शेती करत असताना उपलब्ध असणारी पाण्याची गरज पूर्ण व्हावी यासाठी विहीर योजनेअंतर्गत लाभ देऊन शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राज्यात विहीर अनुदान योजना राबविण्यात येत आहे. पूर्वी महाराष्ट्र राज्यात मनरेगाच्या अंतर्गत सिंचन विहीर योजना राबवण्यात येत होती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहिरीसाठी दोन लाख 50 हजार अनुदान मिळत होते परंतु मध्यंतरी शिंदे फडणवीस सरकारने योजनेमध्ये बदल करून मागेल त्याला विहीर योजना सुरू केलेली असून आता या Sinchan Vihir Anudan योजने अंतर्गत 4 लाख रुपये अनुदान मिळत आहे.
ज्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत चार लाख रुपये अनुदान मिळण्यासाठी नवीन अर्ज केले होते अशा शेतकऱ्यांची आता पात्र जी शेतकरी ठरले आहेत त्या शेतकऱ्यांची नवीन यादी प्रकाशित झालेली आहे. त्यामुळे या Magel Tyala Vihir Yojana Benificery List ज्या शेतकऱ्यांचे नाव असेल अशा शेतकऱ्यांना आता नवीन विहिरीचे बांधकाम करण्यासाठी चार लाख रुपये मिळणार आहे.
अनेक शेतकऱ्यांनी केले होते अर्ज:
राज्य मनरेगा सिंचन विहिरीच्या योजनेत बदल केल्यानंतर मागील त्याला विहिरी योजना अंतर्गत अनेक प्रकारचे निकष व अटी रद्द करण्यात आलेल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांना योजने करता अर्ज करून लाभ मिळणे सुलभ झाले होते. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीसाठी या vihir anudan yojana अंतर्गत अर्ज केला होता.
आता अशा शेतकऱ्यांची आता निवड करण्यात आलेली असूनही शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर:
योजने अंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केला होता परंतु त्यापैकी जे शेतकरी पात्र ठरलेले आहेत, म्हणजेच जे शेतकरी आता 4 लाख रुपये अनुदान मिळवू शकतात, अशा शेतकऱ्यांची नवीन यादी प्रकाशित झालेली आहे. ही यादी कशी पहायची त्याची सुद्धा माहिती खाली दिलेली आहे.
अशी पहा विहीर योजना ची लाभार्थी यादी? Vihir Yojana List:
विहीर योजनेअंतर्गत लाभार्थी यादी पाहण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.
1. सर्वप्रथम तुम्हाला मनरेगाच्या nrega.nic.in या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे.
2. आता या ठिकाणी तुम्हाला ग्रामपंचायत नावाच्या ऑप्शन वर जायचं आहे त्यानंतर तुमच्या गावचा संपूर्ण मनरेगाचा रिपोर्ट पाहण्यासाठी जनरेट रिपोर्ट वर क्लिक करायचं आहे.
3. आता तुम्हाला सुरुवातीला महाराष्ट्र राज्य तसेच कोणत्या वर्षाची लाभार्थी यादी पहायची ते वर्ष आणि तुमचा जिल्हा तालुका व तुमचं गाव निवडून घ्यायचा आहे.
4. ही सर्व माहिती व्यवस्थितपणे भरल्यानंतर तुमच्या गावची संपूर्ण मंदिराची माहिती तुमच्यासमोर आलेली आहे त्यामध्ये तुमच्या गावात सुरू असणाऱ्या सर्व योजना दिसत असेल.
5. आता तुम्हाला सिंचन विहिरीचं यादी पाहण्यासाठी वर्क स्टेटस नावाचा ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
6. आता चालू फायनान्शिअल वर्षी निवडून घेऊ शकतात आता तुमच्या समोर संपूर्ण गावातील कामांची लिस्ट आहे त्यामध्ये सिंचन विहीर ज्या व्यक्तींच्या नावासमोर असेल त्यांना विहिरीसाठी अनुदान मिळणार आहे.
या शेतकऱ्यांना किती लाखांचे अनुदान मिळेल. ही माहिती सुद्धा याठिकाणी उपलब्ध होईल. महत्त्वाची बाब म्हणजे चालू आर्थिक वर्षाव्यतिरिक्त मागील वर्षातील माहिती देखील याठिकाणी तुम्ही पाहू शकता.त्यासाठी फक्त आर्थिक वर्ष बदलावे लागेल. तसेच इतर योजनांची माहिती सुद्धा तुम्ही याठिकाणी घेऊ शकता.