ज्या प्रमाणे दिल्ली मध्ये दिल्ली मधील सरकारी म्हणजेच zp school चा ज्या प्रमाणे विकास करण्यात आला. दिल्ली येथील सर्व सरकारी शाळांना आधुनिक बनविण्यात आले त्याच प्रमाणे आता आपल्या महाराष्ट्र राज्यातील शाळा आधुनिक बनविण्यात येणार आहे. या संबंधीचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. आणि या संबंधीचा शासन निर्णय सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला आहे. आणि या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ४७९ कोटी रुपये इतका निधी पुरविण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद शाळा होणार आता मॉडेल स्कूल| ग्रामविकास विभागाने घेतला मोठा निर्णय| Zp schools will be modernized |
आपल्या महाराष्ट्र राज्यातील शाळांची दुरुस्ती तसेच शाळांची पुनर्बांधणी तसेच ज्या भागात सरकारी शाळा कमी आहे अशा भागात नवीन शाळा च्या बांधकामासाठी रू.479.48 पुरविण्यास महाराष्ट्र शासनाच्या वतीने मान्यता देण्यात आलेली आहे.
हे नक्की वाचा:- समाज कल्याण हॉस्टेल असा करा अर्ज
एकंदरीतच आपल्या महाराष्ट्र राज्यातील शाळा ह्या दिल्लीच्या धर्तीवर विकसित करण्यात येणार आहेत. ज्या प्रमाणे दिल्ली येथे शाळा ह्या आधुनिक बनविण्यात आलेल्या आहे. त्याच प्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यात शाळा बनविण्यात येणार आहे.
आपल्या राज्यात जिल्हा परिषद शाळा मध्ये सर्व ग्रामीण भागातील मुले शिकत असतात. त्यांना उत्कृष्ट वातावरणामध्ये तसेच दर्जेदार शिक्षण मिळायला हवे, ग्रामीण भागातील विद्यार्थी जे जिल्हा परिषद शाळा मध्ये शिकत आहेत, ते इतर प्रायव्हेट शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या बरोबरीने असावेत, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी कुठेही कमी पडला नाही पाहिजे या सर्व बाबींचा विचार करता, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा मध्ये शिकणाऱ्या मुलाने दिल्ली मधील शाळांच्या धर्तीवर उत्कृष्ट शिक्षण हे मिळाले पाहिजे. आणि ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा मध्ये शिकणाऱ्या मुलांचा विकास व्हावा या दृष्टीने आपल्या महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सात तज्ञांची एक समिती नेमली आहे आणि आता ही समिती दिल्ली मधील शिक्षण प्रणाली चां अभ्यास करणार आहे. आणि त्या दिल्ली मधील सरकारी शाळा प्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यातील शाळा बनविण्यात येणार आहे. तसेच आपल्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना इंग्रजी ची जास्त अडचण असते त्यामुळे त्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देऊन त्यांच्या मनातील इंग्रजी या विषयातील न्यूनगंड दूर करण्यात येणार आहे.
दिली येथील सरकारी शाळा ह्या आधुनिक करण्यात आलेल्या आहेत, ह्या शाळा शिक्षणाच्या गुणवत्तेत काळानुसार जगाच्या आधुनिक पद्धती ने सुधारणा करण्यात आल्या आहेत. दिल्ली येथील शाळांमध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धती ने शिकवण्यात येते, त्या शाळा मध्ये विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत आलेल्या सोयी सुविधा, त्या शाळांमध्ये शिक्षणासाठी तयार करण्यात आलेले वातावरण या सर्व बाबींचा आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने बनविण्यात आलेली तज्ञांची समिती सखोल अभ्यास करणार आहे व त्या अभ्यासा संबंधीचा अहवाल हा महाराष्ट्र शासनाला सादर करणार आहे.
तर अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यातील सरकारी शाळा ह्या आधुनिक करण्यात येणार आहेत. त्या साठी महाराष्ट्र शासनाने निधी हा मंजूर केला आहे. आणि सात जणांची तज्ञांची समिती ही नेमण्यात आली असून या समिती मध्ये महाराष्ट्रातील विविध तज्ञ व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे. ही समिती अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे. आणि त्या नुसार महाराष्ट्र राज्यातील शाळा आधुनिक करण्यात येणार आहेत.