गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2023, अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे | Gopinath Munde shetkari apghat vima yojana maharashtra

 

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे | Gopinath Munde shetkari apghat vima yojana maharashtra

हि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही वर्ष २००५-०६ पासून अस्तित्वात असलेली योजना आहे. ही गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या आधी शेतकरी जनता अपघात विमा योजना’ या नावाने राबविण्यात येत होती. परंतु आता ही योजना शेतकरी अपघात विमा योजना या नावाने राबविण्यात येत आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे | Gopinath Munde shetkari apghat vima yojana maharashtra,gopinath munde shetkari apghat vima yojana,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, अर्ज प्रक्रिया, कागदपत्र Gopinath Munde shetkari apghat vima yojana
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे | Gopinath Munde shetkari apghat vima yojana maharashtra

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना काय आहे? What is Gopinath Munde shetkari apghat Vima Yojana

शेती व्यवसाय हा सर्वात धोकादायक असा व्यवसाय समजल्या जातो, कारण शेतकऱ्याचा संबंध हा शेत जमिनीशी असतो, आणि शेत जमिनीवर अनेक प्रकारचे प्राणी, कीटक, आणि विषारी साप असतात, तसेच नैसर्गिक आपत्ती असते त्यामुळे शेतकरी हा नेहमीं आपला जीव धोक्यात घालून आपल्या शेतात काम करत असतो. त्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू होऊ शकतो किंवा शेतकऱ्यांना अपंगत्व सुद्धा येऊ शकतो. अश्या वेळी शेतकरी आर्थिक दृष्ट्या  कमजोर बनतो आणि त्या शेतकऱ्याच्या परिवारातील कर्ता जर मृत्यू मुखी पडला किंवा त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आले तर त्याच्या परिवारावर उपासमारीची वेळ सुद्धा येऊ शकते. तसेच कुटुंबच हे निराधार होऊ शकते. त्यासाठीच हि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही राबवली गेली होती , जेणेकरून अश्या गरीब शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात शासनाकडून दिला जाईल. हेच या योजनेचे प्रमुख उद्दिष्टय आहे.

मित्रांनो आपल्या भारत देशातील जवळपास 90 टक्के जे शेतकरी आहेत त्यांची परिस्थिती ही आर्थिक हालाखीची आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी हे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आहे. त्यामुळे अशा शेतकरी बांधवांना जर त्यांच्यावर काही अपघात झाला तर त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे त्यांच्या परिवाराला त्यापासून दूर करण्याकरिता आर्थिक मदत म्हणून ही गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना (Gopinath Munde shetkari Apghat Vima Yojana) राबविण्यात येत आहे.

हे सुध्दा वाचा:- पोक्रा योजना अंतर्गत अनेक योजनांसाठी अर्ज सुरू

 

 

शेती हा जोखीम भरा व्यवसाय करत असताना शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू होतो त्या अपघाती मृत्यू होण्याची कारणे वेगवेगळी असतात. शेती करत असताना अनेक प्रकारची संकटे  जसे कि अंगावर वीज पडणे, नैसर्गिक आपत्ती येणे जसे की महापूर, पूर , सर्पदंश, विंचूदंश, तसेच रस्त्यावरील अपघात, शेतातील पोल ला किंवा डीपी चा  शॉक लागणे अशा अनेक प्रकारच्या कारणामुळे शेतकऱ्याला कायमस्वरूपी अपंगत्व किंवा मृत्यू सुद्धा होऊ शकतो.  आणि त्या शेतकऱ्याचे कुटुंब निराधार होऊन जाते.

२००९-१० मध्ये या योजने ला ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’  असे नाव होते आणि या योजने अंतर्गत पूर्वी १ लाख रुपये एवढा विमा रक्कम देण्यात येत होती. परंतु आता या योजनेची व्याप्ती ही वाढवलेली असून वर्ष २०१५-१६ मध्ये हि रक्कम वाढवण्यात आली असून विमा रक्कम ही २ लाख रुपये एवढी करण्यात आलेली आहे व या योजनेला आता नवीन नाव देण्यात आले आहे ते नाव म्हणजे ‘गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात योजना’ हे नाव देण्यात आलेले आहे.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2022 (Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra)

या योजने अंतर्गत शेतकरी बांधवांना सहभागी करण्यासाठी  आपल्या महाराष्ट्र राज्यातील जेवढे सातबाराधारक असतील त्या सर्वाचा विम्याचा हफ्ता हा महाराष्ट्र शासनामार्फत भरण्यात आलेला आहे आणि या Gopinath Munde shetkari apghat Vima Yojana 2022 योजने अंतर्गत  दोन लाख रुपयांचा सुरक्षा ही मिळणार आहे. आणि या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत विम्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं वय हे 10 ते 75 इतके पर्यंत असले पाहिजे. या योजने अंतर्गत एक नवीन बाब ही टाकण्यात आली आहे ती म्हणजे जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एकाच्या सदस्याच्या नावे शेतजमिन असली तेव्हा सुद्धा तू या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत सहभागी होऊ शकतात.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अटी पात्रता:-

महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील एका कुटुंबातील एकूण दोन जण या योजने अंतर्गत पात्र होऊ शकतात. ज्या दिवशी विमा पॉलिसी ही लागू करण्यात आली आहे, त्या तारखे पासून सातबारा असलेला शेतकरी तसेच त्या व्यक्तीच्या कुटुंबात असलेल्या पण खातेदार म्हणून नोंद नसलेला एक सदस्य त्या मध्ये शेतकऱ्याच्या म्हणजे ज्याच्या नावावर सातबारा असलेल्या कुटुंबातील जसे शेतकऱ्यांची पत्नी, शेतकऱ्याचे आई तसेच वडील, तसेच शेतकऱ्याचा मुलगा तसेच शेतकऱ्यांची अविवाहित असलेली मुलगी या शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणतीही एक व्यक्ती या योजने अंतर्गत लाभ घेऊ शकतो. परंतु त्यांचे वय हे १० ते ७५ पर्यंत असले पाहिजे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे | Gopinath Munde shetkari apghat vima yojana maharashtra अंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यास अपघाती मृत्यू झाल्यास रू 2 लाख इतकी रक्कम विमा म्हणून देण्यात येत असते.

आणि या Gopinath Munde shetkari apghat Vima Yojana 2022  योजने अंतर्गत अपघात मध्ये दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय हा निकामी झाल्यास 2 लाख रुपये इतकी रक्कम विमा संरक्षण म्हणून प्रदान करण्यात येते.

जर शेतकऱ्याचा अपघातामुळे 1 हात किंवा 1 डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास रुपये 1 लाख इतके विमा संरक्षण म्हणून प्रदान करण्यात येते. आणि या Gopinath Munde farmer accident insurance scheme Maharashtra योजने अंतर्गत शेतकऱ्यांना. प्रदान करण्यात येणार महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे या Gopinath Munde shetkari apghat vima yojana maharashtra योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना विमा हप्ता हा भरावा लागत नाही. तो हप्ता महाराष्ट्र सरकार भरतो. शासन सर्व शेतकऱ्यांची विमा हप्त्याची रक्कम 32.23 रु इतकी भरते. आणि या मुळेच कोणत्याही शेतकऱ्यास विमा भरण्याची आवश्यकता पडत नाही

4. विमा पॉलिसी कालावधी-
5. 10.12.2021 ते 9.12.2022

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना साठी आवश्यक कागदपत्रे:-

या Gopinath Munde shetkari apghat vima yojana अंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खालील कागदपत्रे सादर करावी लागेल.

१)शेतकऱ्यांना कुटुंबातील व्यक्तीचा किंवा शेतकऱ्याचा सातबारा द्यावा लागेल तसेच फेरफार , ६ क, अपघात झाल्या नंतर एफ. आय. आर. करावा व त्याची कॉपी तेथे जोडावी. पंचनामा, मृत्यू झाल्यास पोस्ट मार्टेम रिपोर्ट तसेच व्हीसेरा रिपोर्ट,दाव्याचा अर्ज, दोषारोप, मुत्यू झालेल्या व्यकीच्या वारसाला विमा रक्कम मिळत असल्यामुळे वारसदाराचे राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तक जोडावे लागते. घोषणा पत्र अ व घोषणा पत्र ब जोडावे तसेच फोटो सहित जोडावे. तसेच वयाचा दाखला सुद्धा द्यावा लागेल. तालुका कृषी अधिकारी यांचे कृषि अधिकार पत्र जोडावे लागते.तसेच मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृत्यू हा आकस्मिक झाल्या संबंधी, ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणचा पंचनामा सादर करायचा आहे. तसेच इंनक्वेस्ट पंचनामा सुद्धा सादर करायचा आहे. त्याच प्रमाणे वाहन चालवता येत असल्याचा लायसेन्स द्यावा लागणार आहे. शेतकऱ्याला अपंगत्व आल्यास अपंगत्व आल्याचा दाखला तसेच फोटो द्यावा लागतो. औषध तसेच उपचार केल्याचे कागदपत्रे ही दवाखान्यातून आणून जमा करावी लागते. तसेच शेतकऱ्याचा किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीचा ज्या दिवशी अपघात झाला, त्या दिवसापासून 45 दिवसाच्या आत अपघात नोंदणी करावी लागते.

हे नक्की वाचा:- गट शेती योजना काय आहे? अर्ज कसा करायचा

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत अर्ज, कसा व कुठे करावा Gopinath Munde shetkari apghat vima yojana

या योजने अंतर्गत अर्ज हा तालुका कृषी अधिकारी कार्यालय. येथे अर्ज करावा लागतो. Application Process of Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

विम्याचा दावा करण्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पूर्व सूचना व अर्ज हा विहित कागदपत्रे जोडून तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावी लागेल त्या नंतर तुमचा दावा संगणक प्रणलीमध्ये अपलोड करण्यात येणार आहे. व तेव्हा तुमचा दावा हा सबमिट झाला असे समजावे. म्हणजेच विमा कंपनीस प्राप्त झाला आहे असे समजावे.

या लेखामध्ये आपण या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, Gopinath Munde shetkari apghat vima yojana अंतर्गत लाभ घेण्यासाठी करण्यात येणारा अर्जाचा नमूना सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलेला हा. तो अर्ज तुम्ही खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून download करू शकतात.

अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज download

शेतकरी बांधवांच्या संबंधित ही माहिती आवडली असेल तर इतरांना देखील नक्की शेअर करा. अशीच महत्त्वपूर्ण माहिती वेळेवर जाणून घेण्याकरिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.