कुसुम सोलर योजना 2026 पर्यंत राबविण्यास मंजुरी | Extension for Kusum Scheme 2022

कुसुम सोलर योजना 2026 पर्यंत राबविण्यास मंजुरी | extension for kusum scheme 2022

 

 

केंद्र शासनाच्या वतीने आपल्या भारत देशातील शेतकऱ्यांसाठी कुसुम सोलर योजना राबविण्यात येत आहे. या कुसुम सोलर योजना अंतर्गत आपल्या देशातील शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतात विज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जेद्धारे विद्युतीकरण करण्यात येत आहे. या योजने अंतर्गत शेतकरी बांधवांना सौर पंप बसवून देण्यात येत आहे. याकरिता कुसुम महाअभियान राबविण्यात येत आहे.

कुसुम सोलर योजना ही केंद्र सरकारच्या वतीने वर्ष 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. या योजनेअंतर्गत आपल्या भारत देशात 25,750 मेगावॅटची सौर आणि इतर अक्षय क्षमता जोडण्याचा उद्देश ठेवण्यात आला होता. extension for kusum scheme mnre 2022. सुरुवातीला ही कुसुम सोलर पंप योजना ( Kusum Solar Pump Yojana) 2022 पर्यंत राबविण्यात येत होती. आणि आता ह्या योजनेला पुढे वाढविण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने मंजुरी देण्यात आलेली आहे. आता ही कुसुम सोलर योजना (Kusum Solar Yojana) 31 मार्च 2026 पर्यंत राबविण्यात येत आहे.

पीएम-कुसुम PM-KUSUM योजना अंतर्गत घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे आता आपल्या देशातील शेतकरी बांधवांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. ही योजना शेतकरी बांधवांना संजीवनी देणारी आहे. या योजने अंतर्गत शेतकरी बांधव त्यांच्या शेतात सोलर पंप बसवून पिकांना पाणी देऊन स्वतःचा आर्थिक विकास करून घेऊ शकतात.

हे नक्की वाचा:- कुसुम सोलर योजना 2022 माहिती मराठी

ही कुसुम सोलर पंप योजना(Kusum Solar Yojana 2022 Maharashtra) तीन घटका अंतर्गत राबविण्यात येत आहे. या कुसुम सोलर योजना च्या घटक-B अंतर्गत २० लाख पंप वितरित करण्यात येणार आहे. तसेच या कुसुम सोलर योजना च्या घटक-C अंतर्गत १५ लाख पंपांचे वितरण होणार आहे. या योजने मध्ये काही बदल करून आता ही कुसुम सोलर योजना (Kusum Solar Pump Yojana) पुढे वर्ष 2026 पर्यंत राबविण्यात येत आहे.

या कुसुम सोलर पंप योजना MNRE मध्ये करण्यात आलेल्या बदलामध्ये या योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याना वैयक्तिक लाभासाठी घटक-B आणि घटक-C अंतर्गत 15 HP पर्यंतच्या पंप क्षमतेसाठी केंद्रीय वित्त सहाय्य (CFA) देण्यात येणार आहे. हा केंद्रीय वित्त सहाय्य (CFA) हा उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेशांमध्ये पात्र असणार आहे.

हे नक्की वाचा:- फुल शेती अनुदान योजना 2022 महाराष्ट्र

 

या कुसुम सोलर पंप योजना(Kusum Yojana) च्या अंमलबजावणी करण्याकरिता 10 हजार कोटी रुपये इतका निधी हा मंजुरी देण्यास मान्यता दिलेली आहे. आता ही कुसुम सोलर योजना वर्ष 2026 पर्यंत राबविण्यात येत असल्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या योजने संदर्भात शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. या योजने संदर्भात काही शंका असल्यास कमेंट करा आम्ही नक्कीच तुमच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करू. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.