डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना महाराष्ट्र | Dr Babasaheb Ambedkar Krishi Swavalmban Yojana

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना महाराष्ट्र | Dr Babasaheb Ambedkar Krishi Swavalmban Yojana

 

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना (Dr. babasaheb ambedkar krishi yojana ) ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणारी महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. ही डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने Mahadbt Farmers Portel वर राबविण्यात येत आहे. ही डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अंतर्गत समाविष्ट योजना व अनुदान:-

डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना खालील योजनांचा लाभ देण्यात येत आहे.(Navin vihir yojana )

1. नवीन विहीर योजना (navin vihir yojana) – अनुदान:- 2 लाख 50 हजार रुपये
2. जुनी विहीर दुरुस्ती योजना – अनुदान:- 50 हजार रुपये
3. पंप संच yojna- अनुदान:- 20 हजार रुपये
4. इनवेल बोअरींग- अनुदान:- 20 हजार रुपये
5. शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण – अनुदान:- 1 लाख रुपये
6. वीज जोडणी आकार – अनुदान:- 10 हजार रुपये
7. ठिबक सिंचन योजना – अनुदान:- 50 हजार रुपये
8. तुषार सिंचन योजना – अनुदान:- 25 हजार रुपये
9. PVC pipes- अनुदान:- 30 हजार रुपये
10. परसबाग yojna- अनुदान:- 500 रुपये

हे नक्की वाचा:- कुसुम सोलर योजना 2022 अर्ज सुरू

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना समाविष्ट जिल्हे:-

या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अंतर्गत सातारा,सांगली,सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई व कोल्हापूर हे जिल्हे वगळून आपल्या महाराष्ट्र राज्यातील इतर सर्व जिल्हे समाविष्ट असून, त्या सर्व जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे.navin vihir yojana 2022

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना पात्रता Egibility for Dr. babasaheb ambedkar krishi swavalamban yojana

 

1. अर्जदार कडे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
2. अर्जदार हा अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा लागतो.
3. सातबारा आणि आठ अ सादर करणे बंधनकारक आहे.
4. उत्पन्न दाखला असावा लागतो
5. उत्पन्न मर्यादा ही 1.50 लाखाच्या आत असावी
6. जमीन धारणा ही 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत असावी लागते.

हे नक्की वाचा:- पोक्रा अंतर्गत सिंचन विहीर योजना

नवीन विहीर योजना आवश्यक कागदपत्रे (Navin Vihir Yojana Required Documents)

1. अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र
2. उत्पन्न प्रमाणपत्र (रु. 1,50,000/- पर्यंत) पेक्षा कमी
3. सातबारा तसेच आठ – अ उतारा
4. अपंग प्रमाणपत्र (असल्यास)
5. प्रतिज्ञापत्र 100 किंवा 500 रू स्टॅम्प पेपर वर
6. जमीन धारणा प्रमाणपत्र(तलाठी कडील)
7. विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र
8. प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला
9. ग्रामसभेचा ठराव
10. पाणी उपलब्धतेचा दाखला

डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सर्व प्रकारच्या अर्जासाठी अर्ज प्रक्रिया

नवीन विहीर योजना (Navin Vihir Yojana) तसेच सर्व प्रकारच्या योजनातर्गत अर्ज करायचा असल्यास maha dbt farmers portel वरून अर्ज करायचा आहे.

mahadbt farmer portal link

सुरुवातीला नोंदणी करून घ्या, त्यानंतर लॉगिन करून ही योजना निवडून घ्या त्या नंतर अर्ज करू शकतात.

ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. या योजने संदर्भात काही अडचणी असल्यास कमेंट करा आम्ही तुमच्या शंकांचे नक्कीच निरसन करू. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

Leave a Comment