शेततळे अनुदान योजना मनरेगा, अटी पात्रता निकष अनुदान कागदपत्रं | shettale anudan yojana mgnarega

आजच्या या लेखा परीक्षण आपण शेततळे अनुदान योजना काय आहे? या शेत तळे अनुदान योजना साठी अर्ज कसा करायचा, या शेततळे अनुदान योजना साठी कागदपत्रे कोणती लागतात आणि ही योजना मिळविण्यासाठी अटी तसेच पात्रता काय आहे. या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. Shettale anudan yojana

शेततळे अनुदान योजना मनरेगा, अटी पात्रता निकष अनुदान कागदपत्रं | shettale anudan yojana mgnarega
शेततळे अनुदान योजना मनरेगा, अटी पात्रता निकष अनुदान कागदपत्रं | shettale anudan yojana mgnarega

 

मित्रानो गेल्या काही वर्षांपासून आपण पाहत आहोत की प्रत्येक वर्षी पाऊस हा कमी कमी पडत आहे. राज्यातील  पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झाले आहे. याचा थेट परिणाम हा कोरडवाहू शेतकऱ्यांवर सर्वात जास्त होत असतो. कारण कोरडवाहू शेतकरी पूर्णतः वरच्या पाऊसावर अवलंबून असतात. त्या मुळे या गोष्टीचा डायरेक्ट परिणाम हा शेतमालाच्या उत्पादन कमी होण्यावर दिसून येतो. याच कारणामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. कारण पिकांना एकाधे पाणी जरी कमी पडले तरी संपूर्ण पीक कमी प्रमाणात होत असते. त्यामुळे दुष्काळावर मात करता यावी पावसात खंड पडल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यातील जलसिंचन ची व्यवस्था वाढविणे त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन सुधरविने व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे या साठी शेत तळे अनुदान योजना ही सर्व शेतकरी बांधवांना अनमोल अशी महत्वपूर्ण योजना ठरणार आहे.

हे सुध्दा वाचा:- पोक्रा योजना अर्ज सुरू असा करा ऑनलाईन अर्ज

या योजने मुळे नक्कीच शेतकरी बांधवांना पावसात अचानक खंड पडल्यास नुकसान होणार नाही तेव्हा शेतकरी शेत तळ्यातील पाणी आपल्या शेतमालाला देण्यासाठी वापरू शकतात.

 

शेतकऱ्यांना शेततळे हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण  रोजगार हमी योजना च्या अंतर्गत शेततळे बांधण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. मागेल त्याला शेततळे ही शेततळ्याची अनुदान योजना आहे. शेतकर्‍यांना त्यांच्या शेतातील पिकांसाठी आवश्यक तेवढ्या पाण्याची व्यवस्था निर्माण व्हावी, पाण्यामध्ये खंड पडल्यास शेतकरी त्यांच्या शेतातील पीक शेततळे यांच्या अंतर्गत वाचवू शकणार आहेत. या मागेल त्याला शेततळे या योजनेच्या माध्यमातून शेततळे बांधण्यासाठी ५०,००० रुपये इतके अनुदान हे या मागेल त्याला शेततळे या योजनेच्या अंतर्गत देण्यात येत आहे.

 

मात्र जर कठीण जमीन असेल तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला शेततळे खोदण्यासाठी जास्त खर्च लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचण होत होती, ते शेततळ्याचे काम तेवढ्या अनुदानावर करू शकत नव्हते. म्हणून आता मागेल त्याला शेततळे योजनेच्या माध्यमातून मागेल त्याला शेततळे मंजूर करण्यात आले आहे.

 

शेततळे योजना अटी पात्रता निकष:-

मागेल त्याला शेततळे योजना साठी लाभ मिळवायचा असल्यास अर्जदार हा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी जे निकष तसेच अटी व पात्रता आहे त्या अटी पात्रता व निकश येथे लागू होतात.

१)अर्ज करणाऱ्या शेतकर्‍याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.

२)ज्या व्यक्तीला या मागेल त्याला शेततळे या योजने अंतर्गत लाभ घ्यायचा आहे म्हणजेच अर्ज करायचा असेल त्यांना अर्ज केल्या नंतर त्या अर्जावर तालुका स्तरीय समिती असते त्या तालुका स्तरीय समितीची मान्यता असणे आवश्यक आहे.

३)या योजने अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी ग्राम सभेची मंजुरी असणे आवश्यक आहे.

वरील सर्व गोष्टी ची पूर्तता करत असाल तर तुम्हाला shet tale या योजनेचा लाभ मिळू शकतो.

हे नक्की वाचा:- शेतमाल तारण कर्ज योजना

शेततळे या योजने अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी यांची निवड कशी केली जाते:-

मनरेगा योजना अंतर्गत जे लाभार्थी निवडीचे निकष आहेत तेच निकष या shet tale yojana साठी लागू होतात ते निकष खालील प्रमाणे आहेत.

शेततळे खोदण्यासाठी खालील प्रवर्गातील शेतकर्‍यांना या बाबींचा लाभ घेता येतो.

लाभार्थी हा(अर्ज करणारा व्यक्ती हा) अनुसूचित जाती मधील किंवा अनुसुचित जमाती किंवा भटक्या जमाती तसेच विमुक्त जमाती या जात प्रवर्गातील असावा लागतो. तसेच तुमच्या कडे दारिद्रय रेषेचे कार्ड असेल तर तुम्हाला जास्त लवकर योजनेचा लाभ मिळू शकतो. तसेच शेततळे योजना चा लाभ मिळवण्यासाठी जर महिला प्रधान कुटुंब असेल तर तुम्ही सुद्धा अर्ज करून योजना मिळवू शकतात. अपंगत्व(disability) असेल कुटुंबामध्ये प्रमुख अर्जकर्ता व्यक्तीस तर अर्ज करू शकतात.

मनरेगा लाभार्थी निकष या प्रमाणे भुसुधार या योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल त्याच प्रमाणे तुम्हाला घरकुल हे

इंदिरा आवास योजनेच्या अंतर्गत मिळाले असेल तर तसेच 2 हेक्टर पर्यंत जमीन असलेले शेतकरी या मागेल त्याला शेततळे या योजने अंतर्गत लाभ घेऊ शकतात.

 

शेततळे योजना अर्ज कसा करायचा?

मागेल त्याला शेततळे या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी  आपले सरकार सेवा केंद्र किंवा तुमच्या तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी यांना भेट द्यावी. जे शेतकरी या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करावा तसेच समितीची संमती घ्यावी लागेल.

 

अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

डाऊनलोड