मित्रांनो आजचे हे युग डिजिटल युग आहे. या डिजिटल युगात ऑनलाईन पद्धतीने पैसे कमविण्याचे अनेक प्रकार आहेत. सोशल मीडिया, ब्लॉग, वेबसाईट इत्यादी च्या माध्यमातून आपण ऑनलाइन पद्धतीने पैसे कमवू शकतो. या प्लॅटफॉर्म चा वापर करून तुम्ही कोणत्याही कंपनी ची जाहिरात करून पैसे कमवू शकतात. तसेच त्या कंपनीची वस्तू तुम्ही विकून देऊन कमीशन मिळवू शकतात. अश्या अनेक प्रकारच्या सेवा व सुविधा पुरवून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पैसे कमवू शकतात.
आजच्या या पोस्टमध्ये आपण अशाच एका विषय म्हणजे Affiliate Marketing काय आहे? हे कसे कार्य करते, या Affiliate Marketing चा अर्थ काय आहे, आणि या Affiliate Marketing करुन ऑनलाईन पैसे कसे कमवायचे या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आपण आज एफिलिएट मार्केटिंग विषयी माहिती पाहत आहेत. Affiliate Marketing सर्वात जास्त कमाई करण्याचे साधन आहे. ऑनलाईन पद्धतीने पैसे कमविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे affiliate marketing होय. अगदी सोप्या पद्धतीने आम्ही तुम्हाला affiliate marketing समजावून सांगितलेली आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण की ह्या गोष्टी फक्त काहीच लोकांना माहीत असतात, आणि ज्यांना माहीत असतात. ते या गोष्टीचा परिपूर्ण फायदा घेऊन भरपूर पैसा कमवत आहेत.एफिलिएट मार्केटिंग माहिती मराठी मध्ये.
हे नक्की वाचा:- mutual fund म्हणजे काय? गुंतवणूक कशी करायची?
Affiliate Marketing म्हणजे काय आहे?(what is affiliate marketing in marathi) :-
Affiliate Marketing(एफिलिएट मार्केटिंग) ही एक प्रकारे मार्केटिंग करण्याची पद्धत आहे, जिच्या मध्ये आपण स्वतः प्रत्यक्ष जाऊन मार्केटिंग करत नाहीत तर या एफिलिएट मार्केटिंग मध्ये आपण ब्लॉग(blog) किंवा यूट्यूब चॅनल(youtube channel) किंवा सोशल मीडिया तसेच इमेलींग च्या माध्यमातून दुसऱ्या कंपनीची जाहिरात करतो. आपण आपल्या प्लॅटफॉर्म वर त्या कंपनीच्या वस्तूला दाखवून प्रोमोट करतो. आणि ती वस्तू आपल्या प्लॅटफॉर्म वरून लोकांनी खरेदी केल्यास ज्या कंपनीची आपण वस्तू ग्राहकांना आपल्या प्लॅटफॉर्म वर विकून दिली ती कंपनी आपल्याला त्या बदल्यात कमीशन देत असते.
हे नक्की वाचा:- डिमॅट अकाउंट काय आहे? जसे ओपन करायचे?
एकंदरीतच आपण आपल्या प्लॅटफॉर्म वर दुसऱ्या कंपनीची वस्तू ऑनलाईन जाहिरात करून विकून देणे आणि त्या बदल्यात कंपनीकडून कमीशन मिळवणे म्हणजे एफिलिएट मार्केटिंग होय. मिळणारे कमीशन हे त्या वस्तूच्या किमतीच्या टक्केवारी नुसार असू शकतात. किंवा निश्चित रक्कम देखील असू शकते.
एफिलिएट मार्केटिंग कसे कार्य करते ? How Affiliate Marketing Works :-
अनेक कंपन्या त्यांचे प्रॉडक्ट हे लोकांनी विकावे. म्हणजेच त्यांचे प्रॉडक्ट हे लोकांनी त्यांच्या प्लॅटफॉर्म वर विकून द्यावे. यासाठी affiliate marketing program हे राबवित असते. या मध्ये प्रॉडक्ट विकून देणाऱ्या लोकांना ह्या कंपन्या वेगवेगळे कमीशन ठरवून देत असतात. आता ज्या व्यक्तीला एफिलिएट मार्केटिंग करावयाची असते. असे ब्लॉग लीहणारे व्यक्ती तसेच वेगवेगळ्या वेबसाईट चालविणारे व्यक्ती तसेच YouTube channel चालविणारे व्यक्ती हे या कंपनीने ऑफर केलेल्या affiliate program मध्ये सहभागी होतात. त्या एफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम ऑफर करणाऱ्या कंपनी कडे नोंदणी करतात. आणि जी वस्तू आपल्या प्लॅटफॉर्म वर विकायची म्हणजेच जाहिरात करावयाची असते. त्या वस्तू ची लिंक किंवा बॅनर हे त्या कंपनी कडून घेत असते, आणि आपल्या प्लॅटफॉर्म(ब्लॉग, यूट्यूब चॅनल) वर व्यवस्थित पद्धतीने टाकते. आणि त्या व्यक्तीच्या ब्लॉग तसेच YouTube channel वर बरेच लोकं येतात आणि त्या लिंक वर किंवा बॅनर वर क्लिक केल्यास directly त्या affiliate program ऑफर केलेल्या कंपनीच्या वेबसाईट वर त्या जाहिरात केलेल्या प्रॉडक्ट वर पोहचते. आणि जर ती वस्तू ग्राहकाने खरेदी केली तर त्या बदल्यात त्या जाहिरात करणाऱ्या ब्लॉग तसेच यूट्यूब चॅनल मालक किंवा जाहिरात करणाऱ्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म मालकाला कमीशन मिळत असते.अशा प्रकारे affiliate marketing he कार्य करत असते.Affiliate Marketing द्वारे पैसे कसे कमवावे – how to earn money from affiliate marketing in marathi Affiliate Marketing(एफिलिएट मार्केटिंग)
Affiliate Marketing program offer करणाऱ्या कंपन्यांची उदाहरणे:-
Amazon, Flipkart, go dady, Hostgator, Bluehost, अश्या अनेक कंपन्या ह्या त्यांचा एफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम ऑफर करत असते.
हे नक्की वाचा:- शेअर मार्केट काय आहे? शेअर मार्केट गुंतवणूक कशी करायची?
Affiliate Marketing द्वारे पैसे कमविण्यासाठी टिप्स:-
तुम्ही सुद्धा Affiliate Marketing द्वारे भरपूर पैसे कमवू शकतात. त्यासाठी तुम्ही ब्लॉग किंवा यूट्यूब चॅनल ओपन करून सुरुवातीला audience मिळवा. जर तुमच्याकडे जास्त audience असेल तर जास्त वस्तू विकल्या जाऊन जास्त पैसे मिळतात. तुमच्याकडे ज्या पद्धतीने audience आहेत त्या नुसार तुम्ही प्रॉडक्ट विका. जसे की तुमचा एकधा ब्लॉग किंवा यूट्यूब चॅनल हे technology विषयावर माहिती देत असेल तर तुम्ही मोबाईल फोन, हेड फोन, चार्जर किंवा इतर technology संबंधित वस्तू विकू शकतात. जर तुम्ही gym किंवा work out वर माहिती देत असाल तर तुमच्या प्लॅटफॉर्म वर gym suppliment, protin powder अश्या वस्तू विकू शकतात.
अश्या पद्धतीने Affiliate Marketing कार्य करते. जर तुम्हाला ही पोस्ट महत्वाची वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा…. Thanks for reading