नियमित कर्ज माफी संदर्भात नवीन मंत्रिमंडळ निर्णय; 50 हजार रु. अनुदान | Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra

नियमित कर्ज माफी संदर्भात नवीन मंत्रिमंडळ निर्णय; 50 हजार रु. अनुदान | Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra

 

 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने कर्जमाफी संदर्भात महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबरोबरच अतिवृष्टीग्रस्त तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांचा देखील समावेश आता या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी बांधवांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. Niyamit Karj Mafi Yojana 2022 Maharashtra ची व्याप्ती आता वाढवण्यात आलेली आहे. या नवीन निर्णयामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील 14 लाख शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे या योजनेच्या अंमलबजावणी करता सहा हजार कोटी रुपयांचा निधी हा लागणार आहे.

 

नियमित कर्जमाफी 2022 महाराष्ट्र Niyamit Karj Mafi 2022 Maharashtra

महाराष्ट्र सरकारच्या नियमित कर्ज माफी योजना अंतर्गत वर्ष 2019 मध्ये राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे. या नियमित कर्ज माफी योजना महाराष्ट्र अंतर्गत जर एखाद्या शेतकरी हा मयत झालेला असेल परंतु त्यांच्या वारसदारांनी त्या शेतकऱ्यांच्या कर्जाची परतफेड केलेली असल्यास त्यामुळे त्या मयत शेतकऱ्याच्या वारसाला सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.

हे नक्की वाचा:- व्यवसायासाठी कर्ज योजना अर्ज सुरू

 

 

आज घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते. या नियमित कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणी करण्याकरिता सुमारे 13.85 लाख शेतकऱ्यांच्या 14.57 लाख कर्जखात्यांसाठी अंदाजे रु. 5722 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

नियमित कर्ज माफी योजना अंतर्गत आता; यांना सुद्धा मिळणार 50 हजार रु. अनुदान

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन पर पन्नास हजार रुपये अनुदान म्हणून लाभ देण्याकरिता वर्षे 2017–18, 2018–19 आणि 2019–20 हा कालावधी करिता वरील आर्थिक वर्षा पैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांमध्ये जर शेतकरी बांधवांनी पीक कर्ज घेऊन त्याची नियमित कर्ज परतफेड (Niyamit Karj Mafi Yojana 2022 Maharashtra) पूर्ण केलेली असल्यास त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता या नियमित कर्ज परतफेड योजना अंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.

आर्थिक वर्ष 2017- 18 आणि आर्थिक वर्ष 2018-19 या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांनी घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज हे 30 जून 2018 व 30 जून 2019 या कालावधीमध्ये पूर्णता परतफेड केली असेल आणि आर्थिक वर्ष 2019-20 या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांनी घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णतः परतफेड ही 31 ऑगस्ट, 2020 पर्यंत केलेली असल्यास

हे नक्की वाचा:- ओबीसी कर्ज योजना 2022 ऑनलाईन अर्ज सुरू 

 

2017–18 या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून, 2018 पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास, 2018-19 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून, 2019 पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास, 2019-20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 31 ऑगस्ट, 2020 पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास अशा शेतकरी बांधवांना अल्पमुदती पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रुपये 50 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन रक्कम म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

नियमित कर्ज माफी योजना (Karj Mafi Yojana 2022)

जर शेतकरी बांधवांना आर्थिक वर्ष 2018 – 19 अथवा 2019 – 20 या कालावधीत (Niyamit Karj Mafi Yojana 2022 Maharashtra) अल्प मुदतीचा पीक  कर्ज घेतलेले असेल, आणि त्या पीक कर्जाची रक्कम रु. 50 हजारापेक्षा कमी असेल तर, अशा शेतकरी बांधवांना मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

शेतकरी बांधवांना नियमित कर्ज परतफेड योजना अंतर्गत लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेतल्या जाणार आहेत. जर शेतकरी बांधवांनी एक किंवा एका पेक्षा जास्त बँकेकडून कर्ज घेतले असेल तर, त्या सर्व बँकांची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रु. 50 हजार या कमाल मर्यादेत अनुदान म्हणून प्रोत्साहनपर रक्कम ही शेतकरी बांधवांना अनुदान म्हणून वितरित करण्यात येणार आहे.

प्रोत्साहनपर लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक/ अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक(Karj Mafi Yojana 2022 Maharashtra)  कर्जाच्या परतफेडीची . प्रोत्साहनपर लाभ योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.

ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण माहिती करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.