे प्रकार पडतात. जे विविध बाबींवरून ठरवण्यात येत असतात.

 

आजच्या काळात पैसे काढण्यासाठी तसेच पैसे जमा करण्यासाठी एटीएम हे एक महत्त्वाचे साधन ठरले आहे. एटीएम मध्ये पैसे काढण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी झालेली आहे. आपल्याला आपल्या जवळपास अनेक एटीएम दिसतात. थोड्या थोड्या अंतरावर एटीएमची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांना पैसे काढण्यासाठी जास्त वेळ वर्थ घालण्याची ची गरज पडत नाही.

 

 

अशाप्रकारे आपण एटीएम विषयी संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये पाहिलेली आहे जर तुम्हाला ही माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा आणि आपल्या टेलिग्राम चैनल ला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

Leave a Comment