पोक्रा योजना(नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना) पूर्व संमती मिळणे सुरू

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजेच पोक्रा योजना ह्या योजने अंतर्गत शेतकरी बांधवांना अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत असतो. आणि आता या पोक्रा योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी योजनांसाठी अर्ज केले होते. अश्या पात्र लाभार्थ्यांना पूर्व संमती मिळणे सुरू झाले आहे. बऱ्याच जणांना बऱ्याच योजनांसाठी पूर्व संमती मिळाली आहे. Pocra yojana purv samamti suru

पोक्रा योजना(नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना) पूर्व संमती मिळणे सुरू
पोक्रा योजना(नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना) पूर्व संमती मिळणे सुरू

 

 

पोक्रा ( नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना) पूर्व संमती म्हणजे काय:-

पोक्रा या योजने अंतर्गत शेतकरी बांधवांना अनेक योजना चा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. पोक्रा योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्या नंतर तुमच्या अर्जाची छाननी करण्यात येत असते. छाननी मध्ये जर तुम्ही लाभ घेण्यासाठी पात्र नसाल तर तुमच्या अर्जाला रजेक्ट करण्यात येते. आणि जे अर्ज छाननी मधून पात्र होतात, अशा लोकांना त्या योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी सुरू करण्यासाठी पूर्व संमती देण्यात येत असते.

हे सुध्दा वाचा:- जमीन नावावर होणार आता फक्त १०० रुपयात

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोक्रा) पूर्व संमती मिळाली का ते कशे पहायचे:-

पोक्रा योजने अंतर्गत अर्ज केल्या नंतर तुमच्या अर्जाची छाननी होते त्या वेळेस तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर तुमच्या अर्जाच्या छाननी चे काय झाले या संबंधी एसएमएस येत असतो. त्यांचा अर्ज हा desk 1,desk2,desk3 या स्टेज मधून approve झाल्या नंतर तुम्हाला पूर्व संमती देण्यात येत असते.

ही pocra योजने अंतर्गत अर्ज केल्या नंतर पूर्व संमती मिळाल्या नंतर पूर्व संमती मिळाली की नाही ते पाहण्यासाठी तुम्ही pocra योजनेच्या official वेबसाईट वर जाऊन तुम्ही अर्ज केलेला सेक्शन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमच्या अर्जाचे स्टेटस दिसेल. त्या मध्ये जर तुम्हाला पूर्व संमती मिळाली असेल तर तिथे पूर्व संमती पत्र तुम्हाला दिसेल.

 

पूर्व संमती मिळाल्यानंतर तुम्हाला त्या पूर्व संमती पत्रावर दिलेल्या कालावधीत योजनेतील वस्तू म्हणजेच योजनेचे काम चालू करून योजनेचे काम पूर्ण करून payment मागणी करावयाची आहे.

 

हे नक्की वाचा:- पोक्रा योजना काय आहे? अर्ज कसा करायचा? संपूर्ण माहिती