अग्निपथ योजना काय आहे, माहिती मराठी | Agneepath Scheme Information In Marathi

 

मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये आपण केंद्र सरकारच्या वतीने नुकत्याच जाहीर केलेल्या “अग्निपथ योजना 2022” विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. पूर्वी ज्या प्रमाणे सैन्य भरती व्हायच्या त्यामध्ये आता बदल करून पूर्वीच्या सर्व भरती रद्द करून आपल्या देशाच्या संरक्षण क्षेत्रात भरतीसाठी अग्नीपथ योजना 2022(अग्निपथ योजना 2022 माहिती मराठी) अंतर्गत नवीन भरती करण्यात येणार आहे.लष्कर, नौदल आणि वायुदलातील सैनिक भरतीसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. Agnipath scheme 2022 ही सध्या खूप चर्चेत आहे. त्यामुळे या योजनेविषयी आपल्या मराठी भाषेतून माहिती जाणून घेणे हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

 

अग्निपथ योजना काय आहे, माहिती मराठी | Agneepath Scheme Information In Marathi,agnipath yojna mahiti marathi
अग्निपथ योजना काय आहे, माहिती मराठी | Agneepath Scheme Information In Marathi

 

 

Agneepath Scheme 2022 अंतर्गत देशातील तिन्ही सशस्त्र दलांमध्ये तरुणांची भरती करण्यात येणार आहे. आपल्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्री मंडळाने अग्निपथ योजना 2022 ला मंजुरी देण्यात आलेली आहे. या अग्निपथ योजना अंतर्गत देशाच्या सैन्यात भरती होणाऱ्या सैनिकांना अग्निविर असे म्हणण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत नवीन सेलेक्शन झालेल्या सैनिकांना म्हणजेच अग्निवीरांना चार वर्षांसाठी सैन्य दलात आपली सेवा बजावता येणार आहे. पूर्वी पेक्षा आता कमी काळच सैनिक म्हणून काम करता येणार आहे. Agneepath Yojna Information In Marathi, Agneepath Scheme Information In Marathi

 

हे नक्की वाचा:- Sc आणि Obc प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्मी भरती करिता फ्री कोचिंग व स्कॉलरशिप योजना

 

 

अग्निपथ योजना काय आहे? Agneepath Yojana Information In Marathi :-

देशाच्या तिन्ही सशस्त्र दलात सैनिक म्हणून देश सेवा करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने “अग्निपथ योजना 2022”  आणली आहे. पूर्वीच्या पद्धतीत बदल करून ही नवीन योजना आणली आहे. या अग्निपथ योजना अंतर्गत दरवर्षी किमान 46 हजार तरुणांची लष्कर भरती करण्यात येणार आहे. आणि या अग्निविरांना 4 वर्षे सैनिक म्हणून कार्य करता येणार आहे. 4 वर्षांनी त्यातील 25% तरुणांना नियमित लष्करी सेवेत सामावून घेतले जाईल व उर्वरीत 75% उमेदवारांना निवृत्त करण्यात येणार आहे. Agnipath yojna mahiti marathi, Agneepath Yojana Mahiti Marathi

 

अग्निपथ योजना 2022 स्वरूप ( Agneepath Yojana 2022 ) :-

 

या अग्निपथ योजना अंतर्गत ज्या तरुणांना देशाच्या संरक्षण क्षेत्रात अग्निवीर म्हणून कार्य करायचे असेल अश्या तरुणांना वयाची अट ही 17.5 वर्षे ते 21  वर्षे दरम्यान असणार आहे. कोरोना काळात दोन ते तीन वर्षे कोणतीही सैनिक भरती झालेली नसल्यामुळे केंद्र सरकारने या योजने अंतर्गत वयोमर्यादा ही या वर्षाकरिता 23 वर्षे करण्यात आलेली आहे. पुढच्या वर्षीपासून ही मर्यादा 21 वर्षे पर्यंत असणार आहे. या मधील 25% तरुणांना कायमस्वरूपी ठेवण्यात येईल आणि उर्वरित तरुणांना सेवेतून मुक्त केले जाईल. जे अग्निविर चार वर्षानंतर रिटायर होतील त्यांना प्रत्येकी 11 लाख 71 हजार रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे. ही रक्कम करमुक्त असणार आहे. आणि या तरुणांना संरक्षण क्षेत्रातील विविध भरती साठी प्राधान्य देण्यात येईल.

 

अग्निपथ योजना अग्निवीरांना लाभ:-Agneepath Yojana benefits information in Marathi : –

अग्नीपथ योजने अंतर्गत समाविष्ट होणाऱ्या तरुणांना म्हणजे अग्नी वीरांना पहिल्या वर्षी 30 हजार रुपये की वेतन देण्यात येईल. पहिल्या वेतनाच्या तीस हजार रुपयांपैकी 21 हजार रुपये त्यांना पेमेंट म्हणून देण्यात येणार आहे. त्यापैकी 9000 रुपये म्हणजेच 30% रक्कम कॉर्पस फंडसाठी योगदान म्हणून कपात होईल. तसेच सरकार सुद्धा सरकार च्या वतीने 9000 रुपये कॉर्पस फंडसाठी योगदान म्हणून देईल.

अग्नी वीरांना दुसऱ्या वर्षी 33000 रुपये वेतन असेल त्या पैकी 23100 अग्नी वीरांना मिळेल व 9900 रुपये कॉर्पस फंडसाठी योगदान म्हणून देईल.

अग्नी वीरांना तिसऱ्या वर्षी 36500 रुपये वेतन तर त्या पैकी 25580 वेतन मिळेल व त्या पैकी 10950 कॉर्पस फंडसाठी योगदान कपात होईल.

अग्नी वीरांना 4 थ्या वर्षी 40 हजार रुपये वेतन तर 28000 रुपये प्रत्यक्ष वेतन तर 12000 कॉर्पस फंडसाठी योगदान कपात होईल.

 

हे नक्की वाचा:- education loan कसे घ्यावे? संपूर्ण माहिती

 

चार वर्षानंतर एकूण अग्नीवीर कॉर्पस फंड रु  5.02 लाख रु अग्निविरांचे तर 5.02 लाख रुपये सरकारचे अनुदान व व्याज असे एकूण निवृत्ती नंतर 11.71 लाख रुपये मिळेल.

त्याच प्रमाणे अग्निविराना 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण कवच मिळणार आहे. आणि जर अग्णिविर कर्तव्य बजावत असताना मृत्यू प्राप्त झाल्यास 1 करोड रुपयाचे कवच त्याच्या कुटुंबास देण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत देशातील तरुणांना देशासाठी कार्य करण्याची संधी मिळणार आहे.

1 thought on “अग्निपथ योजना काय आहे, माहिती मराठी | Agneepath Scheme Information In Marathi”

Leave a Comment