Monsoon 2023 Update: शेतकऱ्यांनो सावधान मान्सून संदर्भात मोठी बातमी, यंदा मान्सून उशिरा, बळीराजाच्या चिंतेत वाढ

शेतकरी बांधवांना मान्सून बाबत स्कायमेट चा नवीन अंदाज जाहीर झालेला असून या अंदाजानुसार राज्यांमध्ये तसेच देशांमध्ये मान्सून यंदा उशिरा पोहोचणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली असून नेमका स्कायमेट ने हवामानाबाबत दिलेला अंदाज काय आहे या Monsoon 2023 संदर्भात माहिती आपण या लेखात जाणून घेऊया.

 

मित्रांनो भारतातील हवामाना संदर्भातील महत्त्वाची असणारी कंपनी स्कायमेट नी त्यांचा हवामान अंदाज वर्तवलेला आहे, परंतु अद्याप देखील भारतीय हवामान विभागाचा अंदाज येणे बाकी आहे. स्कायमेट ने दिलेल्या हवामानाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. हा संपुर्ण Mansoon Forcast जाणुन घेऊया.

 

या वर्षी देशात सरासरी पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने जाहीर केला होता, आणि अशातच आता खाजगी हवामान अंदाज वर्तविणारी संस्था Skymet मार्फत मान्सून उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज जाहीर केलेला आहे. देशात सर्वात प्रथम मान्सून हा केरळ राज्यात आगमन करत असतो, हा मानसून या वर्षी केरळ मध्ये उशिरा पोहोचणार असल्याची माहिती या अंदाजात वर्तविण्यात आली आहे.

 

एकंदरीत स्कायमेट चा हवामान अंदाज Hawaman Andaj:

स्कायमेटच्या अंदाजानुसार यावर्षी जून महिन्यापर्यंत सर्वत्र गरम वातावरण आहे. देशाच्या उत्तर भारतात 18 मे नंतर वादळ तसेच गडगडात सुरू होणार आहे. स्कायमेटच्या एकंदरीत अंदाजानुसार यावर मान्सूनला विलंब होणार असून पेरणी सुद्धा उशिरा होण्याची शक्यता आहे.

 

दरवर्षी मान्सूनचे आगमन केव्हा होते?

मित्रांनो दरवर्षी मान्सून हा 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होत असतो, केरळच्या किनारपट्टीवर एक जूनला मान्सूनचे आगमन होत असते. यावर्षी एकंदरीत पावसाचा अंदाज weather forecast घ्यायचा झाल्यास सरासरी 96 टक्के पाऊस पडणार आहे.

 

या वर्षी मानसून वर अल निनोचा प्रभाव:

या वर्षी देशात अल निनोचा प्रभावही पाहायला मिळणार आहे, त्यामुळे देशातील काही भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. परंतु शंभर टक्के दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल असे नाही कारण की अल निनोचा प्रभाव असताना सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये सरासरी तसेच सामान्य पेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे.

Karjmafi Yojana: महत्त्वाचा निर्णय, या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, संपूर्ण कर्जमाफी, जाणून घ्या कोणत्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होणार

परंतु सध्या स्कायमेट या हवामान अभ्यासाक कंपनीने मान्सूनच्या उशिरा आगमनाबाबत दिलेला नवीन अंदाज शेतकऱ्यांना चिंतेत टाकणार आहे. शेतकरी बांधवांना मानसून आगमनाबाबत असणारा हा अंदाज तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.

 

तुमची जमीन तुमचीच असल्याचे सिद्ध करणारे हे 4 पुरावे, तुमच्याकडे आहे का? हे पुरावे प्रत्येकाने जपून ठेवा | Land Ownership Documents