आपल्या महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यात वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ यांच्यामार्फत राज्यातील VJNT बांधवांना स्वतःचा दुकान टाकण्यासाठी म्हणजेच व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपये इतके अनुदान हे महाराष्ट्र शासनातर्फे कर्ज म्हणून देण्यात येत आहे.
आता स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी मिळणार 1 लाख रुपये लोन | VJNT Loan Scheme for Business |
आपल्या महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लोकांसाठी VJNT Loan Scheme अंतर्गत या घटकातील लोकांना रोजगार मिळावा, तसेच यांचा आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने सुरुवातीला २५,००० हे व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत होते. परंतु आता ही रक्कम कमी पडत असल्यामुळे आता या VJNT Loan Scheme अंतर्गत एक लाख रुपये इतकी लोन देण्यात येत आहे.
हे नक्की वाचा:- राष्ट्रीय पशुधन विकास अभियान योजना
आपल्या महाराष्ट्र राज्यातील VJNT समाज हा आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा. या VJNT समाजातील व्यक्तींनी स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करून स्वतःची आर्थिक प्रगती करून घ्यावी. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील लोकांना स्वयंरोजगार प्राप्त व्हावा. तसेच व्यवसाय करण्यासाठी त्वरित वित्त पुरवठा व्हावा या उद्देशाने ही योजना महाराष्ट्र राज्यात वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे.VJNT Loan Scheme for Business या योजने अंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील निराधार, विधवा महिला इ.लाभार्थीना लोण ही देण्यात येत असते.
या योजने अंतर्गत खालील लघु व्यवसाय करण्यासाठी लोन देण्यात येते:-
भाजी विक्री उद्योग, इलेक्ट्रिकल शॉप, आईस्क्रिम शॉप, झेरॉक्स केंद्र, मत्स्य व्यवसाय, हार्डवेअर, भाजी विक्री केंद्र, मोबाईल विक्री तसेच रिपेअरींग वर्कशॉप, मसाले उद्योग, घरगुती लघु उद्योग, किरकोळ विक्रेते, दुरुस्ती केंद्र, किराणा दुकान व्यवसाय, अश्या प्रकारच्या अनेक लघु उद्योगांसाठी १ लाख रुपये लोण ही या योजने अंतर्गत देण्यात येत असते.
हे नक्की वाचा:- शरद पवार ग्राम समृद्धी योजना महाराष्ट्र
या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्रता तसेच अटी:-
१) वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजने मध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
२) अर्ज करणारा अर्जदार हा VJNT म्हणजेच विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यातील असावा.
३) VJNT loan scheme अंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय हे १८ ते ५५ वर्षे इतके असावे लागते.
४) अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे रुपये १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
५) कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीस लाभ मिळतो
६) बँक अकाऊंट सोबत आधार कार्ड हे लिंक असावे लागते.
हे सुद्धा वाचा:- या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वाटप सुरू
अश्या पद्धतीने VJNT Loan Scheme अंतर्गत आपल्या राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तींना आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने व्यवसाय करण्यासाठी 1 लाख रुपये इतके अनुदान हे देण्यात येत असते.
जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा.