मित्रांनो ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामे करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी पैसा मंजूर करण्यात येतो. राज्य तसेच केंद्र शासनाने ग्रामपंचायत मधील तसेच गावातील लोकांच्या विकासासाठी तसेच लोकांना पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी उपलब्ध करून दिलेला पैसा ग्रामपंचायत मध्ये येत असतो तो पैसा सरपंच विविध कल्याणकारी योजनांमध्ये खर्च करत असतो. त्यामुळे तुमच्या गावांमध्ये शासनाच्या माध्यमातून किती रुपये मंजूर झाले ते कोणत्या कामासाठी खर्च केले गेले याची Gram Panchayat Online ची संपूर्ण माहिती आता आपल्याला ऑनलाईन पाहता येते.
शासनाच्या माध्यमातून दरवर्षी ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयांची विकास कामे मंजूर करून त्याकरिता निधी वितरित करण्यात येत असतो. परंतु सर्वसामान्य व्यक्तींना ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामांसाठी शासनाच्या माध्यमातून येणारा पैसा याच्याबद्दल माहिती नसते त्यामुळे बऱ्याच वेळी तो पैसा ज्या कामाकरिता आलेला आहे ते कार्य न करता इतर कोणत्याही कार्याकरिता खर्च केला जातो किंवा ते पैसे स्वतःच्या स्वार्थासाठी वापरले जाते.
त्यामुळे आपण अशा वेळेस ऑनलाईन पद्धतीने आपल्या ग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजनेसाठी किंवा कोणत्या कार्यासाठी किती रुपये मंजूर झालेले आहे. याची माहिती चेक करू शकतात. आणि त्यामध्ये जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची तफावत आढळून येत असेल किंवा ती योजना तुमच्या गावांमध्ये राबवण्यात आलेली नसेल तर त्याचा जाब तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत मधील कर्मचारी तसेच सरपंचांना वेळ विचारू शकतात.
परंतु आता पूर्वीप्रमाणे राहिलेले नसून सर्व गोष्टी डिजिटल आणि ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे गावांमध्ये कोणत्या Gram Panchayat Yojana आल्या त्या योजने करिता किती पैसा मंजूर झाला तो पैसा कोणत्या वर्षी वापरण्यात आला याची संपूर्ण माहिती आपल्याला ऑनलाईन पाहता येत आहे. त्यामुळे तुम्हाला सरपंचाला याबद्दल माहिती विचारण्याची आवश्यकता नसून ऑनलाईन याबद्दल माहिती काढून त्याचा जाब मात्र विचारू शकता.
ग्रामपंचायत मध्ये कोणत्या कामासाठी किती पैसे आले याची संपूर्ण माहिती येथे पहा
ग्रामपंचायत मध्ये आलेला पैसा ऑनलाईन कसा पहायचा?
तुमच्या ग्रामपंचायत मध्ये शासनाने किती रुपये मंजूर केले ते कोणत्या कामासाठी वापरण्यात आले याची माहिती जर तुम्हाला मिळवायची असेल तर ती दोन पद्धतीने मिळवता येते पहिली पद्धत म्हणजे तुम्ही ग्रामपंचायत मध्ये आलेल्या योजनांचा पैसा पाहण्यासाठी मनरेगाच्या अधिकृत वेबसाईटवरून चेक करू शकतात. ग्रामपंचायत मध्ये आलेला पैसा पाण्याची दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही ग्रामस्वराज नावाची मोबाईल अप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून त्याच्या माध्यमातून ग्रामपंचायत मध्ये झालेल्या योजना तसेच पैसा या संदर्भात विस्तृत माहिती मिळवू शकतात.
ग्रामपंचायत मध्ये कोणत्या कामासाठी किती पैसे आले याची संपूर्ण माहिती येथे पहा