पीक विमा क्लेम ऑनलाईन आणि ऑफलाईन कसा करायचा? | How to make crop insurance claim online ?

पीक विमा क्लेम ऑनलाईन आणि ऑफलाईन कसा करायचा? | How to make crop insurance claim online ?

 

पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना. आपल्या महाराष्ट्र राज्यात गेल्या 4 ते 5 पाच दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पाऊस होत आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की ज्यांनी पिक विमा काढला होता अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिक विमा क्लेम करायचा(crop insurance claim online) आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण पीक विमा योजना अंतर्गत पीक विमा क्लेम ऑनलाईन पद्धतीने कसा करायचा या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

 

 

असा करा पीक विमा क्लेम ऑनलाईन How to make crop insurance claim online ?

 

पीक विमा क्लेम करण्याची प्रक्रिया ही अत्यंत सोपी आणि सहजपणे होणारी आहे. पीक विमा क्लेम ऑनलाईन(crop insurance claim online) पद्धतीने करण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी.pik vima claim kasa karava

 

1. पीक विमा क्लेम ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी सर्व प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल च्या Google Play Store वरून Crop Insurance नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या.

2. आता हे Crop Insurance नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन ओपन करा. त्यामध्ये तुम्हाला Register as Farmer, Login for Policies, Continue Without Login, Change Language असे चार पर्याय दिसतील, त्यापैकी तुम्ही Continue Without Login या पर्यायावर क्लिक करा.

3. आता तुमच्या समोर विविध पर्याय दिसतील, त्या पैकी Crop Loss या पर्यायावर क्लिक करा.

4. आता तुमच्या समोर दोन पर्याय आहेत, त्या पैकी Crop Loss Intimation ह्या पर्याय वर क्लिक करा.

5. आता तुमचा मोबाईल नंबर ॲड करा. आणि सेंड otp या पर्याय वर क्लिक करा.

6. आता तुमच्या मोबाईल नंबर वर आलेला otp प्रविष्ट करा.

7. आता तुम्हाला खालील माहिती प्रविष्ट करायची आहे.

Season – यामध्ये तुम्हाला तुम्ही ज्या season मधील पिकांचा पीक विमा काढला ते निवडा, जसे की खरीप किंवा रब्बी

Year- 2022 निवडून घ्या.

Scheme- Pradhanmantri Fasal Bima Yojana हे निवडून घ्या.

State – Maharashtra निवडून घ्या.

 

8. आता तुमच्या समोर From Where Did You Enroll हया पर्याय मध्ये Bank, Csc, Farmer Online, Intermediary हे पर्याय दिसतील त्यापैकी योग्य तो पर्याय निवडा. मी या ठिकाणी पीक विमा हा CSC मधून apply केला असल्यामुळे या ठिकाणी CSC निवडून घेतो. जर तुमचा पीक विमा हा बँकेने भरला असल्यास Bank हा पर्याय निवडून घ्या.

9. त्यानंतर Do you have Policy Number? मध्ये तुमच्या पीक विमा पावती वरील पॉलिसी नंबर टाका. आणि done पर्याय वर क्लिक करा.

10. आता तुमच्या समोर शेतकऱ्याची डिटेल ओपन झाली असेल.

11. त्यामध्ये तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये तुमचे किती नुकसान झाले ते ॲड करा.आणि इतर आवश्यक माहिती भरा. त्या नंतर एक फोटो काढा पिकांचा. व्हिडिओ काढून घ्या. आणि done करा.

12. आता आपल्या समोर आपला पीक विमा क्लेम हा झालेला आहे. तुमच्या समोर Crop Loss Reported Successfully असा पॉप अप आला असेल आणि तुमच्या मोबाईल स्क्रीन वर एक Docket Id आलेला असेल. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि जपून ठेवा.pik vima claim kasa karava

 

 

हे नक्की वाचा:- ई पीक पाहणी म्हणजे काय? कशी करायची ई पीक पाहणी ऑनलाईन?

 

पीक विमा क्लेम ऑफलाईन कसा करायचा? How to make crop insurance claim offline ?

पीक विमा क्लेम ऑफलाईन(crop insurance claim offline) पद्धतीने करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीक विमा कंपनीस कॉल करून माहिती कळवायची आहे. पीक विमा कंपनी तुम्हाला तुम्ही पीक विमा भरल्याची माहिती विचारेल. ती सांगून पीक विमा कंपनीने विचारलेली माहिती सांगून पीक विमा क्लेम करू शकतात. त्यानंतर तुम्हाला पीक विमा कंपनी कडून क्लेम केल्याचा आयडी नंबर देण्यात येईल.

 

 

पीक विमा क्लेम स्टेटस असे चेक करा How to check crop insurance claim status online

 

पीक विमा क्लेम स्टेटस (crop insurance claim status) चेक करण्यासाठी सर्वप्रथम Crop Insurance हे ॲप डाऊनलोड करून ओपन करा.(crop insurance claim status online) त्यानंतर  Continue Without Login या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या समोर विविध पर्याय दिसतील, त्या पैकी Crop Loss या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या समोर दोन पर्याय आहेत, त्या पैकी Crop Loss Status ह्या पर्याय वर क्लिक करा. आता तुम्हाला येथे तुमचा तुम्हाला मिळालेला Docket Id प्रविष्ट करा. आणि ok करा. आता तुमच्या समोर पीक विमा क्लेम केल्याचे स्टेटस हे ओपन झालेले असेल.

 

 

हे नक्की वाचा:- या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 10 ते 15 हजार रुपये 

 

अश्या पद्धतीने आपण पीक विमा क्लेम ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करू शकतो, तसेच आपण केलेल्या पीक विमा क्लेम चे स्टेटस सुद्धा ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकतो. पीक विमा योजना संदर्भात ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. या पोस्ट विषयी काही शंका असल्यास कमेंट करा आम्ही तुमच्या शंकांचे नक्कीच निरसन करू. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.