आपल्या महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील लोकांना स्वयंरोजगार मिळावा तसेच जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी शेती या व्यवसाय सोबतच शेतीला पूरक असे जोड धंदे करता यावे, तसेच शेतकरी बांधवांनी जोड व्यवसाय म्हणून पशुपालन, शेळीपालन, गाई, म्हशी, शेळी पालन करून त्यांचा विकास करावा या हेतूने अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात. पशुसंवर्धन विभागांतर्गत ह्या योजना राबविण्यात येत असतात. पशुसंवर्धन विभाग अंतर्गत अनेक प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत असतात. आणि आता या योजनांसाठी अर्ज हे सुरू झालेले आहे.
पशू संवर्धन विभाग- गाई म्हशी, शेळ्या मेंढ्या व कुक्कुटपालन अर्ज सुरू | gay, mhais sheli palan kukkut palan yojana |
पशु संवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, तसेच कुक्कुट पालन ही योजना काय आहे, लाभ कसा मिळणार:-
या पशू संवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत अनेक योजना राबविण्यात येतात. त्या मध्ये
१) दुधाळ गाई चे वाटप करणे तसेच म्हशींचे गट वाटप करणे,
२)शेळी व मेंढी यांचे वाटप करणे,
३) निवारा तसेच शेड उभारणी करण्यासाठी अनुदान वितरित करणे यामध्ये मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी १००० एवढ्या पक्षी साठी, ४)कुक्कुट(कोंबडीच्या पिलांचे) पिलांचे वाटप करणे पिकांची संख्या १०० असते.
५)तसेच आणखीन एक योजना आहे ती म्हणजे तलंगा गट वाटप करणे यामध्ये २५६ एवढी संख्या असते.
वरील सर्व योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल त्या नंतर तुम्हाला अर्ज केल्यानंतर तुमच्या मोबाईल वर अर्ज संबंधी माहिती मिळेल. त्या नंतर जेव्हा लाभार्थी यादी लागेल तेव्हा जर तुमची निवड झाल्यास तुम्हाला तुमच्या हिस्याची रक्कम भरून अनुदान मिळवता येते.
मित्रानो आपल्या महाराष्ट्र राज्यातील पशू संवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना मध्ये पारदर्शकता यावी या उद्देशाने पशु संवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना चे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. तसेच या योजनेचा अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे त्यांची निवड ही सुद्धा ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही अशा शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा अर्ज करण्याची गरज पडू नये म्हणून या योजनेमध्ये प्रतीक्षा यादी ही लागणार आहे. आणि ही प्रतीक्षा यादी 5 वर्ष पर्यंत राहणार असल्याने ज्या शेतकऱ्यांना गतवर्षी लाभ मिळाला नाही त्यांना पुढील 5 वर्ष पर्यंत प्रतीक्षा यादीत ठेऊन लाभ देण्यात येणार आहेत. Pashu sanvardhan yojana, cow goat, ship scheme , gay mhais, sheli palan kukkut palan yojana maharashtra online application,शेळी गट वाटप योजना 2021,
हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी आली
गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, तसेच कुक्कुट पालन योजनांसाठी अर्ज कसा करायचा:-
गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, तसेच कुक्कुट पालन योजनांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील लिंक वर क्लिक करून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक :- https://ah.mahabms.com
अँड्रॉईड मोबाईल अप्लिकेशनचे नाव : AH-MAHABMS
या योजनेची संपूर्ण माहिती वरील लिंक वर दिलेली आहे, तसेच अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती वरील वेबसाईट वर तसेच त्यांच्या मोबाईल application(AH-MAHABMS) वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. वरील गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, तसेच कुक्कुट पालन योजनांसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जातील. त्यामुळे ज्यांना या योजनेचा अर्ज करायचा आहे त्या पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वताच्या मोबाईल वरून सुद्धा अर्ज करता येणार आहे. तसेच लाभार्थ्यांना अनुदान वगळून त्यांच्या हिश्शाची रक्कम भरून या योजनेचा लाभ घेता येईल. Gay gotha yojana, sheli Palan Yojana, pashu sanvardhan yojana maharashtra, गाय गोठा योजना 2021
वरील योजना साठी अर्ज केल्यानंतर अर्जदाराने अर्ज करताना जो मोबाईल नोंदविला होता त्या नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर तुम्ही केलेल्या अर्जाचे स्टेटस तुम्हाला मेसेज द्वारे कळविण्यात येते. अर्ज दाराने एकवेळ अर्ज केल्या नंतर जो मोबाईल नंबर टाकला होता तो मोबाईल नंबर बदलवू नाही, कारण पुढील प्रक्रिया तुम्हाला मोबाईल च्या माध्यमातून कळविण्यात येईल.
पशु संवर्धन विभागाच्या गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, तसेच कुक्कुट पालन या योजनांसाठी काही अडचणी असल्यास तुम्ही त्यांच्या क्रमांकावर (टोल फ्री क्रमांक: १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ ) कॉल करू शकता किंवा तुमच्या तालुक्याचे पशुधन अधिकारी किंवा पंचायत समिती ला भेट देऊ शकता.शेळी मेंढी दुधाळ गाय म्हैस योजना सुरू
हे सुध्दा वाचा:- सिंचन विहीर अनुदान योजना अर्ज सुरू
पशु संवर्धन विभागाच्या गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, तसेच कुक्कुट पालन या योजनांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती:-
मित्रानो पशु संवर्धन विभागाच्या अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या वरील सर्व योजनांसाठी अर्ज सुरू झालेले असून सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करून घ्यावे. तुम्ही तुमच्या मोबाईल फोन च्या साहाय्याने सुध्दा ऑनलाईन अर्ज करू शकतात.
वरील योजनांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही दिनांक
:०४/१२/२०२१ ते १८/१२/२०२१ या कालावधी मध्ये ऑनलाईन अर्ज करता येईल.