अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना | Dr. A. P. J. Abdul Kalam Education Loan Scheme

 

जे विद्यार्थी अल्पसंख्याक समूहातील आहे, अश्या अल्पसंख्याक समूहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळणार आहे. अल्पसंख्याक समूहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज हे डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना (Dr. A. P. J. Abdul Kalam Education Loan Scheme) अंतर्गत मिळणार आहे. डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना 7.50 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज मिळणार आहे. Dr. A. P. J. Abdul Kalam Education Loan Scheme 2022 अंतर्गत कर्ज मिळविण्याकरिता अर्ज कसा करायचा? कोणत्या विद्यार्थ्यांना हे कर्ज मिळणार आहे, या विषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना | Dr. A. P. J. Abdul Kalam Education Loan Scheme
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना | Dr. A. P. J. Abdul Kalam Education Loan Scheme

डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना काय आहे? Dr. A. P. J. Abdul Kalam Education Loan Scheme 2022 

मित्रांनो डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना अंतर्गत मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून(Maulana Azad Karj Yojana Maharashtra 2022) हे कर्ज अल्पसंख्याक समूहातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अल्पसंख्याक समूहातील जे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत, अश्या विद्यार्थ्यांना या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना अंतर्गत(Dr. A. P. J. Abdul Kalam Education Loan Scheme 2022) सात लाख 50 हजार रुपये पर्यंत शैक्षणिक कर्ज मिळणार आहेत. शैक्षणिक कर्ज योजना अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे

 

हे नक्की वाचा:-  Government Hostel काय आहे? अर्ज प्रक्रिया, संपूर्ण माहिती 

शैक्षणिक कर्ज कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार Dr. A. P. J. Abdul Kalam Education Loan Scheme 2022 

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना अंतर्गत(Dr. A. P. J. Abdul Kalam Education Loan Scheme 2022) अल्प संख्यांक समूहातील शीख, जैन, पारशी व ज्यू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळणार आहे. कर्ज हे 7.50 लाख रुपये पर्यंत मिळणार आहे. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून हे कर्ज वितरित करण्यात येणार आहे.

 

शैक्षणिक कर्ज कोणत्या अभ्यासक्रमासाठी मिळणार

Dr. A. P. J. Abdul Kalam Education Loan Scheme 2022 अंतर्गत खालील व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळणार आहेत.

इंजिनिअरींग, मेडीकल,आयटीआय, पॉलिटेक्निक,मास मीडिया, चित्रपट निर्मिती, नर्सिंग, फॅशन डिझायनींग, टुरीजम, पत्रकारीता,  संबंधित विविध व्यावसायिक अभ्यासक्रम, हॉटेल मॅनेजमेंट, ॲनिमेशन अश्या अनेक प्रकारच्या अभ्यासक्रमासाठी या डॉ. ए पी जे अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना अंतर्गत सात लाख 50 हजार रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहेत.

 

किती कर्ज मिळणार?

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना या डॉ. ए पी जे अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना अंतर्गत 7.50 लाख कर्ज मिळणार आहे.

कोणते विद्यार्थी पात्र आहेत?

अल्पसंख्याक कर्ज योजनेसाठी दहावी आणि बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यास क्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या डॉ. ए पी जे अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना अंतर्गत शैक्षणिक कर्ज ( Education Loan ) मिळणार आहे.

कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी?

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना (Dr. A. P. J. Abdul Kalam Education Loan Scheme 2022) अंतर्गत शैक्षणिक कर्ज मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी घेतलेले कर्ज हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यापासून पुढील 5 वर्षात कर्जाची परतफेड करायची आहे.

हे नक्की वाचा:- राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना

 

अल्पसंख्यांक शैक्षणिक कर्ज योजना व्याजदर

अल्पसंख्यांक शैक्षणिक कर्ज योजना Minority Education Loan Scheme अंतर्गत शैक्षणिक कर्ज वर  3 टक्के इतका व्याजदर आकारण्यात येणार आहे.

 

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना व मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना माहिती:-

Maulana Azad Education Loan Scheme आणि Dr A.P.J Abdul Kalam Education Loan Scheme अंतर्गत बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना शैक्षणिक कर्ज मिळविण्याकरिता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

केंद्र सरकारच्या वतीने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना (Dr A.P.J Abdul Kalam Education Loan Scheme)राबविण्यात येत आहेत. या योजने अंतर्गत 7.50 लाख रुपये पर्यंत शैक्षणिक कर्ज मिळणार आहे. या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना “Dr. A. P. J. Abdul Kalam Education Loan Scheme 2022” अंतर्गत वार्षिक उत्पन्न मर्यादा ही कुटुंबाची शहरी भागासाठी 1 लाख 20 हजार रुपयांपेक्षा कमी असायला हवी. तसेच ग्रामीण भागांतील कुटुंबातील उत्पन्न मर्यादा ही 98 हजार रुपये पेक्षा कमी हवी. या योजने अंतर्गत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय हे 16 ते 32 वर्ष असावे लागते.Minority Education Loan Scheme

आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत आहे. (Maulana Azad Education Loan Scheme 2022) या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना रू 5 लाख पर्यंत शैक्षणिक कर्ज मिळणार आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपयांपर्यंत असले तरी सुद्धा अर्ज करता येतो. त्याच प्रमाणे  अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे वय हे 18 ते 32 वर्षे या दरम्यान असायला हवे.

 

अल्पसंख्यांक शैक्षणिक कर्ज योजना अर्ज प्रक्रिया:-

आपल्या महाराष्ट्र राज्यातील ज्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना या अल्पसंख्यांक शैक्षणिक कर्ज योजना अंतर्गत अर्ज करायचा असेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या Alpsankhyank Shaikshanik  Karj Yojana अंतर्गत तुम्ही व्यवसायिक शिक्षण पूर्ण करण्याकरिता सात लाख पन्नास हजार रुपये पर्यंत शैक्षणिक कर्ज मिळवू शकतात.

या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी malms.maharashtra.gov.in  या वेबसाईट वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना पात्रता Maulana Azad Karj Yojana Maharashtra Eligibility 

Maulana Azad Karj Yojana Maharashtra या योजने अंतर्गत अर्ज करणारा अर्जदार हा अल्पसंख्याक समाजातील असावा लागतो. या मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना अंतर्गत अर्ज करणारा अर्जदार याने व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या पदवी किंवा पदविकेसाठी प्रवेश घेतलेला असावा लागतो.  त्याच प्रमाणे अर्ज करणारा अर्जदार हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा लागतो. त्याच प्रमाणे अर्जदाराचे वय हे  वर्ष16 ते 32 या दरम्यान असायला पाहिजे. उत्पन्न मर्यादा ही 2,50,000/- पेक्षा कमी पाहिजे.

हे नक्की वाचा:- Education Loan अर्ज प्रक्रिया

अल्पसंख्यांक शैक्षणिक कर्ज योजना संपर्क

या योजने विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात संपर्क साधू शकतात. तसेच मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या या https://mamfdc.maharashtra.gov.in वेबसाईट वर जाऊन अधिक माहिती मिळवू शकतात. तसेच या योजने मधील जिल्हास्तरीय कार्यालयांची माहिती सुद्धा या वेबसाईट वर देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे मुंबई येथील 022-22657982 या फोन क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकतात.