जिल्हा परिषद पुणे वैयक्तिक लाभ योजना | Jilha Parishad Pune Vaiyaktik Labh Yojana

जिल्हा परिषद पुणे वैयक्तिक लाभ योजना | Jilha Parishad Pune Vaiyaktik Labh Yojana

 

पुणे जिल्हा परिषद च्या कृषी विभाग अंतर्गत jilha parishad Pune vaiyaktik labh yojana वैयक्तिक लाभाच्या अनेक प्रकारच्या योजना ह्या राबविण्यात येत आहे. या वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम ही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. DBT द्वारे अनुदान बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. खाली दिलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत 22 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहे. जिल्हा परिषद योजना पुणे, Jilha Parishad Yojana Pune

 

जिल्हा परिषद पुणे वैयक्तिक लाभ योजना :-

जिल्हा परिषद पुणे अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या खालील योजना ह्या राबविण्यात येत आहेत. jilha parishad Pune vaiyaktik labh yojana

1) नैसर्गिक सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन योजना / परसवाग उभारणेस अर्थसहाय्य देणे:

1. सेंद्रिय शेतीस आणि परसवाग उभारणेस अर्थसहाय्य देणारी योजना:-

या योजने अंतर्गत शेतकरी बांधवांना गांडूळ खत निर्मिती, जैविक खते निर्मिती, बायोडायनॅमिक निविष्ठा व प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन अनुदान तसेच गीर आणि साहीवाल गाय करिता अनुदान देण्यात येत आहे. त्याच प्रमाणे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे Pune ZP Scheme 2022

हे नक्की वाचा:- पीक विमा क्लेम असा करा ऑनलाईन

2. औजारे व साहित्य पुरवठा योजना:-

शेतकरी बांधवांना या योजनेअंतर्गत औजारे व यंत्र खरेदी करण्यासाठी 75% अनुदान देण्यात येत आहेत. खालील बाबी करिता अनुदान हे देण्यात येत आहेत.Pune ZP Scheme 2022

1.   विदयुत मोटार पंपसंच(ओपनवेल) 5 HP
2.  विदयुत मोटार पंपसंच(ओपनवेल) 3 HP
3.  विदयुत मोटार पंपसंच(ओपनवेल) 7.5 HP
4. डिझेल इंजिन पंपसंच 5 HP
5. PVC pipes
6. नॅपसॅक स्प्रेपंप बॅटरी ऑपरेटेड
7. ताडपत्री
8. कडबाकुट्टी यंत्र

3. सोलर वॉटर हिटर संयत्र योजना:-

ही सोलर वॉटर हिटर संयत्र योजना अंतर्गत 200 लिटर क्षमता असलेले सोलर वॉटर हिटर 75% अनुदानावर वितरित करण्यात येणार आहे. Pune ZP Scheme 2022

4. शेतकरी माता भगिनी (शारदा) अर्थसहाय्य योजना:-

या योजने अंतर्गत पुणे जिल्ह्यातील घटस्फोटीत शेतकरी महिला, विधवा शेतकरी महिला, परितक्त्या शेतकरी महिला तसेच निराधार महिलांना या योजने अंतर्गत लाभ देण्यात येत आहे. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना 5000 रुपये पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. ते थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.Pune ZP Scheme 2022

हे नक्की वाचा:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 

जिल्हा परिषद पुणे वैयक्तिक लाभ योजना अर्ज प्रक्रिया:-

या जिल्हा परिषद पुणे वैयक्तिक लाभ योजना jilha parishad Pune vaiyaktik labh yojana अंतर्गत अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने 22 ऑगस्ट 2022 पर्यंत कागदपत्रे जोडून पंचायत समिती कार्यालयात जमा करायचा आहे.

या योजने संदर्भात संपूर्ण माहिती वाचण्यासाठी तसेच अर्ज डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करा.

ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.