आता शेतकरी बांधवांना ई-फेरफार(E Ferfar) काढता येणार आहे. महसूल प्रशासनातील कामे ही गतिशित रित्या व्हावी. त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या पैशाची तसेच वेळेची बचत व्हावी, आणि शेतकरी बांधवांची गैरसोय थांबावी या करिता शासनाने ई- हक्क प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधवांना फेरफार संबंधित अनेक कामे ही ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता महसूल प्रशासनातील या कामांना गती येणार आहे. आजच्या या पोस्ट मध्ये आपण ऑनलाईन फेरफार कसा काढायचा? Ferfar Online Maharashtra या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
फेरफार ऑनलाईन (Ferfar Online Maharashtra)
महसूल प्रशासनातील हे गतिशिल आणि पारदर्शक व्हावे या करिता आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने ई-हक्क प्रणाली विकसित केलेली आहे. या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून आता शेतकरी बांधवांना तलाठ्यांकडे 9 प्रकारचे विविध फेरफार हे ऑनलाईन(Ferfar Online Maharashtra) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधवांना फेरफार नोंद करण्यासाठी तलाठ्याकडे चकरा माराव्या लागणार नाही.
हे नक्की वाचा:- शासनाकडून प्राप्त जमिनी आपल्या नावावर कश्या करायच्या?
शेतकरी बांधवांना फेरफार(Ferfar Online Maharashtra) संबंधित किंवा इतर महसूलची कामे करण्यासाठी तलाठ्यांच्या शहरातील ऑफिस मध्ये जावे लागत होते, त्यामुळे शेतकरी बांधवांचे पैसा तसेच वेळ हा वाया जात होता. त्याच बरोबर अनेक प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागत होता. आता वरील सर्व प्रकारच्या अडचणी पासून शेतकऱ्यांची मुक्तता व्हावी याकरिता ई हक्क प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता महसूल संबंधित सर्व कामे तसेच फेरफार संबंधित कामे हे जलद आणि सहजरित्या होणार आहे.
फेरफार संबंधित खालील कामे होणार ऑनलाईन( Ferfar Online Maharashtra)
या ई हक्क प्रणाली अंतर्गत आता फेरफार संबंधित कामे ऑनलाईन ( Maharashtra Ferfar Online ) होणार आहे. 9 प्रकारचे विविध फेरफार हे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामध्ये आता घर बसल्या ई करार नोंदी करणे, वारसाची नोंद घेणे, सातबारावर बोजा चढविणे, सातबारा वरील बोजा कमी करणे, सातबारा वरील मृताचे नाव कमी करणे, एकत्र कुटुंब करता नोंद कमी करणे त्याचबरोबर तुमच्या संगणकीकृत सातबारा मध्ये जर चुका असतील तर त्या दुरुस्त करणे त्याचबरोबर अनेक इतर फेरफार संबंधित कामे आता ऑनलाइन घरबसल्या तेही फ्री मध्ये करण्यात येणार आहे.
हे नक्की वाचा:- मुलींचा वडिलांच्या संपत्तीत असलेला वाटा किती?
फेरफार कालावधी
फेरफार ( E Ferfar Maharashtra) संबंधित ऑनलाईन कामेही 15 दिवसापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. शेतकरी बांधवांनी ऑनलाइन फेरफार अर्ज भरल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत फेरफार नोंदी व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांनी फेरफार ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्या भागातील तलाठी कागदपत्राची पडताळणी करून फेरफार मंजूर करून घेणार आहे. जर काही त्रुटी आढळल्यास अर्ज परत पाठवण्यात येणार आहे. वरील सर्व बाबी पूर्ण होण्याकरिता 15 दिवसांपर्यंत कालावधी लागू शकतो.
ई-फेरफार प्रणाली कशी काम करणार?
ही फेरफार(E – Ferfar) प्रणाली मध्ये सर्वप्रथम शेतकरी आपल्या महाराष्ट्र सरकारच्या डिजिटल सातबारा या वेबसाईटवर जाऊन अर्ज करणार आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपडेट केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला होता त्या मोबाईल क्रमांकावर अर्ज केल्याची पोच पावती तसेच अर्ज क्रमांक मिळणार आहे. त्यानंतर तलाठी फेरफार अर्जाची पडताळणी करणार आहे त्यानंतर तलाठी तुमच्या फेरफारचे काम ऑनलाईन करणार आहे.
आपण बऱ्याच वेळा पाहिले असेल की फेरफार(Maharshtra Ferfar Online) संबंधित तसेच महसूल संबंधित अनेक कामांकरिता शेतकऱ्यांची अडवणूक केल्याच्या तक्रारी आपल्याला पाहायला मिळाले असेल परंतु आता या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्याने संबंधित विभागाकडून शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही.
फेरफार ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
ऑनलाइन पद्धतीने फेरफार(Ferfar Online Maharashtra) संबंधित कामे करण्याकरिता तुम्हाला फेरफार अर्ज करायचा असतो. तो तुम्ही ऑनलाईन सातबाराच्या वेबसाईटवर करू शकतात.
तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही:-
शासनाच्या तर्फे विकसित करण्यात आलेल्या या ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून महसूल विभागातील तसेच फेरफार संबंधित सर्व कामे ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे आता आपल्याला तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची गरज पडणार नाही. तुम्ही फेरफार मोबाईल मधून डाऊनलोड करू शकतात.
फेरफार डाऊनलोड कशे करायचे?
फेरफार(How to Download Ferfar Online) करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर आपल्याला ऑनलाईन 7/12 च्या वेबसाईट वरून फेरफार डाऊनलोड करता येतो.