वैयक्तिक शेततळ्याचा लाभ घेण्यासाठी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन | Individual farm application

राज्यामध्ये विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेली मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना वैयक्तिक शेततळे योजना अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे, शेतकऱ्यांना शेतीमध्ये सिंचनाचा स्त्रोत उपलब्ध व्हावा तसेच उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडावी या उद्देशाने शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होणे गरजेचे असते व त्यामुळे वैयक्तिक शेततळे अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे योजनेचा अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आलेले असून पुणे जिल्ह्यासाठी 4 कोटी 44 लाख 44 हजार रुपयांचा आर्थिक लक्षांक वर्ष 2023-24 करिता देण्यात आलेला असून, 75 हजार रकमेच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना अनुदान देय असणार आहे. वैयक्तिक शेततळ्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही आवश्यक पात्रता पूर्ण असायला हव्यात.

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्याचा अर्ज https://mahadbt.maharashtra.gov.in/ या पोर्टल वर जाऊन करावा लागेल अर्ज केल्यानंतर, अर्जाची योग्य प्रकारे छाननी करण्यात येईल व त्यानंतर पात्र शेतकऱ्यांना पूर्व संमती देण्यात येणार, नंतर काम पूर्ण करावे लागेल पूर्ण काम झाल्यानंतर, त्याची माहिती मंडळ कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जमा करावी, काम झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदानाचे वितरण करण्यात येईल.

अशाप्रकारे पुणे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळेचा लाभ घ्यायचा असेल अशा शेतकऱ्यांनी वर दिलेल्या माहितीनुसार संबंधित पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

वैयक्तिक शेततळ्याचा लाभ घेण्यासाठी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन | Individual farm application

फळबाग योजनेच्या खत अनुदानासंबंधी जीआर आला, पहा खताला किती मिळेल अनुदान?

Leave a Comment