शेळीपालन शेड बांधकाम योजना | sheli palan shed anudan yojana

मित्रांनो आजच्या या लेखा मध्ये आपण शेळी पालनासाठी शेड बांधण्यासाठी शेळी पालन शेड बांधकाम योजना या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. शेळी पालन या योजने अंतर्गत शेळी पालन शेड बांधण्यासाठी 49000 रुपये इतके अनुदान हे मिळत आहे.

शेळीपालन शेड बांधकाम योजना | sheli palan shed anudan yojana

 

 

आपल्या महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. ती योजना ‘शरद पवार ग्रामसमृद्धी’ योजना सुरू केली आहे. या शरद पवार ग्राम समृद्धी योजना च्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना शेती व्यवसाय बरोबरच जोड उद्योग करण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. या मध्ये शेळी पालन करण्यासाठी शेड बांधणे, गाय गोठा बांधणे, कुक्कुटपालन योजना, अशा अनेक योजना या शरद पवार ग्राम समृद्धी योजना च्या अंतर्गत येतात.

 

 

आजच्या या लेखा मध्ये आपण याच शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत येणाऱ्या शेळीपालन शेड या योजने विषयी माहिती पाहत आहोत. या मध्ये ही शेळी पालन योजना काय आहे? अर्ज कसा व कुठे करावा? या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. Goat Shed Construction Scheme 2021

 

शेळीपालन शेड योजना काय आहे(what is sheli palan shed yojana):-

शेळी पालन शेड योजना ही शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत येत आहे. शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही नवीन सुरू करण्यात आलेली योजना आहे. ही योजना या पूर्वी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत राबविण्यात येत होती. परंतु आता ही योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत राबविण्यात येत आहे. या sheli palan shed anudan yojana अंतर्गत लाभार्थ्यांना 49284 रुपये इतके अनुदान हे देण्यात येत आहे.

हे नक्की वाचा:- शरद पवार ग्राम समृद्धी योजना काय आहे?

शेळीपालन शेड बांधकाम योजना(sheli palan shed yojana) अंतर्गत शेतकरी बांधवांना 10 शेळ्यांकरिता शेड बांधण्यासाठी 49,284 रुपये इतके अनुदान हे देण्यात येत असते. या मध्ये जर 20 शेळ्या असेल तर दुप्पट अनुदान हे देण्यात येत असते, आणि 30 शेळ्या असेल तर अनुदान हे जास्त वाढून तिप्पट होते.  जर अर्जदारास 49,248 रुपये इतके अनुदान पाहिजे असेल तर कमीत कमी 2 शेळ्या असाव्या लागतात. असे शरद पवार ग्राम समृद्धी योजना च्या शासन निर्णयात नमूद केले आहे.

 

 

शेळीपालन शेड बांधकाम योजना अर्ज कसा करायचा(How to apply for sheli palan shed anudan yojana):-

 

 

जर तुम्हाला शेड बांधकाम योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत लाभ घेता येतो. यासाठी तुम्ही तुमच्या ग्राम पंचायत कार्यालय मध्ये अर्ज करू शकतात.

हे नक्की वाचा:- शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत शेळी पालन योजना अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

हा अर्ज तुम्हाला तुमच्या ग्राम पंचायत कार्यालय मध्ये मिळेल किंवा csc सेंटर वर हा अर्ज तुम्हाला मिळेल.

हा शेळी पालन शेड योजना चा अर्ज करत असताना तुम्ही हा अर्ज सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी या पैकी ज्यांच्याकडे अर्ज करत आहात त्यांच्या नावासमोर निशाण क्लिक करा.

 

आता या अर्ज मध्ये तुमच्या ग्राम पंचायत चे नाव हे टाकावे तसेच तुमचा जिल्हा व तालुका टाकून स्वतःचा फोटो चिकटवा आणि तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर टाकावा

आता तुम्ही ज्या योजने साठी अर्ज करणार आहात त्या योजने समोर बरोबर ची खून करावी.

 

या अर्जावर तुम्हाला मनरेगा योजने अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना तुम्हाला दिसेल, त्या पैकी आपल्याला शेळी पालन शेड योजना असे निवडून या पर्यायावर टीक करा.

 

जर तुम्हाला एका पेक्षा जास्त योजना साठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक योजनेसाठी वेगळा अर्ज करावा लागेल.

हे नक्की वाचा:- पोक्रा योजना काय आहे? अर्ज कसा करायचा

आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या जातीचा प्रवर्ग निवडा, या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी मनरेगा अंतर्गत लाभ घेण्यासाठी जे पात्रता व निकष लागतात,तेच या ठिकाणी लागू पडतात. ते या ठिकाणी निवडून घ्यावे.

 

या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूकपणे भरावी, या मध्ये आवश्यक कागदपत्र मध्ये सातबारा, आठ अ, रहिवासी दाखला तसेच घोषणापत्र जोडावे.  या शेळी पालन शेड योजना साठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे मनरेगा या योजने चे जॉब कार्ड हे असावे लागते. जर तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल तर तुम्ही या शेळी पालन शेड योजना साठी अर्ज करू शकत नाही. त्यासाठी तुम्ही सुरुवातीला तुमच्या ग्राम पंचायत मध्ये जॉब कार्ड साठी अर्ज करून नंतर या sheli palan shed anudan yojana ला अर्ज करू शकतात.

 

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ग्राम पंचायत मध्ये अर्ज करून शेळी पालन करण्यासाठी शेड बांधण्यासाठी शासनातर्फे अनुदान मिळवू शकतात. हा लेख सर्वांना शेअर करा.

Leave a Comment