मित्रांना महाराष्ट्र राज्यातील या दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील खालील जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हेक्टरी 10 हजार ते 15 हजार रुपये इतकी मदत वितरित करण्यात येणार आहे. Shetkari Nuksan Bharpai(शेतकरी नुकसान भरपाई) यासंबंधीचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण shetkri nuksan bharpai शेतकरी नुकसान भरपाई महाराष्ट्र अंतर्गत कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हेक्टरी दहा ते पंधरा हजार रुपये इतकी मदत देण्यात येणार आहे, हे पाहणार आहोत. त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचे नाव पाहण्यासाठी शेतकरी नुकसान भरपाई संबंधित ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.
या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 10 ते 15 हजार रु नुकसान भरपाई | Shetkari Nuksan Bharpai Maharashtra
|
मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात वर्ष 2020 मध्ये जून महिन्यात ऑक्टोबर महिना या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली होती. अनेकांना पूर आलेले होते शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये पाणी झाले होते अनेक शेतकरी बांधवांच्या शेतामधून पूर गेलेला होता. त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झालेले होते. अशा या बाधित शेतकरी बांधवांना शासनाच्या वतीने मदत करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्णय प्रसिद्ध करून या दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मदत जाहीर केली आहे.
त्यामुळे या दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या नुकसानीची भरपाई देण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकूण रुपये 3364.06 लक्ष रूपये तेहत्तीस कोटी चौसष्ट लक्ष सहा हजार फक्त) इतकी रक्कम वितरित करण्याकरिता मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधवांना हेक्टरी दहा हजार ते पंधरा हजार रुपये इतकी मदत मिळणार आहे. Nuksan Bharpai Nidhi Maharashtra
अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत:-
मित्रांनो महाराष्ट्र राज्यात वर्ष 2020 मध्ये महिना जून ते ऑक्टोबर या कालावधीत खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांच्या झालेल्या अतोनात नुकसानाची भरपाई करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तो निधी खालील निकषाच्या आधारे वितरित करण्यात येणार आहे. ज्या शेतकरी बांधवांच्या शेती पिकाचे नुकसान आहे किमान 33% नुकसान झाले आहे अशा बाधित शेतकऱ्यांना हा वितरित करण्यात येणार आहे.
या निधीमध्ये जिरायत व आश्वासित सिंचना खालील शेती पिकांच्या नुकसानी करिता 10 हजार रुपये प्रति हेक्टरी इतकी मदत देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बहुवार्षिक पिकांच्या नुकसानी करता 25 हजार रुपये प्रति हेक्टरी दराने मदत वितरित करण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांना या प्रमाणे मदत ही वितरित करण्यात येणार आहे. ही मदत दोन हेक्टर च्या मर्यादे पर्यंत देण्यात येणार आहे. म्हणजे शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत ही मदत देण्यात येणार आहे.
nuksan bharpai update Maharashtra. आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना वितरित करण्यात येत असणाऱ्या या नुकसान भरपाई संबंधित शासन निर्णय हा या पोस्टमध्ये आम्ही खाली दिलेला आहे. तो तुम्ही खाली लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकतात.
खालील जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हेक्टरी 10 ते 15 हजार रुपये मदत वितरित होणार:-
1. अमरावती
2. बुलढाणा
3. हिंगोली
4. नाशिक
5. जळगांव
6. अहमदनगर
7. सातारा
8. सांगली
9. कोल्हापूर
10. सोलापूर
वरील दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही मदत वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि वर्ष 2020 मध्ये झालेल्या नुकसानीमध्ये तुमचा समावेश असेल तर तुम्हाला हेक्टरी दहा ते पंधरा हजार रुपये पर्यंत मदत मिळणार आहे.
अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत शासन निर्णय:-
GR DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रांनो शेतकरी बांधवांविषयीची महत्त्वपूर्ण माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. आणि अशाच पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.