मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या शेतामध्ये जंगली वन्य प्राणी शिरत असतात. हे वन्य प्राणी आपल्यावर तसेच आपण पाहत असलेल्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करतात. जर या जंगली वन्य प्राण्यांमुळे केलेल्या हल्ल्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा किंवा त्याच्या पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यास वनविभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनातर्फे नुकसान भरपाई देण्यात येत असते. एखाद्या वेळेस जर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये व्यक्ती किंवा पशु म्हणून झाल्यास किंवा जखमी झाल्यास सुद्धा नुकसान भरपाई करिता आपल्याला अर्ज करता येतो. आणि आता या नुकसान भरपाई च्या दिल्या जाणाऱ्या रकमेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. आजच्या या पोस्टमध्ये याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.Vanyaprani nuksan 2022
वन्य प्राण्यांनी हल्ला केला, मिळवा 20 लाख रुपये शासनाची मदत | Vanyaprani Nuksan Bharpai 2022 |
आपल्या महाराष्ट्र राज्यात वन विभागाच्या वतीने वन्यजीव संवर्धन अभियान राबवण्यात येत असते. या अभियानामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यात वन्यप्राण्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. वन विभागाच्या वतीने जे लोक त्यांच्या वस्त्या ह्या वनांच्या आसपास आहेत, अशा लोकांना वन विभाग वेळोवेळी प्रबोधन करत असते. यामुळे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत जे लोक वनाच्या आसपास राहतात, अशा गावातील लोकांचे वनावरील अवलंबन कमी करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न सुद्धा करण्यात येत आहेत. vanyaprani nuksan Bharpai 2022
ह्या उपायोजना राबवण्यात येत असल्या तरीसुद्धा दरवर्षी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे अनेक प्रकारच्या मनुष्यहानीच्या घटना आपल्याला घडताना दिसत आहे. वन्य प्राण्यांमुळे मनुष्यावर तसेच इतर पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना आपल्याला पाहताना दिसत आहेत. आणि या घटना आता दिवसेंदिवस दिवस वाढत चाललेल्या आहे.
या वाढत्या घटना विचारात घेता महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकसान झालेल्या कुटुंबांना वितरित करण्यात येणाऱ्या नुकसान भरपाई मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. वन विभागाच्या वतीने लांडगा, तरस कोल्हा, मगर, हत्ती, व रान कुत्रे, वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे नुकसान झाल्यास देण्यात येत असलेल्या vanyaprani nuksan नुकसान भरपाई मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केलेली आहे.
वन्यप्राण्यांचे हल्ल्यामुळे झालेल्या नुकसान भरपाई मध्ये खालील प्रमाणे वाढ करण्यात आलेली आहे:-
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती मृत झाल्यास पूर्वी 15 लाख रुपये अनुदान देण्यात येत होते, परंतु आता अनुदानात वाढ केल्याने 20 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून अनुदान देण्यात येणार आहे. Vanyaprani Nuksan Bharpai 2022 Maharashtra
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे गाय म्हैस बैल याचा मृत्यू झाल्यास यापूर्वी 60 हजार रुपये देण्यात येत होते, परंतु आता अनुदानात वाढ केल्याने 70 हजार रुपये देण्यात येणार आहे.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मेंढी बकरी व इतर पशुधन याचा मृत्यू झाल्यास यापूर्वी 10 हजार रुपये देण्यात येत होते, परंतु आता अनुदानात वाढ केल्याने 15 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. Wildlife Compensation Scheme Maharashtra
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे गाय,म्हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास यापूर्वी 4 हजार रुपये अनुदान देण्यात येणार होते, परंतु आता अनुदानात वाढ केल्याने 5 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
हे नक्की वाचा:- कोणत्याही शासकीय विभागाची तक्रार अशी करा ऑनलाईन
अश्या प्रकारे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणारी नुकसान भरपाई रक्कम ही वाढ केलेली आहे. त्यामुळे आता 20 लाख रुपये पर्यंत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने या संबंधित शासन निर्णय सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे. 23 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणारी नुकसान भरपाई रक्कम वाढविण्यासाठी शासन निर्णय प्रकाशित केला आहे. Vanyaprani Nuksan Bharpai 2022 Maharashtra, Vanyaprani Nuksan Bharpai 2022
शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
वन्य प्राणी हल्ल्यामुळे नुकसान भरपाई करिता अर्ज प्रक्रिया:-
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे जर एखाद्या व्यक्ती किंवा जनावर मृत्युमुखी किंवा जखमी झाल्यास खालील वन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याचे वेबसाईटवर जाण्याकरिता येथे क्लिक करा.
ही माहिती आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.