भोगवटादार क्रमांक 2 च्या जमिनी क्र 1 कश्या करायच्या, अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, संपूर्ण माहिती | bhogvatdar no 2 jamin

 

आजच्या या पोस्ट मध्ये आपण जमिनी संबंधित एका महत्वपूर्ण अश्या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. आजच्या या लेखामध्ये आपण ज्या जमिनी आपल्याला शासनातर्फे प्राप्त झालेल्या आहेत त्या जमिनी भोगवटादार क्रमांक 2 च्या जमिनी क्र 1 कश्या करायच्या, या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. भोगवटदार क्रमांक 2 जमीन धारकांना चार जमिनी विषयी संपूर्ण अधिकार हे शासनाने दिलेले नसतात. भोगवटादार क्रमांक दोन च्या जमिनी शासनाच्या पूर्वसंमती शिवाय कोणत्या ही शेतकऱ्यांना विकता येत नाही. भोगवटादार क्रमांक दोन च्या जमिनीची चे अधिकार शासनाकडे असतात. त्यामुळे जर आपण या जमिनी भोगवटदार क्रमांक दोन मधून भोगवटदार क्रमांक 1 मध्ये केल्यास आपल्याला या जमिनीचे संपूर्ण अधिकार प्राप्त होतात. व आपल्या जमिनीच्या सातबार्‍यावर भोगवटदार क्रमांक 1 असे लिहून येते.

 

भोगवटादार क्रमांक 2 च्या जमिनी क्र 1 कश्या करायच्या, अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, संपूर्ण माहिती | bhogvatdar no 2 jamin
भोगवटादार क्रमांक 2 च्या जमिनी क्र 1 कश्या करायच्या, अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, संपूर्ण माहिती | bhogvatdar no 2 jamin

 

 

भोगावटादर वर्ग 1 म्हणजे काय? :-

मित्रांनो भोगवटादार वर्ग एक म्हणजे असे जमीनदार असतात ज्यांना जमिनीचा संपूर्ण मालकी हक्क प्राप्त झालेला असतो. भोगवटादार क्रमांक 1 ची जमीन मालक हे ती जमीन विकू शकतात. भोगवटदार क्रमांक 1 जमीन धारकांना जमिनीच्या संबंधित कोणतेही व्यवहारासाठी शासनाच्या परवानगीची गरज पडत नाही. कारण की या जमिनीचे मालक हे स्वतः शेतकरी असतात. भोगवटदार क्रमांक 1 ची जमीन मूळ मालकीची असते. ही जमीन वडिलोपार्जित प्राप्त झालेली असते. Bhogavatdar 1 jamin

 

 

हे नक्की वाचा:- मुलींचा वडिलांच्या संपत्ती मध्ये असलेला अधिकार किती?

 

 

भोगवटदार वर्ग 2 म्हणजे काय? :-

भोगवटदार क्रमांक 2(bhogvatdar no 2 jamin) च्या जमिनी म्हणजे त्या जमिनी होय ज्या शेतकऱ्यांना शासनातर्फे प्राप्त झालेल्या आहेत. भोगवटादार क्रमांक दोन च्या जमिनी विकण्याचा अधिकार स्वतः शेतकऱ्याला नसतो. शेतकरी या जमिनी शासनाच्या परवानगीशिवाय विकू शकत नाही. भोगवटादार क्रमांक दोन च्या जमिनी मध्ये देवस्थान इमानी जमीन, वन जमीन, गायरान, पुन पुनर्वसनाच्या जमीनी व शासनाने दिलेल्या जमिनींचा समावेश होतो. varg 2 jamin, Bhogavatdar 2 jamin, भोगवटदार वर्ग 2 जमीन

 

भोगवटादार क्रमांक दोन च्या जमिनी शासनातर्फे शेतकऱ्यांना प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी या जमिनी विकू शकत नाही. म्हणजेच या जमीनधारकांना संपूर्ण मालकी मिळालेली नाही. भोगवटादार क्रमांक दोन च्या जमिनी जर भोगवटादार क्रमांक एक मध्ये रुपांतरीत केल्यास त्या जमिनीचे संपूर्ण अधिकार शेतकऱ्याला प्राप्त होतो. त्यामुळे आपण या लेखामध्ये भोगवटादार क्रमांक दोन च्या जमिनी भोगवतदार क्रमांक 1 मध्ये करण्याची संपूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे. भोगवटदार क्रमांक दोन च्या जमिनी भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना या पोस्टमध्ये शेवटी दिलेला आहे.

 

हे नक्की वाचा:- जमिनी संबंधित केंद्र शासनाचा मोठा निर्णय

 

भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया:-

 

भोगवटादार वर्ग 2(Bhogvatdar 2) च्या जमिनी भोगवटादार वर्ग 1 (Bhogvatdar 1) मध्ये रुपांतरीत करण्यासाठी तुम्हाला अशा जमिनीच्या चालू बाजाराच्या पन्नास टक्के इतकी रक्कम ही नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते. तेव्हा महारास्ट्र जमीन महसूल सहिता 1966 याच्या तरतुदी नुसार ही जमीन तुम्हाला भोगवटादार क्रमांक 2 मधून भोगवटादार क्रमांक 1 मध्ये रुपांतरीत करून मिळेल. क्रमांक दोनची जमीन भोगवटादार क्रमांक 1 मध्ये करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तहसील कार्यालयात अर्ज करावा लागेल. अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे. देवस्थान इनाम जमीन शासन निर्णय,भोगवटादार वर्ग 2 जमिनी खरेदी

 

हे नक्की वाचा:- आता जमीन नावावर करण्यासाठी लागणार फक्त 100 रुपये

 

भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे:-

1. जमीन मालक यांनी करावयाचा विनंती अर्ज

2. जमिनीचे 50 वर्षाचे उतारे व खाते उतारा

3. विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र

4. 7 बारा व उतारा मधील सर्व फेरफार नोंदी

5. आकरबंदाची मूळ प्रत

6. एकत्रीकरनाचा मूळ उतारा

7. मूळ धारकास जमीन कशी मिळाली त्याबाबत कबुलायत

8. तलाठी यांच्याकडील वन जमीन नोंद वहीचा उतारा

 

 

अर्ज नमुना pdf

 

अश्या पद्धतीने आपण भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतर करू शकतो. शासनाच्या वतीने सुद्धा यापूर्वी याविषयी शेतकरी बांधवांना माहिती देण्यासाठी कार्यक्रम तसेच मोहीम राबविण्यात आलेल्या आहेत. भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी ह्या भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेळोवेळी नवीन कार्यक्रम राबविण्यात येत असतात. तसेच शासनाकडून प्राप्त जमिनी भोगवटादार वर्ग 2 करण्यासाठी वेळोवेळी नियमांमध्ये बदल करण्यात येत असतात. तसेच वेळोवेळी शासन खेडे गावातील लोकांना या बाबतीत माहिती देण्याकरिता महसूल विभागातील अधिकारी यांना कॅम्प घेण्याचे आवाहन करण्यात येत असते.

जुना शासन निर्णय येथे पहा

नवीन शासन निर्णय येथे पहा

अश्या पद्धतीने आपण शासनाकडून प्राप्त जमिनी म्हणजेच भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी ह्या भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतर करू शकतो. मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण माहिती करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

Leave a Comment