शेतातील बांध कोरणाऱ्याला असा शिकवा धडा | आपल्या शेत जमिनीवर अतिक्रमण केल्यास काय करावे?

मित्रांनो आपण पाहत असतो की, अनेक लोकांची शेत जमिनीच्या बांधावरून भांडणे चालू असतात. आपल्या शेत जमिनीवर कोणी तरी कब्जा करण्याचा प्रयत्न करत असतो. बरेच लोक हे बांध कोरण्यात एक्स्पर्ट असतात. त्यामुळे अशा लोकांना कायदेशीर धडा शिकवे आवश्यक असते. जर कुणी तुमच्या जमिनीवर अतिक्रमण केले असेल तर आपण कायदेशीर पद्धतीने ते काढू शकतो. त्यामुळे आजच्या या पोस्ट मध्ये आपण शेत जमीन वरील अतिक्रमण हे कायदेशीर पद्धतीने कसे काढले जातात या विषयी संपूर्ण माहिती माहित करून घेणार आहोत, त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

 

अतिक्रमण म्हणजे नेमके काय :-

थोडक्यात अतिक्रमण म्हणजे दुसऱ्याची जमीन आपल्या हिस्यात घेणे त्यांच्या जमिनीवर ताबा करून ती जमीन स्वतः वापरात आणून स्वतःचीच आहे असे भासविणे होय.

 

शेतातील बांध कोरणाऱ्याला असा शिकवा धडा | आपल्या शेत जमिनीवर अतिक्रमण केल्यास काय करावे?

शहरी भागात असो किंवा ग्रामीण भागात अतिक्रमण हे बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. ग्रामीण भागात अगदी सख्खी भावंडे ही बांधा साठी भांडत असतात. जर आपल्या बांधावर खुणा नसेल तर शक्यतो अतिक्रमण करण्याचे किंवा बांध कोरणाऱ्याचे प्रमाण जास्त असते. अश्या लोकांमुळेच बांधा साठी खूप जास्त प्रमाणात वादविवाद सुरु होत असतात.

 

हे नक्की वाचा:- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

 

बरेच शेतकरी या अतिक्रमणाच्या समस्येपासून जात आहेत, परंतु या शेतकऱ्यांना हे अतिक्रमण कायदेशीर पद्धतीने कसे काढावे या विषयी माहिती नसते. त्यामुळे त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण होत असते. मोठं मोठी भांडणे होत असतात. त्यामुळे जर अतिक्रमण हटविण्याची कायदेशीर पद्धत तुम्हाला माहीत असल्यास आपण कायदेशीर पद्धतीने अतिक्रमण करणाऱ्या लोकांना आळा घालू शकतो.

 

 

आपल्या जमिनीवर अतिक्रमण झाले की नाही ते कसे ओळखावे? :-

जर तुम्हाला तुमच्या जमिनीवर अतिक्रमण झालेले आहेत असे वाटत असेल तर ते कायदेशीर पद्धतीने चेक करू शकतात. ते चेक करण्यासाठी तुम्हाला त्या जमिनीच्या गट नंबर किंवा सर्वे नंबरची मोजणी ही सरकारी पद्धतीने करावयाची असते. जमिनीची शासकीय मोजणी केल्या नंतर तुमच्या जमिनीची हद्द कायम करण्यासाठी नकाशा क प्रत ही शासकीय यंत्रणा तफे देण्यात येत असते. त्या नकाशा क वर तुमच्या जमिनीची सर्व बाजू दाखविल्या जातात आणि त्याच बरोबर तुमच्या जमिनीवर अतिक्रमण झालेले क्षेत्र सुद्धा दाखविले जात असते. शासकीय पद्धतीने जमीन मोजणी करण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो. त्यासाठी फी सुद्धा भरावी लागेल.खालील पद्धतीने काढा शेत जमीन अतिक्रमण

 

हे नक्की वाचा:- आजोबांच्या मालमत्तेवर नातवाला किती अधिकार असतो? 

 

 

अश्या वेळेस जर तुमच्या जमिनीवर अतिक्रमण केलेला शेतकरी अतिक्रमण केलेली जमीन सोडायला तयार नसेल तर तुमच्याकडे आणखीन एक पर्याय आहे. तो म्हणजे अतिक्रमण काढण्यासाठी तुम्ही तहसीलदार यांच्याकडे अर्ज करू शकतात. तुम्ही तहसिलदार यांच्याकडे अर्ज महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ कलम १३८ नुसार करू शकतात. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून तो अर्ज तुम्हाला तहसिलदार यांच्याकडे करावयाचा असतो. या पोस्ट च्या शेवटी आम्ही तुम्हाला अतिक्रमण हटविण्याचा अर्ज हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तो अर्ज तुम्ही तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटर मध्ये डाऊनलोड करून घेऊ शकतात.

 

 

शेत जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी खालील कागदपत्रे अर्जासोबत सादर करावी:-

१)जो शेतकरी अर्ज करणार आहेत, म्हणजेच ज्या शेतकऱ्याच्या शेतात अतिक्रमण झालेले आहेत, आणि ज्या शेतकऱ्याने अतिक्रमण केलेले आहे त्या शेतकऱ्याच्या जमिनीचा कच्चा नकाशा हा जोडावा लागतो.

२) जर अतिक्रमण झालेल्या शेतकऱ्याने त्याच्या जमिनीची शासकीय मोजणी केलेली असेल तर शासकीय मोजणी ची प्रत किंवा जमिनीचा मुळ नकाशा जोडावा लागतो.

३) ज्या जमिनीवर अतिक्रमण हे झालेले आहे, त्या शेत जमिनीचा चालू वर्षातील सातबारा हा जोडावा. हा सातबारा हा अर्ज करण्याच्या तारखेपासून तीन महिन्याच्या आतील सातबारा जोडणे आवश्यक आहे.

४) अतिक्रमण झालेल्या जमिनीचे जर कोर्टामध्ये केस असेल तर त्या संबंधित सर्व कागदपत्रे ही तहसीलदार यांच्याकडे अर्जासोबत सादर करावी लागते.

५) अर्ज करताना अर्जदाराने त्यांच्या अर्जामध्ये जमिनीचा सर्व्हे नंबर आणि गट नंबर आवश्यक पने टाकावा. तसेच जमिनीची चतु:सीमा टाकावी.

६) अर्जदाराला अर्ज करताना कोर्ट स्टॅम्प लावावा लागतो आणि तहसील कार्यालयात जाऊन पावती घ्यावी.

 

हे नक्की वाचा:- रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव कसे समाविष्ट करावे?

 

वरील सर्व कागदपत्रे ही अतिक्रमण काढण्यासाठी अर्ज करायचा असल्यास जोडणे आवश्यक आहे.

 

अतिक्रमण झालेल्या शेतकऱ्याने करावयाचा नमुना अर्ज डाउनलोड करा.

 

अश्या पद्धतीने तुम्ही कायदेशीर पद्धतीने शेत जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी अर्ज करू शकतात. जर ही माहिती महत्वपूर्ण वाटत असल्यास सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा.