नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना अर्ज सुरू. जर तुम्हाला नवीन स्वस्त रास्तभाव दुकान दार व्हायचे असेल तर तुम्हाला रास्त भाव दुकान टाकण्यासाठी रास्त भाव दुकानदार परवाना मिळवावा लागत असतो. त्यानंतर तुम्ही तुमच्या गावांमध्ये रास्त भाव दुकान टाकू शकता. रास्त भाव दुकान परवाना मिळविण्यासाठी आता अर्ज सुरू झालेले आहे. आजच्या या लेखा मध्ये आपण नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना अर्ज कसा करायचा, नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना मिळविण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात. अटी, पात्रता या सर्व गोष्टी पाहणार आहोत.
नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना कोणाला मिळू शकतो :-
ग्रामपंचायत किंवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणी झालेले म्हणजेच नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, सहकारी संस्थांना पण ज्या सहकारी संस्था महाराष्ट्र सहकार कायदा 1960 अंतर्गत नोंदणी झालेल्या आहे. तसेच नोंदणीकृत सार्वजनिक संस्था आणि सार्वजनिक न्यास यांना.
आणि वरील प्रमाणे रास्तभाव दुकानाचे परवाने मंजूर झाल्यानंतर त्या दुकानांची व्यवस्थापन महिलांनी करावे किंवा त्यांच्या समुदाया द्वारे करणे गरजेचे आहे.
नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना मिळविण्यासाठी अर्ज कसा करायचा:-
मित्रांनो नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना मिळविण्यासाठी अर्ज तुम्हाला तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तेथील जिल्हाधिकारी कार्यालयात तुम्हाला हा अर्ज मिळेल. जर तुम्हाला अर्ज ऑनलाइन पद्धतीने मिळवायचा असेल तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतात त्या जिल्ह्याच्या ऑफिसियल वेबसाइट वर जाऊन तुम्हाला तो अर्ज डाउनलोड करायचा आहे. किंवा तुम्ही तुम्हाला जर तुमच्या दिलाची ऑफिशियल वेबसाइट माहीत नसेल तर गूगल मध्ये जाऊन तुमच्या जिल्ह्याचे नाव व समोर वेबसाईट हा शब्द टाकून सर्च करा तेव्हा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट दिसेल त्यावर साइटवरून तो अर्ज डाऊनलोड करा त्या नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना अर्जाला आवश्यक ती कागदपत्रे जोडा आणि दिलेल्या विहित कालावधीत तो अर्ज तुमच्या तहसील कार्यालयामध्ये देऊन जमा करा.
नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यांची निवड कशी होईल:-
तुम्ही नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना मिळविण्यासाठी अर्ज केल्या नंतर परवाना समितीकडे जेवढे अर्ज प्राप्त झाले असतील त्या अर्जाची सर्वप्रथम प्राथमिक तपासणी केल्या जाते. त्या नंतर अर्जाची छाननी करण्यात येते, त्या नंतर जागेची तापासणी केल्या जाते आणि इतर आवश्यक तपासण्या झाल्या नंतर पात्र लाभार्थ्यांना परवाना देण्यात येत असतो.
हे सुध्दा वाचा- आधार कार्ड सुविधा केंद्र अर्ज सुरू
नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-
१) ग्राम सभेचा ठरव दुकान मागणी पत्र
२)घर टॅक्स पावती/सातबारा/मालकी पत्र
३) गट स्थापन केल्याचे नोंदणी पत्र
४) गटाचे वार्षिक लेखे तपासणी केल्याचा अहवाल.
५) आधार कार्ड
६)गुन्हा दाखल नसल्या बाबत शपत पत्र
वरील कागद पत्रांमध्ये तुमच्या जिल्हा नुसार बदल असू शकतात. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज करत आहात त्यावेळेस त्या अर्जामध्ये दाखविलेली कागदपत्र तुम्हाला सादर करावी लागेल.
आपण धुळे, परभणी, नंदुरबार, अहमदनगर आणि नाशिक इत्यादी जिल्ह्याचे अर्ज तुम्हाला या लेखा मध्ये दिलेले आहेत. ते download करून घ्या आणि सदर कागदपत्रे जोडून अर्ज जमा करा. जर तुम्ही वरील जिल्हा मधील नसाल तर तुमच्या जिल्हा मध्ये जाहिरात निघाल्यानंतर तुम्ही जिल्ह्याच्या वेबसाईट वरून अर्ज डाउनलोड करून भरू शकतात.
नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना अर्ज डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
मित्रानो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि अशाच महत्वपूर्ण माहिती साठी आपल्या tech info marathi या telegram चॅनल ला जॉईन व्हा.