Nuksan Bharpai: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, येत्या 10 दिवसात मिळेल सततचा पाऊस नुकसान भरपाई, मुख्यमंत्र्याचे आदेश

शेतकरी बांधवांनो राज्यातील अनेक शेतकऱ्यांना सततच्या पावसामुळे हैराण केले होते. राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि सततचा पाऊस तसेच गारपीट यांनी थैमान घातलेले होते, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यासंदर्भात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्फत त्यावेळेस नुकसान भरपाई वितरित केली होती परंतु सततचा पाऊस झाल्यामुळे नुकसान भरपाई वाटप करणे बाकी होते त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दहा दिवसात शेतकऱ्यांना Nuksan Bharpai वाटप करण्याचे निर्देश दिलेले आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सततच्या पाऊस Nuksan Bharpai Maharashtra संदर्भात दिलेले हे महत्त्वाचे निर्देश काय आहेत कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. या संदर्भात थोडक्यात माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

राज्यातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात शासन दरबारी स्वतःच्या पावसाची Nuksan Bharpai 2023 Maharashtra वाटप करण्यासाठी मागणी करण्यात येत होती. त्या संदर्भात आता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.

 

शेतकऱ्यांना येत्या 10 दिवसात नुकसान भरपाई वाटपाचे मुख्यमंत्र्याचे निर्देश Ativrushti Nuksan Bharpai:

शेतकरी बांधवांनो राज्यात मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक 16 मे 2023 रोजी पार पडली, या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वांच्या पावसाच्या नुकसान भरपाई संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला होता तसेच हा मुद्दा चर्चेसाठी आला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या दहा दिवसात शेतकऱ्यांना सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई वाटप करावी असे महत्त्वाचे निर्देश दिले आहे.

हे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना लवकरात लवकर वाटप करण्यात यावी यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडे चर्चा सुद्धा करण्यात आलेली आहे.

 

सततचा पाऊस नुकसान भरपाई कोणाला मिळणार?

शेतकरी बांधवांना राज्याच्या विविध भागात त्यामध्ये प्रामुख्याने अमरावती तसेच छत्रपती संभाजीनगर तसेच नाशिक व नागपूर आणि पुणे या महसूल विभागाकडून राज्य शासनाकडे नुकसान भरपाई संदर्भात प्रस्ताव दाखल करण्यात आलेले होते. यावरील विभागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालेले असल्यामुळे नीकशाच्या आधारे Nuksan Bharpai निश्चित करून वाटप करण्यात येईल.

Monsoon 2023 Update: शेतकऱ्यांनो सावधान मान्सून संदर्भात मोठी बातमी, यंदा मान्सून उशिरा, बळीराजाच्या चिंतेत वाढ

 

अशाप्रकारे राज्यातील सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्फत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आलेले असून आता लवकरच शेतकऱ्यांना सातच्या पाऊस नुकसान भरपाई वाटप करण्यात येत आहे.

Perni Anudan: खुशखबर, शेतकरी बांधवांनो आता पेरणीसाठी 10 हजार अनुदान, या शेतकऱ्यांना मिळेल, पहा कसा मिळेल लाभ