जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा?jaminicha nakasha maharashtra मित्रांनो आपल्या कडे शेत जमीन असते, घर असते किंवा प्लॉट असतो अशा वेळेस जर आपल्याला आपल्या जमिनीचा नकाशा पाहायचा असेल तर तो नकाशा कसा पाहायचा हे आपल्याला माहीत नसते. आपण शेत जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी तहसील कार्यालय मध्ये जातो. आणि तिथे चकरा मारत बसतो. तरीही आपल्याला वेळेवर आपल्या जमिनीचा जागेचा किंवा प्लॉट चा नकाशा मिळत नाही.
मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे आता आपल्याला आपला नकाशा हा ऑनलाइन पाहता येण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. jaminicha nakasha maharashtra अगदी सोप्या पद्धतीने मोबाईल किंवा कम्प्युटर च्या साहाय्याने आपण आपला नकाशा पाहू शकतो. आजच्या या लेखामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने jaminicha nakasha कसा पाहायचा याची संपूर्ण माहिती पाहिली आहे.
जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा?jaminicha nakasha maharashtra |
जमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस: jaminicha nakasha online
मित्रांनो खालील पद्धतीने तुम्ही ऑनलाईन नकाशा पाहू शकता. आपल्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला खाली दिलेली वेबसाईट ही गुगल मध्ये search करून तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटर मध्ये ओपन करायची आहेत.http://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp हि वेबसाईट ओपन करायची आहे.
ही वेबसाइट ओपन केल्या नंतर आपल्यासमोर एक नवीन पेज हे ओपन होईल.
आता तुमच्या समोर या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला Location (स्थान) हा एक रकाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य(स्टेट) निवडून घ्या, कॅटेगरी (Category) मध्ये Rural आणि Urban असे दोन पर्याय तुम्हाला दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल, तर Rural हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि शहरी भागात असाल, तर तुम्हाला Urban हा पर्याय निवडायचा आहे.
आता आपल्या समोर एक नवीन ऑप्शन दिसेल त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव हे निवडायचं आहे आणि सगळ्यात शेवटी Village Map यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
आता आपल्यासमोर तुम्ही जे गाव निवडले होते त्या गावाचा नकाशा ओपन होतो.
आता तुमच्या समोर jaminicha nakasha हा ओपन झाल्या नंतर तुम्हाला Home या पर्यायासमोरील असलेल्या आडव्या बटणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा full screen मध्ये सुध्दा पाहू शकता.
त्यानंतर आता तुम्हाला डाव्या बाजूला + किंवा – हे पर्याय दिसत असेल तुम्हाला या बटणावर क्लिक करून हा संपूर्ण नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारातही पाहता येतो(तुम्हाला जसा पाहायचा तसा) हा नकाशा तुम्हाला झूम इन(zoom in)किंवा झूम आऊट(Zoom Out)ही करता येतो. तुम्हाला संपूर्ण नकाशा पाहता येतो.
माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज कसा करावा संपूर्ण माहिती
तुम्हाला डाव्या बाजूला तीन आडव्या रेषा दिसत असेल त्या तीन आडव्या रेशावर क्लिक करा, त्यावर क्लिक करायचे आहे आणि आता तुम्हाला पहिल्या वेब पेजवर वापस जायचं आहे.
जमिनीचा नकाशा |
जमिनीचा नकाशा कसा काढायचा:-
जमिनीचा नकाशा ऑनलाईन डाऊनलोड
याच वेबसाईट मध्ये Search By Plot Number हा पर्याय दिलेला आहे,तो पर्याय निवडा.
आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्याचा गट क्रमांक(सर्व्हे नंबर) जमिनीचा गट नंबर नकाशा टाकायचा आहे. त्यानंतर मग तुमच्या नकाशा हा ओपन होतो.
आता आपल्या समोर डावीकडे Plot Info हा ऑप्शन दिसेल या रकान्याखाली तुम्ही जो सर्व्हे नंबर नमूद
केला होता त्या सर्व्हे नंबर मधील नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव दिसेल आणि त्या शेतकऱ्याच्या नावावर त्या सर्व्हे नंबर वर एकूण किती जमीन आहे, याची सविस्तर आणि संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणीं दिलेली असते. शेत जमिनीचा नकाशा
एका सर्व्हे नंबर मध्ये ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याची सर्वांची सविस्तर माहिती ही या ठिकाणी दिलेली असते.
Jaminicha nakasha online download |
आता ही सर्व माहिती तुम्ही पाहली की आता डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी तुम्हाला Map Report(मॅप रिपोर्ट) या नावाचा एक पर्याय(ऑप्शन) तुम्हाला दिलेला असतो.
त्या पर्यायावर क्लिक केलं की, तुमच्या समोर तुमच्या जमिनीचा plot report हा ओपन होतो. आता तुम्हाला हा नकाशा संपूर्ण डाऊनलोड करण्यासाठी उजवीकडील खाली डाऊनलोड ची निशाणी असलेला एक बाण (arrow) दिसेल त्या बाणावर क्लिक करा आता आपल्या समोर तुमचा नकाशा हा pdf मध्ये डाऊनलोड झाला असेल.
जमिनीचा नकाशा पाहण्याची ऑनलाईन पद्धतीने अतिशय सोपी आहे. या पद्धतीमध्ये आपण घरबसल्या आपल्या जमिनीची मोजणी करू शकतो ती ही अचूकपणे. किंवा जमिनीची मोजणी ऑनलाईन करण्यामध्ये दुसरा पर्याय आहे तो म्हणजे आपण आपल्या शेताच्या बांधावर हातात मोबाईल घेऊन फिरून सुद्धा जमिनीची मोजणी करू शकतो. जर आपल्याला शासकीय मोजणी करायची नसेल, परंतु आपल्याला आपली जमीन किती आहे हे मोजायचे असेल तर जमिनीची मोजणी करण्याचा ऑनलाईन पर्याय अतिशय सोपा आणि सुलभ आहे. Jaminichi Mojani करण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर ॲप डाऊनलोड करावे लागते.
हे सुध्दा वाचा:- जमीनची शासकीय किंमत पहा ऑनलाईन
मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा हा ऑनलाईन पाहू शकता तसेच डाऊनलोड सुध्दा करू शकता.
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा. जेणेकरुन त्यांना सुध्दा अशी महत्वपूर्ण माहिती समजेल.