या तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर 25 टक्के पीक विमा वाटप सुरू होणार | Pick Insurance

राज्यातील शेतकरी पीक विम्याचे वाटप कधी होणार याच्या प्रतीक्षेत आहे, राज्यामध्ये पावसाच्या अभावामुळे शेती पिकाची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते, तब्बल एक महिन्याचा पावसाचा खंड राज्यात पडलेला होता त्यामुळे शेती पिके अक्षरशः करपून गेलेली होती, व अशा परिस्थितीमध्ये एक महिन्याचा पावसाचा खंड असल्याकारणाने शेतकऱ्यांना 25% पीक विमा वाटप करण्यात येणार आहे.

राज्य शासना अंतर्गत यावर्षी एक रुपयात पिक विमा योजना राबविण्यात आलेली होती व त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी शेती पिकाचा पीक विमा काढलेला होता, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना 25% पिकविण्याचे वाटप लवकरात लवकर करण्यात येणार आहे तसेच पुढील येणारा काळ सणासुदीचा असणार आहे त्यामुळे त्या काळात पैसे मिळाल्याने शेतकऱ्यांना एक प्रकारचा आनंद होईल.

पिक विमा कंपन्यांना केंद्र व राज्य अंतर्गत 3 हजार कोटी रुपयांचा हिस्सा सुद्धा देण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना 25% पिक विम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग एक प्रकारे मोकळा झालेला आहे यापूर्वी विमा कंपन्यांना हिस्सा रक्कम देण्यात आलेली नसल्याकारणाने विमा कंपन्या अंतर्गत कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलण्यात येत नव्हते, परंतु आता राज्य केंद्र सरकारचा 3000 कोटी रुपयांचा हिस्सा रक्कम विमा कंपन्यांना देण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 ऑक्टोबर पासून 25 टक्के पिक विम्याच्या रकमेचे वाटप सुरू करण्यात येणार आहे, त्यामुळे येणाऱ्या सणासुदीच्या काळामध्ये पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाल्यास थोडा दिलासा मिळू शकतो.

या तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर 25 टक्के पीक विमा वाटप सुरू होणार | Pick Insurance

वैयक्तिक शेततळ्याचा लाभ घेण्यासाठी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन