जमीन खरेदीसाठी 100% अनुदान योजना | Adivasi Jamin Kharedi yojna maharashtra 2022

 

आजच्या या पोस्ट मध्ये आपण आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येत असलेली जमीन खरेदी करण्यासाठी राबविण्यात येणारी आदिवासी स्वाभिमान व सबलीकरण योजना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.Adivasi yojana 2022 maharashtra information in marathi आदिवासी बांधवांना स्वाभिमानाने जगता यावे याकरिता त्यांना शासन जमीन खरेदी करण्यासाठी अनुदान देत आहेत. जमीन खरेदीला शासनाचे १००% अनुदान. ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्यात कशाप्रकारे राबवली जात आहे? अनुदान, कागदपत्रे या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

 

जमीन खरेदीसाठी 100% अनुदान योजना | Adivasi Jamin Kharedi yojna maharashtra 2022
जमीन खरेदीसाठी 100% अनुदान योजना | Adivasi Jamin Kharedi yojna maharashtra 2022

 

 

आदिवासी जमीन खरेदी अनुदान योजना महाराष्ट्र 2022 (Adivasi yojana maharashtra 2022) :-

आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने भूमिहीन आदिवासी बांधवांना जमीन खरेदी करण्यासाठी १००% अनुदान हे देण्यात येत आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील आदिवासी बांधवांसाठी ही स्वाभिमान व सबलीकरण योजना आहे. या योजने अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील भूमीहीन आदिवासी बांधवांना चार एकर जिरायती किव्हा दोन एकर बागायती जमीन खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जात आहे. Adivasi yojana maharashtra 2022

हे नक्की वाचा:- दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना

या jamin kharedi anudan yojana अंतर्गत आदिवासी बांधवांना जमीन खरेदी करण्यासाठी 100% अनुदान देण्यात येत आहे. या पूर्वी या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना १००% अनुदान देण्यात येत नव्हते. 50 % बिनव्याजी कर्ज व 50 % रक्कम असे या योजनेचे स्वरूप होते. त्यानंतर या आदिवासी जमीन खरेदी अनुदान योजनेत बदल करून ही योजना १००% अनुदान वर राबविण्यात येत आहे.

 

आदिवासी जमीन खरेदी अनुदान योजना लाभार्थी निवड प्रक्रिया:-

या योजने अंतर्गत अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यांची निवड ही त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या मार्फत नेमण्यात आलेली समिती करीत असते. त्या समितीचे अध्यक्ष हे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी स्वतः असतात. या योजने अंतर्गत लाभार्थी यांची निवड करत असताना अर्ज हे योजनेच्या लक्षांक पेक्षा जास्त आल्यास अर्जदारांच्या चिठ्या काढून निवड करण्यात येणार आहे. Jamin kharedi anudan yojana

 

या आदिवासी सबळीकरण व स्वाभिमान योजना(adivasi sabalikaran swabhiman yojana) अंतर्गत जमीन खरेदी करताना जर जमीन बागायत असल्यास 8 लाख रुपये एका एकर साठी तसेच जमीन ही जिरायत असल्यास 5 लाख रुपये एक एक एकर अशी मर्यादा आहे. या योजने अंतर्गत लाभार्थी निवड करत असताना परितक्त्या स्त्रिया, adivasi  scheme maharashtra  विधवा स्त्रिया यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

आदिवासी सबलीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत लाभ( Adivasi Jamin Kharedi Anudan Yojna ) :-

या योजने अंतर्गत भूमीहीन आदिवासी बांधवांना 4 एकर कोरडवाहू जमीन किंवा 2 एकर ओलिताखालील जमीन खरेदी करण्यासाठी १०० टक्के इतके अनुदान हे शासनातर्फे देण्यात येत आहे. जर जमीन ही कोरडवाहू चार एकर पेक्षा जास्त असल्यास सुद्धा या योजनेत लाभ मिळवून घेता येतो. या आदिवासी जमीन खरेदी योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी वय मर्यादा ही १८ वर्षे ते ६० वर्षे असणार आहे.

हे नक्की वाचा:- सरकार कडून मिळालेल्या जमिनी स्वतः च्या नावावर कश्या करायच्या

आदिवासी जमीन खरेदी अनुदान योजना अंतर्गत जमीन खरेदीचे नियम व अटी:-

या योजने अंतर्गत ज्या आदिवासी बांधवांना लाभ मिळेल त्या लाभार्थ्यांना त्यांना मिळालेली जमीन ही भाडेपट्ट्याने देता येणार नाही. तसेच ही जमीन त्या लाभार्थीना विकता येणार नाही. ही जमीन आदिवासी बांधवांना स्वतः कसण्यासाठी देण्यात आलेली आहे. कारण ही जमीन आदिवासी बांधवांना स्वाभिमान व सबलीकरण पुरविणारी आहे. या योजने अंतर्गत जी जमीन आपण खरेदी करणार आहोत ती जमीन ही पोटखराब, नापीक, खडकाळ जमीन नसावी. जमीन ही सुपीक कसण्यायोग असावी लागते. त्या जमिनीवर बोजा नसला पाहिजे. कर्ज नसले पाहिजे. बँकेची  बाकी नसल्याचे no dues प्रमाणपत्र जोडावे लागते. या योजनेकरिता लाभ घेण्यासाठी अर्ज जर जमीन खरेदी करणारा लाभार्थी शेतकरी तसेच जमीन विक्री करणारा शेतकरी दोघांना करायचा आहे.

या योजने चा अधिकृत GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आदिवासी जमीन खरेदी अनुदान योजना अर्ज download करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

अश्या प्रकारची आपल्या महाराष्ट्र राज्यातील भूमिहीन आदिवासी बांधवांना स्वाभिमानाने जगता यावे, तसेच या बांधवांचे सबलीकरण व्हावे या उद्देशाने ही आदिवासी जमीन खरेदी अनुदान योजना महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे.

ही माहिती महत्वपूर्ण असल्यास शेअर करा. अश्याच माहिती साठी आमच्या वेबसाईट ला भेट देत चला.