शेतकरी बांधवांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना सुरू | Shetmal taran karj yojana maharashtra application process documents

मित्रांनो आपण पाहत आलेलो आहोत की, आपल्या शेतकरी बांधवांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. ज्या वेळेस शेतकरी बांधवांनी पीक काढणीला येते त्यावेळेस त्यांच्या शेत मालाचे भाव हे कमी झालेले असतात. परंतु आपल्या शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतातील माल निघाल्या नंतर त्यांना लगेच विकावा लागतो कारण त्यांना इतरांचे देणे असते. शेतकरी बांधवांना आर्थिक गरज असते. तसेच स्थानिकपातळीवर शेतमाल साठवणुकीच्या त्यांच्या कडे जागा नसते. आणि याच कारणामुळे शेत मालाचे भाव त्यांचा शेतातील पीक निघाल्यानंतर कमी होतात. आणि याचे नुकसान शेतकऱ्याला भोगावे लागते.

शेतकरी बांधवांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना सुरू | Shetmal taran karj yojana maharashtra application process documents
शेतकरी बांधवांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना सुरू | Shetmal taran karj yojana maharashtra application process documents

 

परंतु आपल्या शेतकरी बांधवांनी असे न करता त्यांचा शेतमाल साठवणूक करुन ठेवला, आणि काही कालावधीनंतर जर शेतकरी बांधवांनी त्यांचा शेतमाल बाजापेठेत जर विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालास जास्तीत जास्त दर मिळू शकतो. आणि शेतकरी बांधवांना त्यांच्या शेत मालाला चांगला दर मिळाल्यामुळे शेतकरी संपन्न होऊ शकतात.

हे सुध्दा वाचा:- शेत पांदन रस्ते योजना

आणि याच अनुषंगाने आपल्या शेतकऱ्यांना त्याच्या शेतामध्ये पिकणाऱ्या शेत मालाला योग्य प्रमाणात भाव मिळावा ज्या वेळेस शेतपिकला चांगला बाजार भाव असेल त्या वेळेस शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतातील माल विकता यावा ह्या दृष्टीकोनातून आपल्या राज्यातील कृषि पणन मंडळ वर्ष जवळपास सन  1990-91 पासून ही योजना शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे.

मित्रानो या शेतमाल तारण कर्ज योजना | Shetmal taran karj yojana maharashtra योजने च्या माध्यमातून बऱ्याच शेती पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. ती पिके खालील प्रमाणे आहे.

सुर्यफूल, चना, भात (धान), तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका, गहू, सोयाबीन करडई, वाघ्या घेवडा (राजमा), काजू बी, बेदाणा, सुपारी व हळद या प्रामुख्याने आपल्या शेतमालाचा हा समावेश हा करण्यात आलेला आहे.

एवढेच नाही तर या शेतमाल तारण कर्ज योजना च्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात शेतकऱ्यांनी तारण ठेवलेल्या ऐकून शेत मालावर शेतकऱ्यांनी तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकुण किंमतीच्या ७५% टक्के पर्यंत इतकी रक्कम  ६ महिने (१८० दिवस) इतक्या कालावधीसाठी एकूण ६ टक्के व्याज दराने तारण हे शेतकरी बांधवांना त्यांनी ठेवलेल्या शेत मालावर देण्यात येते.

या Shetmal taran karj yojana maharashtra योजनेअंतर्गत वखार महामंडळ मार्फत देण्यात येणाऱ्या गोदाम पावतीवरही आपल्या शेतकरी बांधवांना तारण कर्ज राज्य अथवा केंद्रिय वखार महामंडळाच्या मार्फत सहज उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर Shetmal taran karj yojana योजना ही राबविण्यात येत आहे. ही शेतमाल तारण कर्ज योजना बाजार समित्यांमार्फत राबविण्यात येत आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत ज्या बाजार समित्या सहा महिन्याच्या आत जर तारण कर्जाची परतफेड करत असेल तर अशा बाजार समित्यांना व्याजात सवलत देण्यात येते. आणि ही सवलत 3 टक्के एवढी असेल.

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर असे पहा तुमचे नाव

शेतमाल तारण कर्ज(Shetmal taran karj yojana maharashtra) योजनेची वैशिष्ट्ये, अटी व शर्ती काय आहे:-

मित्रांनो या योजनेचा लाभ प्रामुख्याने शेतकरी बांधवांनी घ्यावा यासाठी या योजनेत काही अटी शर्ती ठरवून दिलेल्या आहेत.

मित्रानो शेतमाल तारण कर्ज Shetmal taran karj yojana योजनेअंतर्गत जे शेतकरी उत्पादक आहे अशीच शेतकरी माल तारण ठेऊ शकतात. म्हणून या योजनेमध्ये फक्त उत्पादक जे शेतकरी आहे फक्तं अशाच शेतकऱ्यांचा हा बाजार समितीच्या मार्फत स्विकारण्यात येतो.

या योजने मध्ये कोणत्याही व्यापाऱ्यांचा माल स्विकारला जात नाही.

या shetmal taran karj yojana मार्फत आपण तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही ठरवताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या आहेत.  आपण ज्या दिवशी शेतमाल तारण ठेवणार आहे त्या दिवसाचे बाजार भाव विचारत घेतले जाते किंवा शासनाने जाहीर केलेली जी खरेदी किमत आहे या पैकी जे कमी असेल या नुसार ठरविण्यात येते.

Shetmal taran karj yojana मार्फत तारण ठेवण्यात येणाऱ्या शेत मालावर शेतकऱ्या मार्फत तारण ठेवलेल्या कर्जाची मुदत ही 6 महिने म्हणजेच 180 इतके दिवस असुन शेतकरी बांधवांनी तारण ठेवलेल्या तारण कर्जास जे व्याज देण्यात येते त्या तारण कर्जाचा व्याजाचा दर हा 6% इतका ठेवण्यात आला आहे.

जर या योजने अंतर्गत शेतकरी बांधवांनी तारण कर्ज घेतले असेल आणि तारण कर्जाची परतफेड ही 180 दिवस मुदतीत परतफेड केली तर सदर बाजार समितीस पणन मंडळाकडून 1% किंवा 3% व्याज सवलत देण्यात येते. आणि जर कर्ज हे मुदतीत परतफेड केली नाही तर कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही.

सर्व संबंधित या शेतमाल तारण कर्ज योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना वखार महामंडळाच्या गोदामतच ऑनलाईन पद्धतीने तारण कर्ज मिळणार आहे.

ज्या शेतकरी बांधवांनी या योजने अंतर्गत आपला माल तारण ठेवला आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम ही त्यांच्या बँक अकाऊंट मध्ये जमा करण्यात येणार आहे. परंतू कोणत्याही शेतकरी बांधवांना कर्जाच्या रकमेसाठी बँकेत चकरा मारण्याची गरज पडणार नाही. हे पैसे त्यांच्या बँकेत जमा केल्या जाईल.

 

शेतमाल तारण कर्ज योजना | Shetmal taran karj yojana maharashtra साठी लागणारी कागदपत्रे :-

कागदपत्रे:-

लाभार्थ्यांचे आधारकार्ड

लाभार्थ्यांचे सातबारा

बँकेतील वचन चिठ्ठी

सभासदत्व अर्ज

पॅन कार्ड (असेल तर )

तारण म्हणून घेतलेल्या मालाची पोहचं पावती

 

मित्रानो शेतमाल तारण कर्ज योजना साठी लागणाऱ्या अर्जाचा नमुना आपण या लेखामध्ये दिला आहे. तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून शेतमाल तारण कर्ज योजना साठी लागणाऱ्या अर्जाचा नमुना डाऊनलोड करून पाहू शकता. व या अर्जासोबत इतर जमा करायची सर्व कागदपत्रे दिलेली आहे. ते जोडून जमा करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात

 

शेतमाल तारण कर्ज योजना साठी लागणाऱ्या अर्जाचा नमूना arj namuna PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज नमुना

 

मित्रांनो जर तुम्हाला लेख आवडला असेल तर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा.