आदिवासी समाजाकरीता शासनाच्या विविध योजना | Adivasi Yojana 2022 Maharashtra

आदिवासी समाजाकरीता शासनाच्या विविध योजना | Adivasi Yojana 2022 Maharashtra

 

 

मित्रांनो आपल्या देशातील आदिवासी बांधवांच्या उत्थानासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या वतीने अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना ह्या राबविण्यात येत असतात. आदिवासी समाजातील बांधवांना सक्षम बनविणे, त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे या उद्देशाने अनेक प्रकारच्या योजना ह्या राबविण्यात येत असतात. आदिवासी समाजातील बांधवांना मुख्य प्रवाहात आणणे हा शासनाचा प्रयत्न आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण आदिवासी समाजाकरीता  राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या काही(Adivasi Yojana 2023 Maharashtra)  योजनांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

 

 

शबरी आदिवासी घरकूल योजना (Shabari Adivasi Gharkul Yojana)

 

आदिवासी समाजाचा विकास हा जास्त प्रमाणात झालेला नाही, हा समाज अतिदुर्गम भागात राहतो. बहुतांश आदिवासी समाजातील बांधवांकडे स्वतःचे पक्के घर नाही, त्यामुळे त्यांना हक्काचे व कायमस्वरूपी पक्के घर मिळावे या करिता शासनाच्या वतीने आदिवासी समाजातील बांधवांकरिता शबरी घरकुल योजना ही राबविण्यात येत आहे. या शबरी घरकुल योजना(Shabari Adivasi Gharkul Yojana) अंतर्गत लाभार्थ्यांना सर्व सुविधा व सोयीसह पक्के घर हे बांधून देण्यात येत आहे. या योजने अंतर्गत 269.00 चौ.फू. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल बांधून देण्यात येत आहे.

 

 

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना

आदिवासी समाजातील ज्या बांधवांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अश्या विद्यार्थ्यांसाठी ही पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना राबविण्यात येत आहे. एकूण 20,000 विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ही योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी त्याच प्रमाणे राहण्याची सोय, भोजन, शैक्षणिक साहित्यासाठी विद्यार्थ्यांना ही रक्कम प्रदान करण्यात येत आहे. शासनाने ठरवून दिलेली रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत असते. ज्या लाभार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न रु.2.50 लाख पेक्षा कमी आहेत. त्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येत आहे.Adivasi Yojana 2023 Maharashtra

 

हे नक्की वाचा:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

 

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना ( Dr APJ Abdul Kalam Amrut Ahar Yojana)

अनुसूचित जमाती मधील गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांच्यासाठी ही  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविण्यात येत आहे. या स्त्रियांना गरोदर काळात पोषक आहार मिळाला पाहिजे, आणि प्रथिनांच्या कमतरतेमुळे कुपोषण, मातामृत्यू, बालमृत्यू व कमी वजनाची बालके जन्माला येणे अश्या अनेक समस्यांपासून दूर करण्यासाठी पोषक आहार देण्यात येत आहे. या योजने अंतर्गत ज्या बालकांचे वय हे 7 महिने ते 6 वर्ष आहे, अश्या बालकांना या योजने अंतर्गत चौरस आहार हा घरपोच वितरित करण्यात येत असतो.

 

 

स्वाभिमान सबलीकरण योजना( Swabhiman Sabalikaran Yojna)

आदिवासी समाजासाठी(Adivasi Yojana 2023 Maharashtra) राबविण्यात येत असलेली ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. या योजने अंतर्गत जे कुटुंब दारिद्र्य रेषेखालील व भूमिहीन आहेत, अश्या कुटुंबाला उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कसण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात येत असते. या Swabhiman Sabalikaran Yojna अंतर्गत चार एकर कोरडवाहू जमीन ( पाच लाख रुपये प्रति एकर दराने) आणि बागायती जमीन दोन एकर पर्यंत( आठ लाख रुपये प्रति एकर दराने) उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजने लाभार्थ्यास अंतर्गत 100% अनुदान देण्यात येते. या स्वाभिमान सबलीकरण योजना अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन आदिवासी विधवा स्त्रिया, भूमिहीन पारधी, परित्कत्या स्त्रिया, विधवा भूमिहीन स्त्रिया  यांना प्राधान्य देण्यात येत आहे.

 

 

हे नक्की वाचा:- रूफ टॉप सोलर योजना अर्ज सुरू

 

स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी सहाय्य

विविध प्रशासकीय सेवांमध्ये आदिवासी समाजाच्या(Adivasi Yojana 2023 Maharashtra) जास्तीत जास्त तुरूनाने आपले यश मिळवून उच्च पदाच्या पोस्ट वर कार्यरत व्हावे, या करिता या योजने अंतर्गत तरुणांना प्रोत्साहनपर आर्थिक मदत देण्यात येत आहे. त्याच प्रमाणे आदिवासी समाजातील तरुणांचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सहभाग वाढला पाहिजे, या करिता आर्थिक सहाय्य करण्यात येत असत. या योजने अंतर्गत निर्वाह भत्ता देण्यात येत आहे.

 

 

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना महाराष्ट्र

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत ज्या भागात 50 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. अश्या भागात (वस्त्या, पाडे, वाड्या, गावांत) विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या योजने अंतर्गत सामूहिक विकासाच्या सुविधा ह्या उपलब्ध करून देण्यात येत आहे. Adivasi Yojana 2022 ,Maharashtra Adivasi Yojana

 

 

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल योजना:-

या योजने अंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्या, या करिता निवासी शाळा स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या शाळा सीबीएससी शी संलग्न आहे, या शाळांमध्ये इ. 6 वी ते 12 वी (विज्ञान) पर्यंत शिक्षण घेता येते. या शाळांमध्ये मोफत शिक्षण, निवासाची सोय, जेवणाची सोय, गणवेश, शैक्षणिक साहित्य, व्ह्या पुस्तके मोफत पुरविण्यात येत आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात 37 एकलव्य निवासी शाळा अस्तित्वात आहे. त्या शाळेत एकूण 7044 इतके विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.