शून्य मशागत तंत्रज्ञान अनुदान योजना महाराष्ट्र | Zero Tillage Farming Scheme Maharashtra

शून्य मशागत तंत्रज्ञान अनुदान योजना महाराष्ट्र | Zero Tillage Farming Scheme Maharashtra

आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोक्रा योजना) अंतर्गत शून्य मशागत तंत्रज्ञान अनुदान योजना राबविण्यात येत आहे. पोक्रा योजना अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना हवामानाशी जुळवून घेण्यासाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञान अवलंब करण्यास प्रवृत्त करणे या उद्देशाने प्रकल्पांतर्गत विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.

 

शून्य मशागत तंत्रज्ञान काय आहे? What is Zero Tillage Farming)

आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मागील तीन ते चार वर्षांपासून हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पाऊस हा अवेळी आणि अनिश्चितपणे येत आहे. आणि पाऊस हा खूप कमी दिवसांमध्ये पडत आहे. पावसांच्या एकूण दिवसांपैकी खूप कमी दिवसांमध्ये खूप जास्त पावसाचे प्रमाण आपल्याला कधीकधी पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे मान्सूनचे उशिराने आगमन, मान्सून आला तरी सुद्धा वेळेपूर्वीच निघून जाणे या सर्व वरील हवामानातील बदलांमुळे शेतकरी बांधवांच्या पिकांच्या उत्पादन क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट होत आहेत. आपल्या भारत देशातील बहुतांशी शेतकरी हे कोरडवाहू असल्यामुळे ते निसर्गाच्या भरोशावर शेती करत असतात. त्याचप्रमाणे दिवसेंदिवस हवामाना सुद्धा बदल होत असल्यामुळे जमिनीतील सुपीक त्याचे प्रमाण कमी होत आहेत. शेतीत हवे तेवढे उत्पन्न होत नसल्यामुळे बहुतांश ग्रामीण भागातील लोक हे शहरी भागांकडे कामाच्या शोधात स्थलांतरित होत आहेत. याच अनुषंगाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोक्रा (Pocra yojana)अंतर्गत शून्य मशागत तंत्रज्ञान (Zero tillage farming) राबवण्यात येत आहेत. या शून्य मशागत तंत्रज्ञान करिता मंजुरी सुद्धा मिळालेली आहे.

 

 

शून्य मशागत तंत्रज्ञान योजना उद्देश Zero Tillage Farming Objectives

 

या शून्य मशागत तंत्रज्ञान प्रकल्प योजना अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील ज्या गावांचा समावेश करण्यात येईल त्या गावातील शेतकऱ्यांना हवामानात वारंवार होत असलेल्या बदलांमुळे जी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होत आहे या परिस्थितीशी जुळवून घेण्याकरिता सक्षम बनवणे हा या शून्य मशागत तंत्रज्ञान योजना अंतर्गत उद्देश आहे.

 

या शून्य मशागत तंत्रज्ञान (Zero tillage farming)योजना अंतर्गत जमिनीत असलेल्या सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविणे, जमिनीची सुपीकता टिकून ठेवणे तसेच जमिनीची सुपीकता वाढवणे जर एखाद्या वर्षी पावसाचा खंड पडला किंवा अति पाऊस झाला तर अशा वेळेस त्या पाण्याचा ताण सहन करता यावा त्याचप्रमाणे पाण्याचा निचरा सुद्धा करता आला पाहिजे याकरिता शेतकऱ्यांना शेती जमिनींना सक्षम बनविणे हा सुद्धा उद्देश आहे. त्याचप्रमाणे या शून्य मशागत तंत्रज्ञानाचा (Zero tillage farming) चा वापर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करून त्यांचा शेत जमिनीवर होणारा उत्पादनाचा खर्च कमी करून पिकांच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी मदत करणे हा सुद्धा या शून्य मशागत तंत्रज्ञान योजना अंतर्गत उद्देश ठेवण्यात आलेला आहे.

 

 

हे नक्की वाचा:- pocra योजना काय आहे? संपूर्ण माहिती

 

 

शून्य मशागत तंत्रज्ञान योजना फायदे Benifits Of Zero Tillage Farming

 

शून्य मशागत तंत्रज्ञान योजनेचे खालील प्रमाणे फायदे मिळणार आहे.

1. जमिनीचा सुपीक थर कायम राहतो.

2. शेत जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाची दीर्घकालीन साठवण होते.

3. आपण आपल्या शेतजमिनी मध्ये यापूर्वी जे पीक घेतलेले होते त्या पिकांची मुळे ही जमिनीतच राहिल्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जलदपणे वाढते.

4. जमिनीत ओलावा असल्यामुळे जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.

5. जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढल्यामुळे आपण टाकत असलेल्या रासायनिक खतांची बचत होते.

6. मातीचे तापमान नियंत्रित राहते.

7. जमिनीचे बाष्पीभवन कमी होते त्यामुळे ओलावा टिकून राहतो.

8. शेत जमिनीतील मातीच्या कणांची रचना सुधारण्यास मदत होते.

 

 

हे नक्की वाचा:- सिंचन विहीर योजना 2022 अर्ज सुरू

 

शून्य मशागत तंत्रज्ञान योजना अंतर्गत लाभार्थ्याची निवड

शून्य मशागत तंत्रज्ञान योजना(Zero tillage farming) अंतर्गत खालील प्रमाणे शेतकरी लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.

 

1. या शून्य मशागत तंत्रज्ञान प्रकल्प अंतर्गत ज्या गावांचा समावेश असेल त्या गावातील सर्व शेतकरी या योजने करिता पात्र असणार आहे.

2. शून्य मशागत तंत्रज्ञान प्रकल्प योजना अंतर्गत ज्या गावाची निवड झालेली आहे, त्या गावातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, महिलांचे बचत गट हे सर्व पात्र असणार आहे.

3. या शून्य मशागत तंत्रज्ञान योजना अंतर्गत लाभ देण्यासाठी कोणत्याही प्रकारची किमान किंवा कमाल जमिनीची अट राहणार नाही.

 

 

शून्य मशागत तंत्रज्ञान योजना अंतर्गत देण्यात येणारे अनुदान

या योजनेअंतर्गत देण्यात येणारा अनुदानाची गणना ही एकाच प्लॉटवर सलग दोन वर्षे करण्यात येणार आहे. या शून्य मशागत तंत्रज्ञान योजना अंतर्गत एका शेतकऱ्यासाठी सलग दोन हंगामा करिता पाच हेक्टर पर्यंत अनुदानाची मर्यादा राहील. या योजनेअंतर्गत अनुदानाची मर्यादा ही कमीत कमी 2 हजार रुपये प्रति हेक्टर दोन हंगामा करिता आठशे रुपये प्रति एकर आणि जास्तीत जास्त मर्यादा ही प्रति लाभार्थ्यांकरिता 10 हजार रुपये इतकी असणार आहे.

 

शून्य मशागत तंत्रज्ञान योजना खालील बाबींकरिता अनुदान नाही:-

शून्य मशागत तंत्रज्ञान योजना अंतर्गत जर लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी शेताची नांगरणी तसेच कुळवणी बैलाच्या साह्याने किंवा यंत्राच्या साह्याने केल्यास आणि पिकांची काढणी ही मुळासकट उपटून केल्यास अनुदान देय असणार नाही. अशावेळी या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळणार नाही. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत ज्या पिकांना जमिनीखाली वाढणारा भाग काढण्याकरिता जमीन खोदणी करावी लागते किंवा मुळाखालील भाग काढावा लागतो म्हणजे जी पिके जमिनीखाली येत असतात म्हणून त्यांना जमीन खोदून काढावे लागते अशा पिकांचा या योजनेअंतर्गत समावेश करण्यात आलेला नाही. जसे की भुईमूग, भाजीपाला पिके, कापूस, सोयाबीन, ज्वारी बाजरी अशी अनेक पिके आहेत, ज्यांची काढणी करत असताना जमिनीखालील भाग काढण्याकरिता खांदणी करावी लागते, त्यामुळे अशा पिकांना या योजनेअंतर्गत समावेश करण्यात आलेला नाही.  कारण की अशा पिकांमध्ये शून्य मशागत तंत्रज्ञान वापरणे शक्य नाही.

 

 

हे नक्की वाचा:- घरकुल योजना 2022, नवीन यादी जाहीर

 

शून्य मशागत तंत्रज्ञान योजना अटी व शर्ती :-

शून्य मशागत तंत्रज्ञान  योजना (Zero tillage farming)  योजना खालील प्रमाणे अटी व शर्ती आहेत.

 

1. या योजने अंतर्गत 4.5 फूट रुंद व अर्धा फूट उंच असे गादी वाफे तयार करावेत.

2. बियाण्यांची लागवड ही गादीवाफ्यावर टोकण पद्धतीने करावी. बियाणे लागवड करतात खते एकत्रपणे टाकावीत.

3. तणनाशकाची फवारणी करताना शिफारस केलेली निवडक तणनाशके वापरावीत. जास्त तन वाढल्यास तनाची कापणी करावी परंतु तणे उपटू नये,

4. पिकांची काढणी करत असताना पिकांची कापणी करावी, पिके जनितून उपटून घेऊ नये तसेच पिकांची धसकटे व मुळांचा भाग जमिनीतच राहू द्यावा

5. लागवडी साठी गादी वाफे तयार करून घ्यावे. दुसऱ्या हंगामासाठी गादी वाफे मोडू नये तेच गादी वाफे वापरायचे आहे, त्यावर तन नाशक फवारून, गादी वाफे ची डागडुजी करावी व पुढील हंगामासाठी वापरावे.

 

ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. या योजने संदर्भात काही शंका असल्यास कमेंट करा आम्ही तुमच्या शंकांचे निरसन करू. अशीच महत्वपूर्ण माहिती वेळेवर मिळवण्याकरिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.