ई पिक पाहणी म्हणजे काय, फायदे , तोटे ई पीक पाहणी कशी करायची | E Peek Pahani maharashtra

पिक पाहणी – E Peek Pahani Maharashtra

मित्रानो सुरुवातीला आपल्या सातबाऱ्यावर पीक पाहणी च्या नोंदी आपल्या गावाला नेमण्यात आलेल्या तलाठी मार्फत ह्या नोंदी तलाठी करत असायचा परंतु आता महाराष्ट्र शासनाने ई पीक पाहणी हे माध्यम लॉन्च केले आहे. या ई पीक पाहणीचा चा अर्थ म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शेतीतील पिकांची पाहणी करणे होय. या ई पीक पाहणी मध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल वरून स्वतः त्यांच्या शेता मध्ये जाऊन त्यांच्या शेतात असलेल्या पिकांची पाहणी करून त्याची नोंद ही ई पीक पाहणी या app वर करायची आहे.E Peek Pahani maharashtra

ई पिक पाहणी म्हणजे काय, फायदे , तोटे ई पीक पाहणी कशी करायची | E Peek Pahani maharashtra, benifits of e pik pahani, how to do e pik pahani, e pik pahani mudatvadh,
ई पिक पाहणी म्हणजे काय, फायदे , तोटे ई पीक पाहणी कशी करायची | E Peek Pahani maharashtra

 

 

सातबारा उतारा हा आपल्या जमिनीचा खूप महत्वपूर्ण दस्त ऐवज असतो. सातबारा म्हणजे एक प्रकारे आपल्या जमिनीचा आरसा सुद्धा आपण म्हणू शकतो. कारण ह्या सातबारा मध्ये आपल्या जमिनिविषयी सर्वच माहिती सातबाऱ्यावर नमूद केलेली असते. आपण जर आपल्या जमिनीचा अंदाज लावायचा असेल आणि तो ही घरबसल्या म्हणजेच प्रत्यक्ष जमिनीवर न जाता तर ते सातबारा मुळे शक्य होते. तसेच आपल्या सातबाऱ्यावर अनेक प्रकारच्या नोंदी असतात. जसे विहीर असल्याची नोंद, वृक्ष असल्याची नोंद, तसेच बोगवटदार क्रमांक अश्या अनेक प्रक्रच्या नोंदी मुळे शासनाच्या अनेक प्रकारच्या योजना, दाखले मिळविण्यासाठी 7/12 हा दस्त ऐवज महत्त्वाचा ठरतो. e Pik Pahani Maharashtra 2022

 

 

आपल्या शेत जमिनीचे हक्कांबाबत नोंदी ठेवल्या जातात. ह्या नोंदी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1971 ह्या कायद्या अंतर्गत शेतजमिनींच्या असलेल्या हक्कांबाबत अनेक प्रकारच्या नोंदी ठेवल्या जातात. या कायद्या अंतर्गत करण्यात येणाऱ्या नोंदी मध्ये कुळांचे मालकी हक्क तसेच शेतजमिनीचे हक्क, शेत जमिनीतील पिकांचे असलेले हक्क ह्या नोंदींचा समावेश हा होत असतो. तसेच या नोंदिंसोबत वेगवेगळ्या प्रकारचे गावचे नमुने’ ठेवलेले असतात. हे नमुने 21 वेगवेगळ्या प्रकारचे असतात.E Peek Pahani Maharashtra आणि यामधून 7/12 तयार होतो. सातबारा हा ‘गावचा नमुना’ नं 7 आणि ‘गावचा नमुना’ नं 12 मिळून सातबारा उतारा तयार होत असतो. E-Pik pahani, E Peek Pahani maharashtra

 

हे सुध्दा वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर

 

आपल्या जमिनीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या 21 नोंदी पैकी ‘गाव नमुना 7’ हे अधिकारपत्रक आहे व ‘गाव नमुना 12’ हे पीक-पाहणी पत्रक आहे.

 

ई पीक पाहणी सुरुवात कशी झाली:-

महसूल विभागाने यासाठी स्वतंत्र E peek Pahani mobile application निर्मिती करण्यात आली.

मित्रानो आपल्या महाराष्ट्र राज्यात ई- पीक पाहणी चा नवीन रेकॉर्ड तयार झाला आहे. आणि या मध्ये मराठवाडा समोर आहे. ई- पीक पाहणी प्रकल्पाची सुरुवात ही महाराष्ट्र राज्यात 15 ऑगस्टपासून करण्यात आली असली तरीही हा प्रयोग आधी प्रायोगिक तत्वावर चालवण्यात आला होता. आणि तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता संपूर्ण राज्यात ई पीक पाहणी प्रकल्प सुरू झाला आहे. आपण ज्या app च्या माध्यमातून आपल्या शेतीतील पिकाची पाहणी करतो, त्या ई- पीक पाहणी app ची निर्मिती ही टाटा ट्रस्टच्या सहाय्याने केलेली आहे. या app ला खूप चांगल्या पद्धतीने तयार करण्यात आले आहे. अतिशय सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांना समजतील अशा प्रकारचा इंटर्फेस हा या app मध्ये तयार करण्यात आला आहे. या app मध्ये मराठी भाषेचा समवेश करण्यात आला आहे. e pik pahni

 

या ई-पीक पाहणी च्या app मध्ये सर्वात प्रथम शेतकरी त्यांच्या शेतात ते पिकवत असलेल्या पिकांची माहिती भरतील. त्यानंतर तुमच्या गावला जो तलाठी आहे तो त्या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. शेतकऱ्यांनी भरलेली पिकांची माहिती ही तलाठी यांच्याकडे जाते व नंतर तलाठी ह्या नोंदी तपासतो. त्यामुळे पीक पेरणीची खरी माहिती ही ह्या ई पीक पाहणी या app मध्ये जमा होणार आहे.

 

ई- पीक पाहणीचा फायदा काय?:-(Benifits of e pik pahani)

या ई- पीक पाहणी नोदणी ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या ई- पीक पाहणी मध्ये शेतकरी बांधवांचा प्रत्यक्ष सहभाग हा वाढला आहे. या मुळे शेतकऱ्यांची पीक पाहणी सुलभ रित्या व लवकरात लवकर कमी वेळात ऑनलाईन app च्या माध्यमातून होत आहे आहे. ह्या सर्व बाबींमुळे आता पीकविमा प्रक्रिया आणि पीकपाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया ही अत्यंत सुलभ पद्धतीने होणार आहे. तसेच या ई- पीक पाहणी मुळे शेतकरी बांधवांना कर्जाची आवश्यकता पडल्यास, त्यांना पीककर्ज सुद्धा मिळविण्यासाठी या ई- पीक पाहणी मुळे सुलभता येईल. तसेच एकाद्या वेळेस शेतकऱ्यांचे नुकसान झाले जसे पूर, किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेती पिकांचे नुकसान झाले तर या ई- पीक पाहणी मुळे शेतकरी बांधवांना योग्य मदत मिळेल. तसेच या ई-पीक पाहणी मुळे राज्यामध्ये चालू वर्षी कोणत्या प्रकारचे पीक शेतकऱ्यांनी जास्त लागवड केली, तसेच कोणत्या पिकाची लागवड किती केली याचे अचूक क्षेत्र हे ई- पीक पाहणी मुळे कळणार आहे.आणि या मुळेच आपल्या राज्यातील आर्थिक पाहणी करणे आणि कृषी या क्षेत्राचे योग्य नियोजन करणे हे आता शक्य होणार आहे. त्याच प्रमाणे यावर्षी पासून पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी उपयोग होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की, त्यांनी e pik pahani करून घ्यावी.

 

ई- पीक पाहणी न केल्यास नुकसान काय होणार:-

आपण ई- पीक पाहणी चे फायदे पाहले आहे आता ई पीक पाहणी न केल्यास नुकसान काय होणार हे सुध्दा पाहुयात.

जर तुम्ही ई पीक पाहणी मोबाईल app द्वारे ई पीक पाहणी केली नाही तर तुमच्या सातबारा वर कोणत्याच पिकाची नोंद होणार नाही त्यामुळे तुम्ही कोणतेही पीक घेतली नाही असे गृहीत धरले गेल्यामुळे तुमचे शेत पडीक दाखविले जाईल किंवा तुमच्या शेत जमिनीत पेरणी झालीच नाही असे गृहीत धरले जाईल. आणि तुमची जमीन पडीक दाखविल्यामुळे तुम्हाला बँकेकडून पीक कर्ज मिळविणे कठीण होऊन जाणार आहे.

तुम्ही ई- पीक पाहणी द्वारे नोंदणी न केल्यामुळे तुमच्या शेतात कोणतेही पीक पेरणी केली नसल्याचे गृहीत धरल्या मुळे तुम्ही प्रधानमंत्री पिक विमा योजनेपासून देखील वंचित राहू शकतात. जर एखाद्या वेळेस शेती पिकांचे नुकसान झाले आणि शासनाने इजाध्या ठराविक पिकास नुकसान भरपाई जाहीर केल्यास शासनातर्फे मदत तुम्हाला मिळणार नाही. त्या मदतीचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. जर तुमचे शेत जंगली भागाच्या जवळ असेल आणि तुमच्या शेतामध्ये रानटी जनावरांनी शेतातील पिकांचे नुकसान केले तर त्याचा लाभ तुम्हाला मिळवता येणार नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करायला हवी.

 

 ई-पीक पाहणी कशी करायची:-(How to do e pik pahni)

ई- पीक पाहणी करणे अत्यंत सुलभ आहे.

ई-पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशन वापर कसा करावा

सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल च्या play store मध्ये जा. आणि e pik pahni असे play store च्या search box मध्ये सर्च करा. किंवा खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही directly ई- पीक पाहणी app डाऊनलोड करू शकता.

ई- पीक पाहणी app डाऊनलोड लिंक

 

Download

 

 

आता हे ई- पीक पाहणी app डाऊनलोड केल्यानंतर शेतकऱ्यांनी त्या app वर क्लिक करून ते app ओपन करावे. आता शेतकऱ्याने स्वत:चा मोबाईल क्रमांक त्या app मध्ये नोंदवावा.

आता तुम्हाला स्वतःचा तुमची जमीन ज्या गावात आहे त्या स्वत:चा जिल्हा, तालुका, गाव निवडा आणि खातेदार निवडा किंवा गट क्रमांक टाका. आता ही सर्व माहिती अचूक रित्या भरल्यानंतर आपला परिचय निवडावा.

आता पुन्हा होम पेजवर या. तुम्हाला तुमचा सांकेतंक तुमच्या मोबाईल वर टेक्स्ट मेसेज मध्ये मिळालेला असेल. होम पेजवर आल्यानंतर तुम्ही जे पीक घेत आहात. त्या पीकाची माहिती भरा, आता तुम्ही तुमच्या पीकांची अचूक पणे माहिती भरल्यानंतर तुमच्या जमिनीचा खाते क्रमांक सुद्धा अचूक पने निवडावा. आता पुढे तुमच्या जमिनीचा गत क्रमांक निवडावा. गट क्रमांक निवडल्यानंतर तुमच्या जमिनीचे एकूण जेवढे क्षेत्र आहे तेवढे क्षेत्र तुम्ही निवडा, क्षेत्र हे निवडल्या नंतर पुढे हंगाम निवडा, त्यानंतर तुम्ही जे पीक घेत आहात त्या शेत पिकाचा वर्ग(प्रकार) निवडा, जर तुम्ही एक पीक घेत असाल तर निर्भेळ पीक (single crop) हा पर्याय अचूक पणें निवडा, किंवा तुम्ही एका पेक्षा जास्त पीक जर तुमच्या शेतामध्ये पीकवत असाल तर बहुपिक हा पर्याय त्या ठिकाणी निवडावा, ही सर्व माहिती अचूक रित्या भरल्यानंतर तुमच्या पिकाचे नाव निवडा, सिंचन पद्धत विहीर आहे किंवा कोरडवाहू आहे अशा प्रकारचा पर्याय निवडावा. आता तुम्ही ज्या दिवशी पेरणी केली असेल त्या लागवडी चां दिनांक निवडावा.

हे नक्की वाचा:- सिंचन विहीर अनुदान योजना अर्ज सुरू

वरील सर्व गोष्टी ह्या न चुकता अचूकपणे भरून झाल्या नंतर आता तुमच्या मोबाईल मध्ये gps कींवा location हा पर्याय असतो. तो चालू करावा जेणेकरून तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पीक पाहणी केली याची अचूक नोंद app मधे राहील. आता तुमच्या शेतीतील जी पिके आहे त्या पीक समोर उभे राहून तुमच्या शेतात तुम्ही जे मुख्य पीक घेता त्या मुख्य पिका चा फोटो काढून तुम्हाला app मध्ये अपलोड करावयाचा आहे. आणि नंतर सबमिट करायचे आहे. एका मोबाईल नंबर वरून 20 खातेदारांची नोंदणी करता येते. त्यामुळे जर तुमच्या कडे android mobile नसेल तर तुम्ही दुसऱ्याच्या मोबाईल वरून करू शकता. किंवा तुमच्या परिवारातील 20 खातेदारांची नोंदणी तुम्ही एका मोबाईल वरून करू शकतात.

 

अश्या प्रकारे तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्या शेतातील पिकांची पाहणी ऑनलाईन पद्धतीने ई- पीक पाहणी या मोबाईल app च्या सहायाने करू शकता.

 

सध्या बऱ्याच काही शेतकरी बांधवांना या ई- पीक पाहणी बद्दल या ई पीक पाहणी मोबाईल application बद्दल माहिती नसल्यामुळे शासन स्तरावरून जसे की तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी, कोतवाल यांच्या कडून शेतकरी बांधवांना ई पीक पाहणी विषयी मार्गदर्शन मिळत आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ई पीक पाहणी करून तुमच्या शेतातील पिकांची अचूक नोंद करू शकता.

 

या ई-पीक पाहणी च्या अंतर्गत एका खाते दाराची नोंदणी ही एकदाच करता येते. सप्टेंबरपर्यंत च्या 30 तारीख पर्यंत पिकांची माहिती ही अपलोड करण्यात येईल. त्या नंतर ऑक्टोबर १ ते १५ च्या दरम्यान शेतकरी बांधवांनी नोंदणी केलेल्या माहितीची अचूकता ही तलाठी मार्फत पडताळून पाहण्यात येईल आणि जर काही माहिती चुकीची असेल किंवा माहिती मध्ये तफावत असेल तर तलाठ्या मार्फत तुमच्या नोंदीची दुरूस्ती करण्यात येईल. आता सर्व बाबी झाल्या नंतर तुमच्या सातबारा उतारा मध्ये पिकांची माहिती उपलब्ध करून देण्यात येईल.

 

ई- पीक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ (e peek pahani mudatvadh):-

रब्बी हंगामाची पीक पाहणी ही 15 ऑक्टोबरपासून ई पीक पाहणी या मोबाईल app वर करता येईल.

जर तुम्ही अल्पवयीन असाल आणि तुमच्या नावावर जमीन असेल तर तुमचे पालक तुमच्या पिकांची पाहणी व नोंदणी करू शकतात.

सध्या ई पीक पाहणी ही मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. ही ई पीक पाहणी अत्यंत सुलभ पद्धतीने होत असल्यामुळे या ई पीक पाहणी ला शेतकरी बांधवांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ई पीक पाहणी मुळे विविध योजना चा लाभ घेणे सुलभ होणार आहे. व ही प्रक्रिया पारदर्शक आहे सर्व शेतकरी बांधवांनी ही ई पीक पाहणी करून घ्यावी.

 

शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक पाहणी करून घ्यायची आहे. E-pik pahni करण्याकरिता कृषी विभागाचे E Pik Pahani हे मोबाईल ॲप्लिकेशन अपडेट करायचे आहे. त्यानंतर ई पीक पाहणी करून घ्यावे. कारण की ई पीक पाहणी केल्या नंतर तुमच्या सातबारा वर तुमच्या पिकांची नोंद होणार आहे, त्यामुळे पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी ई पीक पाहणी ची मदत घेण्यात येणार आहे.

 

 

मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटत असेल तर सर्वांना शेअर करा. तुम्हाला काही ई पीक पाहणी विषयी प्रश्न विचारायचे असेल तर कमेंट करा.

 

ई पीक पाहणी म्हणजे तुमच्या सातबारावर पिकांची नोंद होणे होय. आता ई पीक पाहणी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतः त्यांच्या सातबारावर पिकांची नोंद करायची आहे. पिक विमा अर्ज करताना, तसेच शासनाच्या नुकसान भरपाई चा लाभ मिळवताना व इतर सर्व योजना करिता ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे.