Crop Insurance Update: शेतकऱ्यांना पिक विमा न वाटप करणाऱ्या पिक विमा कंपनीला दणका, कंपनीला टाकले ब्लॅकलिस्ट मध्ये

शेतकरी बांधवांना प्रत्येक हंगामामध्ये शेतकरी त्यांच्या पिकांना पीक विमा संरक्षण मिळावे या दृष्टीने प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत त्यांच्या शेती पिकांचा पिक विमा काढत असतो. प्रधानमंत्री पिक विमा योजना केंद्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणारी महत्त्वाची योजना असून या योजनेमध्ये अनेक प्रायव्हेट कंपनीचा समावेश असल्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांचे नुकसान सुद्धा या कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप करत नाही. त्यामुळे आता अशा एका कंपनीला जिल्हा प्रशासनाने ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेले असून त्या Crop Insurance संदर्भात माहिती आपण जाणून घेऊया.

 

प्रधानमंत्री पिक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी असून अनेक वेळा शेतकऱ्यांना पिक विमा योजनेची पैसे मिळवण्यासाठी आंदोलने करावी लागतात तसेच निवेदने द्यावी लागतात परंतु तरीसुद्धा त्यांच्या हातात पीक विम्याचे पैसे मिळत नाही अनेक वेळा मिळाले तर ते खूपच कमी मिळते. त्यामुळे अशा कंपन्यांवर वेळोवेळी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

 

पिक विमा कंपनीला टाकले काळया यादीत Pik Vima Company:

शेतकरी बंधूंनो अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आयसीआयसीआय लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनी मार्फत त्यांच्या शेती पिकांचा पीक विमा काढलेला होता. या पिक विमा कंपनीने पिक विमा वाटप करण्यासंदर्भात त्यांच्या कर्तव्याची दुर्लक्ष केलेले असल्याचा आरोप ठेवण्यात आलेला होता तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न वाटण्यासाठी आरोग्य कंपनीवर होता त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता या कंपनीला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलेले असून पुढील कारवाई करण्यासाठी राज्य शासनाकडे याबाबत शिफारस देखील केलेली आहे.

 

पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेती पिकांसाठी Pik Vima काढल्यानंतर शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती तसेच अतिवृष्टी अवकाळी पाऊस तसेच गारपीट इत्यादी परिस्थितीमध्ये पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करून नुकसान भरपाई मिळवता येत असते. यावर्षी आम्ही शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल केला होता परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप न करणे तसेच Crop Insurance वाटप संदर्भातील कामांमध्ये दिरंगाई करणे अशा प्रकारच्या अनेक घटना कंपनीमार्फत करण्यात येत होते.

 

त्यामुळे ही कंपनी शेतकऱ्यांना वेळेवर पिक विम्याचे वाटप करण्यात असक्षम दिसून आली त्यामुळे या कंपनीला काळे आधी टाकलेले असून या संदर्भातील माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे.

Gram Panchayat Online: तुमच्या गावासाठी शासनाने किती रुपये मंजूर केले, सरपंचाने ते पैसे कुठे खर्च केले याची संपूर्ण माहिती पहा

 

तुम्हाला पिक विमा मिळाला का?

यावर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि सततचा पाऊस झालेला होता त्यामुळे राज्यातील खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यात अनुषंगाने पिक विमा कंपनीकडे दावा दाखल करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाई मागणी केलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप करण्यात आलेले असून तुम्हाला ती तुम्हाला मिळाला का नाही ते कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता.

Perni Anudan: खुशखबर, शेतकरी बांधवांनो आता पेरणीसाठी 10 हजार अनुदान, या शेतकऱ्यांना मिळेल, पहा कसा मिळेल लाभ