E-Banking म्हणजे काय? E-Banking Information Marathi | ई-बँकिंग चे प्रकार, फायदे आणि तोटे

 

आजचे युग हे डिजिटल युग आहे. या डिजिटल युगात सर्वच गोष्टी ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. आपण मोबाईलच्या साह्याने सर्व गोष्टी झटक्यात ऑनलाइन पद्धतीने करू शकतो. या आधुनिक डिजिटल युगामध्ये आपल्याला कोणतेही व्यवहार करण्यासाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज पडत नाही. आपण अनेकदा ई-बँकिंग बद्दल ऐकले असेल. आजच्या पोस्ट मध्ये आपण E-Banking म्हणजे काय? E-Banking Information Marathi | ई-बँकिंग चे प्रकार! फायदे आणि तोटे या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. What is E-banking in Marathi

E-Banking म्हणजे काय? E-Banking Information Marathi | ई-बँकिंग चे प्रकार, फायदे आणि तोटे
E-Banking म्हणजे काय? E-Banking Information Marathi | ई-बँकिंग चे प्रकार, फायदे आणि तोटे

जेव्हा पासून आपल्या देशात इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्या तेव्हापासून अनेक गोष्टी या ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होत आहे. आपण कोणतेही काम घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने करू शकतो. जेव्हापासून आपल्या देशात भारत सरकारच्या वतीने डिजिटल इंडिया मोहिमेला सुरुवात केली. तेव्हापासून आपल्या भारत देशात संपूर्ण डिजिटलायझेशन करण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. डिजिटल इंडिया मोहिमेपासून ई-बँकिंग सारख्या गोष्टी झपाट्याने वाढत आहेत. E-Banking अंतर्गत बँकेशी संबंधित सर्व व्यवहार आता ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. आपण एका जागेवर बसून मोबाईल किंवा कम्प्युटर च्या साहाय्याने बँकेच्या सर्व सेवासुविधा ऑनलाईन पद्धतीने वापरू शकतो. यासाठी आपल्याला बँकेत जाण्याची गरज पडत नाही.

 

ई- बँकिंग म्हणजे काय? (What is E-banking in Marathi):-

ई- बँकिंग म्हणजे “इलेक्ट्रॉनिक बँकिंग” होय. ई बँकिंग म्हणजे इंटरनेटच्या सहाय्याने बँकेतील सर्व व्यवहार आपण घरबसल्या आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या सहाय्याने करू शकतो. ई बँकिंग मध्ये आपल्याला बँकेमध्ये जाण्याची आवश्यकता भासत नाही. ही बँकिंगच्या सहाय्याने आपण बँकेतील बॅलन्स चेक करणे, बँक स्टेटमेंट मिळवणे, तसेच इतरांना ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठविणे, इतरांकडून पैसे रिसिव्ह करणे अशा प्रकारची अनेक कामे आपण E-banking च्या साहाय्याने अतिशय जलद गतीने घर बसल्या करू शकतो. E-banking information in Marathi

इ बँकिंग प्रणाली मध्ये बँकेतील सर्व व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे बँकेच्या समोर गर्दी मध्ये रांगेत उभे राहणाऱ्या लोकांची संख्या कमी झालेली आहे. तसेच डिजिटल व्यवहारात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तसेच ई बँकिंग मध्ये आपण सुरक्षितपणे व्यवहार करू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त लोक हे ई बँकिंग चा वापर करण्याचा प्रयत्न करत आहे.

E- banking सुरू करण्यासाठी तुमचे बँकेत खाते असावे लागते तसेच तुमच्याकडे atm आणि इंटरनेट सुविधा असली पाहिजे. E-Banking( Electronic Banking) ला इंटरनेट बँकिंग, ऑनलाईन बँकिंग, इ-बँकिंग, वेब बँकिंग किंवा आभासी बँकिंग अशी नावे आहेत. ई बँकिंग मुळे बँकेतील अनेक सुविधा आपण स्वतः ऍक्सेस करू शकतो त्यामुळे आपण बँकेत न जाता मोबाईलवरून बँक अकाऊंट हाताळण्याची जाणीव होते.

हे नक्की वाचा:- Google Pay अकाऊंट काय आहे? ते कसे ओपन करावे.

ई- बँकिंग च्या साहाय्याने खालील व्यवहार करण्यात येतात:-

१)बँक अकाउंट ची प्रिंट मिळविणे
२) अकाउंट मध्ये पैसे जमा करण्याची पैसे काढणे आणि इतरांना पैसे पाठवणे.
३) धनादेश मिळविले
४) मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, बिल पेमेंट
५) Neft, rtgs, imps आणि upi चा वापर करून व्यवहार करू शकतात.
६) नवीन बँक अकाऊंट तयार करू शकतो.

ई बँकिंग मध्ये खालील व्यवहार केले जातात:-

1) RTGS (Real Time Gross Settlement) रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट:-

ई बँकिंग मध्ये वापरण्यात येणारी आरटीजीएस ही एक महत्वपूर्ण पद्धत आहे. जर आपल्याला दोन पेक्षा जास्त वेळा पैसे ट्रान्सफर करायचे असल्यास आपण ज्या रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट पद्धतीचा वापर करू शकतो. आरटीजीएस चा वापर करताना आपल्याला कोणतीही अप्पर कॅप लावली जात नाही. RTGS द्वारे पैसे पाठवल्यास त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी तीस मिनिटे एवढा वेळ लागतो.

2) NEFT (National Electronic Fund Transfer) नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर:-

NEFT हा पैसे पाठवण्याचा एक अतिशय सोपा प्रकार आहे. Neft द्वारे पैसे पाठवण्यात येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. जर तुम्हाला नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर द्वारे पैसे पाठवायचे असल्यास तुम्हाला ज्या व्यक्तीच्या अकाउंट मध्ये पैसे पाठवायचे आहे तिचा खाते नंबर आणि आयएफसी कोड माहिती असणे आवश्यक आहे.

3) IMPS (Immediate Payment Service) आय एम पी एस:-

IMPS ही पैसे पाठविण्याची त्वरित सेवा आहे. आय एम पी एस द्वारे पैसे पाठविल्यास त्वरित पैसे जमा होत असतात. तसेच आय एम पी एस द्वारे आपण कधीही पैसे पाठवू शकतो. Imps द्वारे आपण 24/7 पैसे ट्रान्स्फर करू शकतो.

4) UPI (Unified Payments Interface)युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस:-

UPI ही पैसे पाठवण्याची अतिशय सोपी आणि जलद प्रक्रिया आहे. UPI द्वारे पैसे पाठविण्यासाठी आपल्याला बँक अकाउंट नंबर आणि आय एफ सी कोड ची गरज पडत नाही. UPI द्वारे  पैसे पाठवण्यासाठी आपण मोबाईल नंबर द्वारे VPA (व्हर्च्युअल पेमेंट अ‍ॅड्रेस) द्वारे पैसे पाठवू तसेच रिसीव करू शकतो. अँड्रॉईड स्मार्ट फोन द्वारे आपण upi चा वापर करून पैसे चे व्यवहार करू शकतो. ही UPI सेवा 24/7 केले जातात.

हे नक्की वाचा: UPI म्हणजे काय? UPI ने पैसे कसे पाठवायचे? संपूर्ण माहिती मराठी मध्ये

5) Cheque (धनादेश):-

चेकद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याकडे चेक बुक असणे आवश्यक असते. चेक चे अनेक प्रकार पडतात. चेकवर स्वाक्षरी करून आपण दुसऱ्या व्यक्तीला तो धनादेश देऊन पैसे ट्रान्सफर करू शकतो..

ई बँकिंग ही सुविधा कशी वापरायची | How To Use E- Banking In Marathi :-

ई बँकिंग या पद्धतीचा वापर करण्यासाठी तुमच्याकडे एक बँक खाते असणे  आवश्यक असते. तसेच तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला ई बँकिंग चा वापर करायचा असेल आले तर तुम्ही बँकेत जाऊन युजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकता. किंवा बँका या ऑनलाईन पद्धतीने युजर आयडी आणि पासवर्ड पुरवीत असतात.

ई बँकिंग चा पासवर्ड आणि युजरनेम ऑनलाईन पद्धतीने मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही त्या बँकेच्या ऑफिशिअल वेबसाईट वर जा तिथे जाऊन नेट बँकिंग या पर्यायावर क्लिक करून तुम्ही समोरील प्रक्रिया पूर्ण करून username आणि password मिळवू शकतात. त्यानंतर लॉगिन करून घ्यायला लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर अनेक ऑप्शन्स दिसतील. त्यामध्ये तुमचे नाव असेल तिथे तुम्हाला तुमचा बँक अकाउंट नंबर दिसत असेल त्याचप्रमाणे बँक बॅलन्स, बँकेचे मागील व्यवहार आणि बँक स्टेटमेंट पाहता येते तसेच इतर अनेक सुविधा या तुम्हाला या ठिकाणी पाहता येतात. तसेच पैसे ट्रान्सफर करण्याची ही सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळते.

ई- बँकिंग चे फायदे (Advantages Of E Banking In Marathi) :-

E banking information in Marathi

1. ई बँकिंग चा वापर आपण वर्षाचे 365 दिवस आणि दिवसातून 24 तास करू शकतो.
2. ई बँकिंग चा सर्वात मोठा फायदा म्हणजे ई बँकिंगद्वारे व्यवहार आपण घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने मोबाईल किंवा कम्प्युटरच्या सहाय्याने करू शकतो.
3. ई बँकिंग द्वारे आपण  बिल पेमेंट, मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, पैसे ट्रान्सफर इत्यादी सेवा घरबसल्या करू शकतो.
4. ई बँकिंग च्या साह्याने आपण ऑनलाईन पासबुक चेक करू शकतो आपले बँक बॅलन्स चेक करू शकतो.

हे नक्की वाचा:- ATM ची संपूर्ण माहिती मराठी मध्ये

ई-बँकिंगचे तोटे (Disadvantages Of E Banking In Marathi):-

E-banking information in Marathi language

1. ई बँकिंगचे व्यवहार हे सुरक्षित जरी असले तरी सुद्धा आपण आपला युजरनेम आणि पासवर्ड इतरांना माहीत झाल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो.
2. इतरांच्या डिवाइस वरून की बँकिंग प्रणालीचा वापर केल्यास त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो.
3. नेट बँकिंग मधून होणारे व्यवहार हे ऑनलाईन होत असल्यामुळे एखाद्यावेळेस बँकेची लिंक नसल्यास ते व्यवहार फेल होतात त्यामुळे आपल्याला अडचण येऊ शकते.
4. आपल्याकडे इंटरनेट कनेक्शन नसेल तर आपण नेट बँकिंगचा वापर करू शकत नाही.

ई- बँकिंग चा वापर करतांना खालील बाबींची काळजी घ्यावी:- The following things should be taken care of while using e-banking

ई बँकिंग चा वापर करत असताना होणारे सर्व व्यवहार ऑनलाइन असल्यामुळे आपल्या बँकिंगला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी खालील काळजी घेणे आवश्यक आहे.

ई बँकिंग करत असताना स्वतःच्या मोबाईल किंवा स्वतःच्या कम्प्युटरवरून करण्यात यावी. नेहमी ऑफिशिअल वेबसाईट वरूनच ई-बँकिंग करावी. आपल्या नेट बँकिंग चा युजरनेम आणि पासवर्ड कोणालाही सांगू नये तसेच कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पासवर्ड इतरांना शेअर करू नये. नेट बँकिंग करत असताना आपला पासवर्ड नेहमी चेंज करत रहावा.

अशीच महत्वपूर्ण माहिती वेळेवर मिळविण्यासाठी आमच्या teligram चॅनल ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा.