मित्रांनो महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आज महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणुका(ZP election 2022 Maharashtra) ह्या स्थगित केलेल्या आहेत. या पोस्टमध्ये आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका स्थगिती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
आपल्या महाराष्ट्र राज्यातील राज्य शासनाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये काही नवीन तरतुदी केलेल्या आहेत, या अधिनियमांमध्ये केलेल्या बदलामुळे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका(ZP election 2022 Maharashtra) ह्या स्थगित कराव्या लागल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने पंचायत समिती व जिल्हा परिषद अधिनियमात केलेल्या सुधारणांमुळे निवडणुका घेणे शक्य नव्हत्या, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या वतीने या निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली आहे.ZP election 2022
5 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्यातील 25 जिल्हा परिषद तसेच त्या जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या 284 पंचायत समित्यांच्या आरक्षणाची सोडत निघणार होती. त्याच प्रमाणे मतदार यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात येत होती. परंतु आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे या सर्व बाबींना स्थगिती मिळाली आहे.
महाराष्ट्र राज्यात खालील जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार होत्या:-
आपल्या महाराष्ट्र सध्या 25 जिल्हा परिषदांच्या(ZP Election 2022 Maharashtra) निवडणुका तसेच या 25 जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या 284 पंचायत समितीच्या निवडणुका ह्या होणार होत्या. यामध्ये प्रामुख्याने खालील जिल्हा परिषदेचा समावेश होणार होता. सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक,जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा,बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर,हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, व गडचिरोली या 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका तसेच या जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका ह्या होणार होत्या. परंतु आता राज्य निवडणूक आयोगाच्या(Election commission of Maharashtra) वतीने ह्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने पुढील आदेश येईपर्यंत ह्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली आहे.ZP election 2022
हे नक्की वाचा:- प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी 2022 जाहीर
ही माहिती आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. या पोस्ट विषयी काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट करा आम्ही तुम्हाला नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. अशाच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.