बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुमच्या साठी ही महत्वाची बातमी आहे. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरीता तीन नवीन योजना ह्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. या पूर्वी सुद्धा बांधकाम कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना ह्या सुरू आहेत. आणि आता आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने तीन नवीन योजना ह्या सुरू झालेल्या आहेत. बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या त्या तीन नवीन योजनांविषयी माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.
ग्रामीण भागातील अनेक लोकं हे बांधकाम या क्षेत्रात काम करत असतात. जर तुम्ही सुद्धा बांधकाम या क्षेत्रात काम करत असाल तर तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकतात. बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्यास तुम्हाला Bandhkam kamgar yojana अंतर्गत देण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा लाभ मिळवून घेता येतो. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी यापूर्वी सुद्धा २९ बांधकाम कामगार योजना ह्या राबविल्या जात होत्या आणि आता या बांधकाम कामगार योजना Bandhkam kamgar yojana मध्ये तीन नवीन योजनांचा समावेश हा करण्यात आलेला आहे.
Bandhkam kamgar yojana 2022 navin yojana ह्या खाली दिलेल्या आहेत.Bandhkam kamgar yojana 2022 navin yojana, bandhkam kamgar new scheme 2022
हे नक्की वाचा:- बांधकाम कामगार योजना काय आहे? असा करा अर्ज
नवीन बांधकाम कामगार योजना 2022:-
बांधकाम कामगार तीन नवीन योजना खालील प्रमाणे आहेत.
१) बांधकाम कामगार योजना अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या एका मुलीचा विवाह करण्यासाठी एकूण ५१००० रुपये इतके अनुदान हे देण्यात येणार आहेत.बांधकाम कामगार यादी 2022
२) बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या तीन नवीन योजना मध्ये दुसरी महत्वाची योजना म्हणजे जर बांधकाम कामगाराचा काम करत असताना अपघाताने किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे पार्थिव मूळ गावी पाठविण्यासाठी लागणारा वाहतुकीचा खर्च हा या योजने अंतर्गत करण्यात येणार आहेत.
३) बांधकाम काम करणारा नोंदणीकृत बांधकाम कामगार चा जर काम करत असतांना हात किंवा पाय निकामी झाल्यास अशावेळेस नोंदणीकृत बांधकाम कामगारास या नवीन बांधकाम कामगार योजना अंतर्गत आर्थिक मदत केली जाणार आहेत.
वरील तीन नवीन बांधकाम कामगार योजनांचा लाभ आता या बांधकाम कामगार योजना अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या Bandhkam kamgar यांना देण्यात येणार आहेत.
बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या इतर योजना:-
या पूर्वी सुद्धा बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना राबविल्या जात होत्या. आणि आत्ता पण ह्या योजना सुरू आहेत. त्या योजना खालील प्रमाणे आहेत. बांधकाम कामगार यादी 2022
१) नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी आर्थिक मदत.
२) नोंदणीकृत बांधकाम कामगारांना राहण्यासाठी पक्के घर असावे त्यासाठी घरकुल देणे.
३) नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा किट चे वाटप केले जाते
४) नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विमा प्रदान केला जातो.
५) इतर उपयोगी घरगुती उपयोगी साहित्य हे दिले जाते.
हे नक्की वाचा:- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना काय आहे? कसा करायचा अर्ज
बांधकाम कामगार यादी:-
महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार यांच्या वतीने बांधकाम कामगार योजना यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. बांधकाम कामगार योजना यादी 2022 पाहण्याकरिता तुम्हाला बांधकाम कामगार विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. बांधकाम कामगार विभागाचे अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही बांधकाम कामगार विभागाची नवीन यादी डाऊनलोड करू शकतात.
अश्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ हा नोंदणीकृत बांधकाम कामगारांना देण्यात येत असतो. जर तुम्ही आत्तापर्यंत बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली नसेल तर करून घ्या.