Karjmafi Yojana: महत्त्वाचा निर्णय, या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, संपूर्ण कर्जमाफी, जाणून घ्या कोणत्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होणार

शेतकरी बांधवांनो 25 वर्षानंतर या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे, या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय असून कोणत्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार कोणत्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार, तसेच किंवा या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार या Karjmafi Yojana Maharashtra संदर्भातील माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

 

शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा संपूर्ण जीवन हे निसर्गावर अवलंबून आहे. अनेकदा शेतकऱ्यांना निसर्ग साथ देत नाही त्यामुळे अशा वेळेस शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येते. अनेक वेळा शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी नवीन हंगामामध्ये पैसा नसतो त्यामुळे ते विविध बँकांकडून कर्ज काढतात. गेल्या तीन ते चार वर्षापासून आपल्या महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी राज्य शासनाने Karjmafi करण्याचा निर्णय घेतला होता.

 

त्यामुळे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने भूविकास बँकेच्या सर्व कर्ज दराना संपूर्ण कर्जमाफी घेण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता. त्यामुळे भू विकास बँकेच्या कर्जदार असणाऱ्या शेतकऱ्यांनाच सातबारा कोरा होणार आहे. महाराष्ट्र शासनाने भूविकास बँकेची कर्जमाफी करण्याचा निर्णय नोव्हेंबर 2022 मध्ये घेतला होता. त्यामुळे आता ही Bhuvikas Bank Karjmafi होत आहे.

 

या शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा:

शेतकरी बांधवांना भूविकास बँकेच्या सर्व कर्जदार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असून महाराष्ट्र शासनाने यापूर्वी जाहीर केलेल्या भूविकास बँक कर्ज माफी योजना अंतर्गत आता अंमलबजावणी प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. 2023 च्या मार्च महिन्यामध्ये अंमलबजावणी प्रक्रिया सुरू झालेली असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४१०५ शेतकऱ्यांच्या सातबारा आता कोरा होणार आहे.

 

या Bhuvikas Bank Karjmafi Yojana संदर्भात महत्वाच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. विकास बँकेचे जर तुम्ही कर्जदार शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा कर्जमाफीचा लाभ मिळेल.

 

Farmer Scheme: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता मे महिन्यात जमा होणार पीएम किसान व नमो शेतकरी चे 4000; फक्त यांना मिळणार लाभ

 

जिल्ह्यातील एवढ्या शेतकऱ्यांना मिळेल लाभ:

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील 4105 शेतकऱ्यांना भू विकास बँक कर्ज माफी योजना चा लाभ मिळणार असून या शेतकऱ्यांचा सातबारा लवकरच कोरा होईल. जवळपास 128 कोटी 49 लाख रुपये ची थकबाकी वरील शेतकऱ्यांची बँकेकडे असून हे कर्ज आता माफ करण्यात येत आहे.

 

Pocra DBT Scheme: या योजनेअंतर्गत जुन्या विहिरीचे तसेच बोरवेल चे पुनर्भरण करा, मिळेल 16000 अनुदान, लगेच करा अर्ज