आजच्या या लेखामध्ये आपण ओबीसी कर्ज योजना महाराष्ट्र विषयी माहिती पाहणार आहोत. आपल्या महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त लोकसंख्या ओबीसी या समाजाची आहे. आणि या ओबीसी समाजातील गरीब व गरजू तसेच बेरोजगार लोकांना स्वतः च्या पायावर उभे राहता यावे, स्वतः स्वयंरोजगार मिळवा या दृष्टीने आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्यामार्फत राज्यातील ओबीसी बांधवांना कर्ज योजना ही राबविण्यात येत आहे.obc karj yojana, magasvargiy yojana, obc loan scheme, OBC loan scheme for business
ओबीसी कर्ज योजना महाराष्ट्र ; 50 लाख पर्यंत कर्ज मिळणार | obc loan scheme |
आपल्या भारत देशामध्ये ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्ग जातींची संख्या जास्त आहेत. संपूर्ण देशभरात ओबीसी समाज सापडतो. आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा अर्धा समाज हा ओबीसी आहे. त्यामुळे या OBC प्रवर्गातील बेरोजगारांना आधुनिक आणि पारंपारिक अशा दोन्ही व्यवसायांसाठी कमी व्याजदराने वित्त पुरवठा हा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्यामार्फत करण्यात येत आहे. ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींना उद्योजक बनवणे तसेच त्यांनी उत्पादित केलेला मालाला बाजारपेठ मिळवून देणे. तसेच ओबीसी प्रवर्गातील लोकांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य या योजनेअंतर्गत करण्यात येत आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक पात्र ओबीसी बांधवांनी या Obc Loan Yojana अंतर्गत अर्ज केला पाहिजे. ओबीसी कर्ज योजना ही एक महत्वपूर्ण अशी योजना आहे. obc loan scheme Maharashtra विषयी विस्तृत माहिती आपण जाणून घेत आहोत.
हे सुद्धा वाचा:- VJNT Loan scheme अर्ज प्रक्रिया
जर तुम्ही बेरोजगार असाल आणि तुम्हाला स्वताच्या पायावर उभे राहून स्वयंरोजगार प्राप्त करावयाचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या या योजने अंतर्गत तुम्ही स्वयंरोजगारासाठी 50 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळवू शकतात. स्वयंरोजगारासाठी कर्ज हे इतर मागासवर्गीय ,वित्त आणि विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत देण्यात येत आहे.
या योजने अंतर्गत अनेक प्रकारची कर्ज तुम्ही मिळवु शकता विविध उद्योगासाठी कर्ज घेऊ शकता. या मध्ये बीज भांडवल कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व गट कर्ज तसेच थेट कर्ज अश्या प्रकारची अनेक कर्ज या योजने अंतर्गत देण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील ओबीसी बांधवांना देण्यात येत असलेल्या या OBC loan Scheme in Maharashtra(OBC Loan Yojana) अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील ओबीसी बांधवांचा विकास होणार आहे. या ओबीसी कर्ज योजना महाराष्ट्र मुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय लोकांचे कल्याण होणार आहे. ही OBC Loan Yojana Maharashtra आपल्या महाराष्ट्र राज्यातील ओबीसी बांधवांसाठी वरदान ठरत आहे. अत्यंत अल्प दराने या योजने अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील ओबीसी बांधवांना व्यवसाय उभारणी तसेच स्वयं रोजगार प्राप्त व्हावा या उद्देशाने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे
Obc कर्ज योजना साठी पात्रता काय आहे (What is the eligibility for Obc loan scheme) :-
१)obc loan scheme या योजने अंतर्गत कर्ज घेण्यासाठी लाभार्थी हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा लागतो.
२) ओबीसी कर्ज योजना या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा इतर मागासवर्ग प्रवर्गातील म्हणजेच ओबीसी प्रवर्गातील असावा लागतो.
३) ओबीसी कर्ज योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीचे वय हे 18 ते 50 वर्षे या दरम्यान असावे लागते.
४) obc loan scheme अंतर्गत कर्ज घेण्यासाठी लाभार्थी व्यक्ती चा सिबिल स्कोर हा 500 पेक्षा जास्त असावा लागतो.
हे नक्की वाचा:- ट्रॅक्टर अनुदान योजना २०२२ सुरू
ओबीसी कर्ज योजना नोंदणी कशी करायची:-
ओबीसी कर्ज योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदारास महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करावी. www.msobcfdc.org या वेबसाईट वर जाऊन नाव नोंदणी करावी लागेल. त्यानंतर कर्ज मिळविण्यासाठी चा अर्ज सुद्धा ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. ओबीसी कर्ज योजना ( OBC Loan Scheme) अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर कागदपत्रे ही ऑनलाईन सबमिट करायचे आहे. त्यानंतर लाभार्थ्यांना ओबीसी कर्ज योजना अंतर्गत लाभ हा देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या योजनेविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास तुम्ही महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्यावर वेबसाईट वर सुद्धा भेट देऊ शकतात.
ही माहिती आवडल्यास आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व ओबीसी बांधवांना शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण माहिती करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.