रब्बी हंगाम 2022-23 चा रब्बी पिक विमा मिळण्यासाठी 25 कोटी पेक्षा जास्त रुपयाचा निधी वितरित करण्यास मान्यता | Rabi Pick Insurance

2022 मधील अनेक शेतकऱ्यांचा रब्बी पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते व अशा शेतकऱ्यांचे क्लेम सुद्धा मंजूर करण्यात आलेले आहे व 2022 चा रब्बी पिक विम्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी राज्य शासणा अंतर्गत असलेला पिक विम्याचा उर्वरित हिस्सा वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

राज्यामध्ये 2022-23 चा पिक विमा एकूण पाच विमा कंपन्यांच्या अंतर्गत राबविण्यात आलेला आहे, याच कंपनीच्या मागणीनुसार राज्य शासना अंतर्गत एकूण 25 कोटी 55 लाख 49 हजार 22 रुपये एवढा निधी वितरित करण्यास शासन निर्णय अंतर्गत मंजुरी देण्यात आलेली आहे.

एचडीएफसी आरगो जनरल इन्शुरन्स कंपनीला देण्यात येणार असलेला निधी 3 कोटी 58 लाख 35 हजार 722 रुपये तसेच आयसीआयसीआय लोंबोर्ड या कंपनीला 5 कोटी 24 लाख 83 हजार 672 रुपये तसेच युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला 16 कोटी 72 लाख 29 हजार 628 रुपये तेवढा निधी वितरित करण्यास संबंधित जीआर नुसार मान्यता देण्यात आलेली आहे.

राज्य शासना अंतर्गत असलेल्या अनुदान हिस्सा एकूण 25 कोटी 55 लाख 49 हजार 22 रुपये निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली असल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी पिक विम्याचा मार्ग एक प्रकारे मोकळा झालेला आहे.

रब्बी हंगाम 2022-23 चा रब्बी पिक विमा मिळण्यासाठी 25 कोटी पेक्षा जास्त रुपयाचा निधी वितरित करण्यास मान्यता | Rabi Pick Insurance

वैयक्तिक शेततळ्याचा लाभ घेण्यासाठी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन