जमिनीची मोजणी करा घरबसल्या ऑनलाईन मोबाईल वरून | Online Land Calculation Process Information Marathi

 

मित्रांनो आपण आपल्या शेत जमिनीची मोजणी हे घरबसल्या अचूकपणे आपल्या मोबाईलच्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने फक्त पाच ते सहा मिनिटांमध्ये करू शकतो. आपल्याला आपल्या जमिनीची मोजणी करण्याकरिता अनेक पर्याय उपलब्ध असले तरीसुद्धा आपण मोबाईलच्या साह्याने आपल्या जमिनीची अचूक मोजणी करू शकतो. या प्रोसेस मुळे तुमचा वेळ आणि पैसाही वाचणार आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण आपल्या शेत जमिनीची मोजणी मोबाईल वरून घरबसल्या कशी करायची याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत. Online Land Calculation Process Information Marathi

 

 

जमिनीची मोजणी करा घरबसल्या ऑनलाईन मोबाईल वरून | Online Land Calculation Process Information Marathi
जमिनीची मोजणी करा घरबसल्या ऑनलाईन मोबाईल वरून | Online Land Calculation Process Information Marathi

 

 

 

पूर्वीच्या काळी आपल्याला जमीन मोजायचे असल्यास ती पारंपारिक पद्धतीने मोजावी लागत होती. किंवा आपण शासकीय पद्धतीने जमीन मोजण्याकरिता अर्ज देऊन शासकीय पद्धतीने जमीन मोजत होतो. परंतु आता आपल्याकडे डिजिटल पद्धतीने जमीन मोजण्याकरिता अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहे. आपण आपल्या मोबाईल वरून आपली संपूर्ण शेत जमीन मोजू शकतो. Online land calculation

 

 

या डिजिटल पद्धतीने आपली जमीन मोजण्याच्या प्रक्रियेला तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे असण्याची आवश्यकता नाही. आणि या पद्धतीने आपण अगदी सोप्या पद्धतीने आपल्या जमिनीचे मोजमाप करू शकतो. ऑनलाइन पद्धतीने जमिनीची मोजणी करण्यासाठी आपण घरबसल्या आपल्या जमिनीवर क्लिक करून म्हणजेच आपल्या जमिनीच्या बांधांवर क्लिक करून पूर्ण क्षेत्रफळ मोजू शकतो किंवा आपण आपल्या जमिनीच्या बांधावर फिरवून आपले जेवढे शेत्रफळ आहे त्यावर काठाने फिरून आपली जमीन मोजू शकतो. online jamin mojani

 

 

हे नक्की वाचा:- जमीन खरेदी करण्यासाठी शासन देत आहे, 100% अनुदान

 

आपल्या मोबाईलच्या साह्याने आपल्या जमिनीची मोजणी करण्याकरिता तुम्हाला प्ले स्टोर वरून एक ॲप डाऊनलोड करावे लागते. त्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या सहाय्याने आपण आपल्या शेत जमिनीची मोजणी अचूकपणे करू शकतो. हे ॲप्लिकेशन वापरण्यास अगदी सोपे आहे त्यामुळे कोणीही अगदी सहजपणे आपल्या जमिनीची मोजणी ऑनलाईन करू शकतो. online jamin mojani

 

 

जमिनीची मोजणी ऑनलाईन करण्याची प्रोसेस Online Land Calculation Process:-

मित्रांनो आपल्या जमिनीची मोजणी ही ऑनलाईन पद्धतीने करण्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.

 

1. सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअर हे ॲप्लिकेशन ओपन करून त्यामध्ये तुम्हाला जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर हे मोबाईल ॲप्लिकेशन सर्च करून डाऊनलोड करून घ्यायचे आहे. हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्या.

2. आता हे ॲप्लिकेशन ओपन करा त्यामध्ये तुम्हाला दोन पर्याय दिसतील त्यामध्ये तुम्ही पहिल्या पद्धतीमध्ये हाताने तुमच्या जमिनीची हद्द सिलेक्ट करून मोजणी करू शकतात. दुसरी एक पद्धत म्हणजे तुम्ही तुमच्या शेताच्या हद्दीवरून चालत जाऊन मोजणी करू शकतात.

3. आपल्या जमिनीची एकदम अचूकपणे मोजमाप होण्याकरिता आपण walking वॉकिंग म्हणजे शेताच्या बांधावरून चालत जाऊन मोजमाप करण्याची प्रक्रिया निवडून घेऊया.

4. आता तुम्हाला तुमच्या शेतामधील बांधावरून चालत जायचे आहे. जेवढी तुमची जमीन असेल, त्या शेत जमिनीच्या हद्दीवरून तुम्हाला तुमच्या शेताला वेढा घालायचा आहे.

5. आता तुम्हाला तुमच्या स्क्रीन वरती तीन टिंब दिसत असेल त्यावर क्लिक करा आणि तुमच्या जमिनीची मोजणी ही हेक्टर मध्ये करायची किंवा एकर मध्ये करायची किंवा गुंठेवारी मध्ये करायची हे सिलेक्ट करून घ्या. जर तुम्हाला एकर मध्ये तुमची जमीन मोजायची असेल तर एकर या पर्यायावर क्लिक करा.

6. आता तुमच्या समोर तुमच्या जमिनीचे एकूण क्षेत्रफळ आलेले असेल. अशा पद्धतीने आपण पहिल्या वॉकिंग या पर्यायाच्या साह्याने आपली जमीन मोजू शकतो.

 

 

हे नक्की वाचा:- जमिनीचा फेरफार काढा आता ऑनलाईन 

 

घरबसल्या ऑनलाईन जमीन कशी मोजायची?

मित्रांनो आपल्याला आपली जमीन घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मोबाईलच्या साह्याने मोजायची असल्यास तुम्हाला जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून ते तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. आता तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये पहिला पर्याय म्हणजेच Manually option निवडून मॅप च्या पर्यावर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला मॅप च्या साह्याने तुमची जमीन शोधून त्या जमिनीवर जायचे आहे. तुमचा मॅप त्या जमिनीवर नेल्यास तुम्हाला तुमच्या शेताच्या संपूर्ण जेवढ्या बांधा असतील त्यावर क्लिक करत करत सिलेक्ट करून घ्यायचे आहे. म्हणजे तुम्हाला मोबाईलवर तुमच्या हाताने तुमच्या जमिनीच्या हद्दीवर क्लिक करत करत संपूर्ण जमिनीचे क्षेत्रफळ सिलेक्ट करायचे आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर जमीन ही हेक्टर मध्ये मोजायची किंवा एकर मध्ये मोजायची किंवा गुंठेवारी मध्ये मोजायची यापैकी एक पर्याय निवडून घ्या. त्यानंतर तुम्हाला तुम्ही निवडलेल्या जमिनीचे क्षेत्रफळ मोजमाप करून दिलेले असेल.

 

 

हे नक्की वाचा:- शासनाकडून प्राप्त जमिनी आपल्या नावावर कश्या करायच्या?

 

अशाप्रकारे आपण आपल्या जमिनीची मोजणी ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने मोबाईलच्या साह्याने करू शकतो. ही माहिती इतरांना देखील शेअर करा, अशाच पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.