आता बँक बुडल्यास तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार| bank deposit insurance programme start

 

जर तुमचे एकाध्य्या बँकेत पैसे असेल आणि जर ती बँक बंद पडली किंवा ती बँक बुडाली तर त्या बँकेतील ठेवीदार हे चिंतेत पडतात. कारण की बँक बुडल्यावर त्या बँकेतील ठेवीदारांच्या पैश्याचे काय होणार? पैसे परत मिळणार का? मिळाले तर किती रुपये मिळणार या संबंधी चे अनेक प्रश्न बँकेतील ठेवीदारांच्या मनात असतात. परंतु आता तुमच्या या प्रश्नांना विराम लागणार आहे. कारण की आता bank deposit insurance programme अंतर्गत ठेवीदारांना जर त्यांची बँक बुडाल्यास किंवा बँक बंद पडल्यास 5 लाखांपर्यंतची ठेवी ही सुरक्षित करण्यात आलेली आहेत. बँकेच्या ठेवीदारांना पहिल्यांदाच 5 लाख रुपये पर्यंत ची ठेवी विमा परतावा योजना मिळणार आहे.

आता बँक बुडल्यास तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार| bank deposit insurance programme start
आता बँक बुडल्यास तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार| bank deposit insurance programme start

 

 

ठेव विमा संरक्षण योजना काय काय(bank deposit insurance programme):-

ऐकाद्या बँकेवर जास्त कर्ज झाल्यास बँक ढिफॉल्टमध्ये आल्यास बँक बंद पडू शकते किंवा बँक ठेवीदारांचे पैसे परत करण्यास अपयशी झाल्यास ग्राहकांनी त्या बँकेत ठेवलेल्या ठेवी काही प्रमाणात संरक्षित करणे म्हणजेच काही पैसे परत मिळणार असल्याची हमी म्हणजेच ठेव विमा होय म्हणजेच bank deposit insurance programme आहे. हे बँकेतील ठेवीदारांना प्रदान करण्यात आलेले सुरक्षा कवच आहे. आणि हे बँकेतील ठेवीदारांच्या ठेवी काही प्रमाणात परत करण्याचे संरक्षण हे डीआयसीजीसी ( Deposit Insurance and Credit Guarantee Corporation ) च्या मार्फत पुरविले जात आहे. ही कंपनी आपल्या देशातील rbi च्या मालकीची आहे.

हे सुध्दा वाचा:- इलेक्ट्रिक वाहन खरेदी साठी सरकार देत आहे भरपूर अनुदान अशी आहे प्रोसेस

bank deposit insurance programme ही योजना आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्थे सुरू करण्यात आलेली आहे. या योजने अंतर्गत बँकेतील ठेवीदारांच्या रुपये 5 लाख पर्यंत हमी मिळणार आहे.

 

केंद्र सरकारच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या योजने मुळे आपल्या देशातील अनेक बँकेत पैसे ठेवणाऱ्या ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे. देशातील केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजने अंतर्गत बँकेतील ठेवीदारांना त्यांची बँक बंद पडल्यास किंवा बुडाल्यास 90 दिवस पर्यंत ठेवीदारांना 5 लाख रुपये पर्यंत रक्कम परत देण्याचे अनिवार्य केले आहे. म्हणजेच ऐकाध्या ठेवीदारांची बँक बुडल्यास त्या ठेवीदाराना 3 महिन्यात 5 लाख रुपये पर्यंत ची रक्कम परत मिळणार आहे.

हे नक्की वाचा:- जमीन नावावर होणार आता फक्त १०० रुपयात