आजच्या या पोस्ट मध्ये आपण आपल्या राज्यातील आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या एका महत्त्वपूर्ण योजनेविषयी माहिती पाहणार आहोत. ती योजना विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे. ही योजना ही आदिवासी शेतकरी योजना ट्यूब वेल व पंपसेट अनुदान योजना आहे. आदिवासी बांधवांना त्यांच्या शेतात tube well, pump set, solar, well, farm pond करिता अनुदान हे देण्यात येत आहे.
आदिवासी शेतकरी योजना ट्यूब वेल व पंपसेट अनुदान योजना | Tube Well , Pump Set Subsidy Yojana Maharashtra |
Tube well , pump set subsidy scheme 2022 ही हिंगोली जिल्हा मार्फत राबविण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व आदिवासी शेतकरी बांधवांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. Tube well subsidy scheme अंतर्गत अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिलेली आहे.
आदिवासी शेतकरी योजना ट्यूब वेल व पंपसेट अनुदान योजना (Tube Well , Pump Set Subsidy Yojana Maharashtra) अर्ज प्रक्रिया :-
विशेष केंद्रीय सहाय्य योजनेमार्फत राबविण्यात येणाऱ्या या आदिवासी शेतकरी योजना ट्यूब वेल व पंपसेट अनुदान योजना अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाईन सुरू आहे. हिंगोली जिल्ह्या करिता योजना सुरू झालेली असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी बांधवांना अर्ज करावयाचा आहे. त्या शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज करावयाचा आहे. ज्यांनी करिता करावयाचा विहित नमुन्यातील अर्ज हा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कळमनुरी जिल्हा हिंगोली यांच्याकडे अर्ज उपलब्ध आहे. या कार्यालयातून अर्ज घेऊन च्या अर्जासोबत आवश्यक ते सर्व दस्तऐवज जोडून अर्ज हा या कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने जमा करायचा आहे.
हे नक्की वाचा:- आदिवासी बांधवांसाठी जमीन खरेदी करण्यासाठी १००% अनुदान योजना
Tube Well , Pump Set Subsidy Yojana Maharashtra आवश्यक कागदपत्रे :-
1. सदर योजना आदिवासी बांधवांसाठी असल्यामुळे त्यांना त्यांच्या अर्जात सोबत अनुसूचित जमाती मधील असल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट जोडायचे आहे.
2. बँक पासबुक झेरॉक्स
3. आधार कार्ड
4. रहिवासी प्रमाणपत्र
5. सातबारा (किमान 0.60 आर लागवड योग्य शेती असल्याचा पुरावा )
6. स्वयंघोषणापत्र ( यापूर्वी आदिवासी बांधवांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र)
7. इन्कम सर्टिफिकेट
8. दोन पासपोर्ट फोटो
वरील सर्व कागदपत्रे जोडून विहित नमुन्यातील अर्ज हा अचूकपणे भरून आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात नेऊन जमा करायचा आहे. त्या नंतर लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
हे नक्की वाचा:- सरकारी जमीन नावावर करण्यासाठी काय करावे?
आदिवासी बांधवांसाठी असलेल्या ट्युब वेल व पंप सेट अनुदान योजना करिता अर्ज करण्याची मुदत:-
आदिवासी शेतकरी योजना ट्यूब वेल व पंपसेट अनुदान योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज हा अर्जदारांना दिनांक १३ मे २०२२ ते २० मे २०२२ पर्यंत करता येणार आहे. सर्व आदिवासी शेतकरी बांधवांना विनंती आहे की, वरील दिलेल्या कालावधीमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत अर्ज करून घ्यावे. शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे. तारखे नंतर कोणीही अर्ज स्विकारण्यात येणार नाही. तसेच अपूर्ण अर्ज सुद्धा स्विकारण्यात येणार नाही.
अश्याच प्रकारच्या महत्वपूर्ण योजना विषयी माहिती आपण वेळोवेळी या वेबसाईट वर पाहत असतो, त्यामुळे या वेबसाईट ला भेट देत चला. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.